कोणीही आजारी पडलं की आपण त्यांच्यासाठी फळं घेऊन जातो. कारण आपण सर्वच जाणतो की कोणत्याही आजाराशी लढण्यासाठी फळे महत्त्वाची भूमिका बजावतात. चुकीची जीवनशैली आणि आहारातील पौष्टिक घटकांची कमतरता यामुळे अनेकजण अनेक आजारांना बळी पडतात. मधुमेह असाच एक आजार आहे. मधुमेह झाल्यानंतर शरीरातील रक्तातील साखरेची पातळी खूप वाढते. ते कमी करण्यासाठी लोक गोड खाणे बंद करतात. अनेकजण फळे खाणेही सोडून देतात. पण फळांचे सेवन पूर्णपणे बंद केल्यास शरीरातील अनेक पोषक तत्वांची कमतरता निर्माण होऊ शकते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मात्र, काही फळे अशी आहेत, जी केवळ रक्तातील पातळीच कमी करत नाहीत, तर त्यांच्यातील अँटी-ऑक्सिडंट आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म मधुमेहाच्या रुग्णांसाठी वरदान ठरू शकतात. आज आपण जाणून घेऊया अशी कोणती फळे आहेत जी मधुमेहाच्या रुग्णांसाठी फायदेशीर ठरू शकतात.

  • पीच :

फायबर रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत करते. पीच हे देखील असेच एक फळ आहे, ज्यामध्ये फायबरचे प्रमाण जास्त असते. १०० ग्रॅम पीचमध्ये १.६ ग्रॅम फायबर असते. पीच हे पहाडी फळ आहे, जे विशिष्ट हंगामातच उपलब्ध असते.

आहारातील चवळीचे ‘हे’ फायदे तुम्हाला माहित आहेत का? अनेक गंभीर आजारांवर आहे प्रभावी

  • नाशपाती :

नाशपाती हे मधुमेहींसाठी फायदेशीर फळ मानले जाते. यामध्ये फायबर मुबलक प्रमाणात असते. नाशपातीमध्ये व्हिटॅमिन-के देखील असते. जे शरीरासाठी खूप फायदेशीर आहे.

  • संत्री :

मधुमेही रुग्णांसाठी संत्रीही रामबाण उपाय आहे. संत्र्यामध्ये फायबर, व्हिटॅमिन सी, फोलेट आणि पोटॅशियम भरपूर प्रमाणात असते, जे मधुमेहापासून आराम देण्याचे काम करतात.

Hair Care: कांद्यामुळे दूर होणार टक्कल पडण्याची समस्या; फक्त फॉलो करा ‘या’ सोप्या टिप्स

  • किवी :

सर्वांना माहित आहे की, किवी खाण्याचे अनेक फायदे आहेत. मधुमेहाच्या रुग्णांनाही हे खाल्ल्याने फायदा होऊ शकतो. किवीमध्ये व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन-सी आणि अँटी-ऑक्सिडंट्स भरपूर असतात, जे साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत करतात.

  • पेरू :

पेरू खाल्ल्याने रक्तातील साखर नियंत्रणात राहते. तसेच पेरूमध्ये व्हिटॅमिन ए आणि सी, फॉलेट, पोटॅशियम यासारखे अनेक पोषक तत्त्व असतात, जे मधुमेहाच्या रुग्णांसाठी फायदेशीर आहेत. पेरूमध्ये ग्लायसेमिक इंडेक्स कमी असतो, जो रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्यास मदत करतो.

Photos : सकाळच्या ‘या’ चांगल्या सवयी वाढवतील तुमची पॉझिटिव्हिटी

  • जांभूळ :

जांभूळ मधुमेहाच्या रुग्णांसाठीही फायदेशीर आहेत. जांभळाच्या सेवनाने रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित राहण्यास मदत होते.

  • सफरचंद :

मधुमेहाच्या रुग्णांसाठी सफरचंदही खूप फायदेशीर आहे. वास्तविक, त्यात विरघळणारे फायबर असते, जे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत करते.

(येथे दिलेली माहिती गृहीतके आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. कृपया अधिक माहितीसाठी तज्ञांचा सल्ला घ्या.)

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Diabetes tips diabetic patients can also eat these fruits blood sugar will not increase pvp
First published on: 22-08-2022 at 15:02 IST