डायबिटीज अर्थात मधुमेह आपल्या अयोग्य खाद्यपद्धतीमुळे , जीवनशैलीमुळे होतात. मेडिकल टर्ममध्ये साखर वाढण्याला हाइपरग्लाइसीमिया असं म्हंटल जात. जगभरात डायबिटीजच्या रुग्णांची संख्या वाढत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

डायबिटीजमध्ये खाण्यापिण्याकडे जास्त लक्ष देणं महत्त्वाचं आहे. डायबिटीजला घेऊन लोकांच्या मनात खूप शंका आहेत. आम्ही इथे अशा गोष्टी सांगत आहोत ज्या डायबिटीजच्या रुग्णांसह बाकीच्या लोकांनाही माहिती असणं गरजेचं आहे. चला जाणून घेऊया मधुमेहाशी संबंधित प्रचलित समज आणि त्यामागील सत्य.

कार्बोहाइड्रेट्स खाऊ नयेत

मधुमेह असलेले लोक, तज्ञांऐवजी त्यांच्या आजूबाजूच्या लोकांचे म्हणणे ऐकून घेतात, कोणत्याही विशिष्ट अन्नाचे सेवन पूर्णपणे टाळतात किंवा ते जास्त प्रमाणात सेवन करण्यास सुरवात करतात, जे त्यांच्या आरोग्यासाठी खूप वाईट असू शकते. वास्तविक मधुमेहींनी योग्य प्रकारचे कार्बोहाइड्रेट्स सेवन केले पाहिजे. यासोबतच दिवसाच्या कोणत्या जेवणात किती कार्ब्सचा समावेश करायचा याचीही काळजी घेतली पाहिजे.

(हे ही वाचा: तुमच्या ‘या’ पाच चुका रक्तातील साखर वाढवू शकतात, जाणून घ्या कसे ठेवावे नियंत्रण)

आर्टिफिशियल साखरेचा वापर

बहुतेक लोक आपली रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यासाठी साखरेच्या जागी आर्टिफिशियल साखरेचा वापर करतात. त्यांना असं वाटत की साध्या साखरेपेक्षाशुगर फ्री किंवा आर्टिफिशियल साखर लाभकारी ठरते. एक्सपर्ट्सनुसार आर्टिफिशियल साखर किंवा शुगर-फ्रीचं सेवन केल्याने इन्सुलिन रेजिस्टेंस स्थिती बिघडू शकते.

सडपातळ लोकांना मधुमेह होत नाही

सडपातळ लोकांना मधुमेह होऊ शकत नाही असे अजिबात नाही: बहुतेक लोकांच्या शरीरातील चरबी बाहेरून दिसत नाही, ती आतून दिसते.

(हे ही वाचा: ब्लड शुगर सोबत काजू हाय बीपीही ठेवते नियंत्रित; जाणून घ्या इतर फायदे)

गोड पदार्थांमुळे होणारा मधुमेह

मधुमेहाबद्दल बोलायचे झाले तर सगळ्यात आधी लोकांच्या मनात येतो तो गोड पदार्थ, पण मधुमेह होण्यामागे केवळ साखर किंवा गोड पदार्थ हेच कारण नाही. लठ्ठपणामुळे मधुमेह टाईप-२ होऊ शकतो, ज्यामुळे मिठाई खाल्ल्याने वजन वाढते.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Diabetics should not eat sweets know what is true ttg
First published on: 24-12-2021 at 17:11 IST