Guidelines for a healthy diet : गुबगुबीत मुले गोंडस आणि सुंदर दिसतात. त्यामुळे अनेक त्यांच्या लाडाने गाल खेचतात आणि किती हेल्दी (निरोगी) आहे असे सहज म्हणून जातात. आपण अनेकदा जास्त वजनाच्या मुलांना ‘निरोगी’ समजून त्यांच्याकडे दुर्लक्ष करतो. पण, या समस्येला वैद्यकीय भाषेत ‘चाइल्डहुड ओबेसिटी’ (म्हणजे लहान वयात जास्त वजन वाढणे) चा धोका मानला जातो. आकडेवारीनुसार, शालेय वयातील २० ते २५ टक्के मुले जास्त वजनाची किंवा लठ्ठ आहेत आणि अंदाजे १५ टक्के मुलांमध्ये फॅटी लिव्हरची सुरुवातीची लक्षणे दिसतात.

दिल्लीतील शालीमार बाग येथील फोर्टिस हॉस्पिटलमधील बालरोग विभागाचे वरिष्ठ संचालक आणि विभाग प्रमुख डॉक्टर जैन यांच्याकडे अलीकडेच ४ फूट ६ इंच उंची आणि ४६ किलोग्रॅम वजनाच्या एका दहा वर्षांचा मुलगा आला होता. हा मुलगा थकवा, गुडघेदुखी, शारीरिक हालचालींमध्ये भाग घेण्यास इच्छा नसल्याच्या तक्रारी घेऊन डॉक्टरांकडे आला होता.

त्याला मित्रांबरोबर धावायचे असते पण तो धावू शकत नाही. त्याला आळस येत असल्यामुळे इतर मुलांप्रमाणे त्याला इतर उपक्रमांमध्ये भाग घेता येत नाही, त्यामुळे तो त्याच्या मित्रांपासून दूर झाला आहे. तज्ज्ञांनी सांगितले की, मुलाचा बॉडी मास इंडेक्स (BMI) सुमारे २५ होता. हा त्याच्या वयाच्या ९५ व्या पर्सेंटाईलपेक्षा जास्त होता, जो लठ्ठपणाच्या श्रेणीत मोडतो. सोप्या शब्दांत सांगायचे तर, त्याचा BMI सामान्य मर्यादेपेक्षा २० ते २५ टक्क्यांपेक्षा जास्त होता. मुलांमधील लठ्ठपणाची कारणे काय आहेत आणि लठ्ठपणा टाळण्यासाठी मुलांची उंची किती असावी? याबद्दल आपण तज्ज्ञांकडून जाणून घेऊयात…

Award Banner

आता या मुलामधील लठ्ठपणाची कारणे काय?

आहार आणि शारीरिक हालचाल ही दोन कारणे लठ्ठपणासाठी जबाबदार आहेत. ब्रेड, सँडविच, नूडल्स, चिप्स, सोडा, बर्गर आणि प्रक्रिया केलेले स्नॅक्स लठ्ठपणास कारणीभूत ठरतात. या आहारामुळे वयाच्या दहाव्या वर्षापर्यंत त्या मुलाचे वजन ४६ किलोग्रॅमने वाढते. हे पदार्थ अधूनमधून खाण्याऐवजी, मुलाने त्यांचा रोजच्या आहारात त्याचा समावेश केला.

लहान मुलांमधील लठ्ठपणासाठी कोणते पदार्थ जबाबदार आहेत?

शहरी मुलांच्या सकाळपासून रात्रीपर्यंतच्या आहाराची पद्धत विस्कळीत असते. मुले नाश्त्यामध्ये पांढऱ्या ब्रेडचे सँडविच, पॅकेज केलेले बिस्किटे, गोड दूध, चिप्स, नमकीन, क्रीम बिस्किटे, इन्स्टंट नूडल्स, पिझ्झा, बर्गर, पॅकेज केलेले स्नॅक्स, गोड पेये, पेस्ट्री, रिफाइंड पिठाचे ब्रेड, बाहेरचे अन्न किंवा रेडी-टू-इट फूड खातात, जे मुलांच्या लठ्ठपणास कारणीभूत ठरू शकतात. तज्ज्ञांच्या मते, मुलांच्या संपूर्ण दिवसाच्या आहारात रिफाइंड कार्ब्स, अस्वास्थ्यकर चरबी, मीठ आणि साखर यांचे प्रमाण जास्त आणि तर फायबर, प्रथिने आणि आवश्यक पोषक तत्वांची कमतरता असते, ज्यामुळे लठ्ठपणा येतो.

बालपणीचा लठ्ठपणा गंभीर आजारांची सुरुवात कशी ठरतो?

बालपणात पोटावर चरबी वाढते, ज्यामुळे यकृत आणि स्वादुपिंडावर परिणाम होतो. या वयात वाढत्या लठ्ठपणामुळे इन्सुलिन प्रतिरोध निर्माण होतो. वाढत्या लठ्ठपणामुळे फॅटी लिव्हर डिसीजचा धोका वाढू शकतो. वाढत्या लठ्ठपणामुळे कोलेस्ट्रॉलचे असंतुलन म्हणजेच ट्रायग्लिसराइड्स वाढणे आणि एचडीएल कमी होणे यांसारख्या समस्या उद्भवू शकतात. लठ्ठपणामुळे उच्च रक्तदाब देखील होऊ शकतो. जर वाढत्या लठ्ठपणावर नियंत्रण ठेवले नाही, तर ही समस्या पुढे जाऊन टाईप २ मधुमेह आणि हृदयविकारांना कारणीभूत ठरू शकते. गुडघ्यांवर वाढलेल्या दाबामुळे चालताना वेदना देखील होऊ शकतात, ज्यामुळे मूल व्यायाम टाळू लागते. याचा त्याच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर परिणाम होतो.

डॉक्टरांकडे आलेल्या मुलाने वजन कसे कमी केले?

कुटुंबाने कडक आहाराऐवजी संतुलित आहाराचा अवलंब करून आपल्या मुलाचे वजन नियंत्रित केले. मुलाला ९० टक्के घरचं जेवण दिले. वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी, त्याच्या आहारात डाळ, पोळ्या, भाज्यांचा समावेश केला. त्याला घरचं जेवणाची सवय लावून, त्या कुटुंबाने हळूहळू जंक फूड बंद केले. मुलाला घरगुती जेवणाची आवड निर्माण व्हावी म्हणून, सॅलडला चव देण्यासाठी पिझ्झा मसाला वापरला जात असे, जेणेकरून तो घरच्या जेवणाचा आनंद घेऊ शकेल. नाश्त्यामध्ये फळे, दही आणि थोडे चीज यांचा समावेश होता. सोडाऐवजी फ्लेवर्ड वॉटरचे सेवनही केले जात असे.

त्याच्या कुटुंबाच्या मदतीने, सहा महिन्यांत मुलाचे वजन ४७ किलोवरून ४० किलोवर आले. आहारासोबतच, मुलाची उंची १३७ सेमीवरून १४२ सेमीपर्यंत वाढली. त्याचा बीएमआय (BMI) २५ वरून १९.८ पर्यंत कमी झाला, जो सामान्य आहे. वजन कमी झाल्यामुळे त्याची ऊर्जा पातळी आणि आत्मविश्वास वाढला.

लहान मुलांमधील लठ्ठपणा नियंत्रणात ठेवण्यासाठी, सुरुवातीपासूनच या नियमांचे पालन करा…

  • सुरवातीची दोन वर्षे मुलांना साखरेपासून दूर ठेवा.
  • पहिल्या १,००० दिवसांतील योग्य पोषण मुलांचे भविष्यातील आजारांपासून संरक्षण करते.
  • मुलांना पौष्टिक पदार्थ खाऊ घाला, केवळ कॅलरीयुक्त पदार्थ नाही.
  • मुलांना दररोज एक तास घराबाहेर खेळायला द्या.
  • स्क्रीन टाइम कमी करा.
  • जेवण, झोप आणि अभ्यासासाठी नियमित वेळ निश्चित करा.