How To Control Sugar Craving: आपल्यापैकी बहुतेकांसोबत असे घडते की, पौष्टिक जेवणानंतर लगेचच आफल्याला काहीतरी गोड खाण्याची तीव्र इच्छा होते. कधीकधी ही इच्छा इतकी वाढते की, आपण घरात ठेवलेले चॉकलेट, बिस्किटे किंवा जास्त साखर असलेले गोड पदार्थ विचार न करताच खाऊन टाकतो. मात्र, चवीची ही भूक आपल्या आरोग्यासाठी आणि रक्तातील साखरेच्या पातळीसाठी हानिकारक ठरू शकते. जर तुम्हीही अनेकदा गोड पदार्थ शोधण्यासाठी फ्रिजसमोर जात असाल, तर तुमची ही सवय थोडी सुधारा. आहारतज्ज्ञांच्या मते, गोड खाण्याची इच्छा नियंत्रणात ठेवण्यासाठी योग्य आणि आरोग्यदायी पर्याय निवडणे महत्त्वाचे आहे.
आहारतज्ज्ञ सुझॅन फिशर यांनी दि इंडियन एक्सप्रेसशी बोलताना सांगितले की, गोड खाण्याची तीव्र इच्छा तुमच्या आरोग्याच्या ध्येयांना बाधा आणेलच असे नाही. गोड खाल्ल्याने तुमच्या शरीरात कॅलरीज वाढतात, मात्र योग्य पर्याय निवडून तुम्ही तुमच्या खाण्याच्या इच्छेवर सहज नियंत्रण ठेवू शकता आणि शरीरात अतिरिक्त कॅलरीज जाण्यापासून रोखू शकता. तर मग जाणून घेऊया गोड खाण्याच्या इच्छेवर नियंत्रण ठेवण्यासाठीच्या आरोग्यदायी पर्यायांबद्दल…
बदामाचे बटर, खजून आणि डार्क चॉकलेट
जर तुम्हाला गोड खाण्याची इच्छा होत असेल आणि त्वरित ऊर्जेची गरज असेल, तर खजून खाऊन बघा. तुमची गोड खाण्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी हा एक उत्तम पर्याय आहे. बेकिंगमध्ये नैसर्गिक गोडवा म्हणूनही याचा वापर करता येतो. यामध्ये आवश्यक पोषक तत्वे आणि अँटीऑक्सिडंट्स असतात, जे दाह कमी करण्यास आणि संपूर्ण आरोग्यास मदत करतात. तज्ज्ञांच्या मते, हे खजूर बदामाच्या बटरने भरलेले अशतात, त्यावर वितळवलेले डार्क चॉकलेट टाकले जाते आणि नंतर फ्रिज केले जाते. त्यामुळे ते आणखी चविष्ट बनते.
मेडजूल खजूरमध्ये फ्रुक्टोज आणि ग्लुकोज यांचे नैसर्गिक मिश्रण असते. जर्नल ऑफ न्यूट्रिशनुसार, त्यातील फायबरच्या प्रमाणामुळे ग्लायसेमिक इंडेक्स कमी असतो, त्यामुळे ऊर्जा हळूहळू उपलब्ध होते आणि रक्तातील साखरेची पातळी अचानक वाढण्यास प्रतिबंध होतो. त्यामध्ये फ्लेव्होनॉइड्स, कॅरोटीनॉइड्स आणि फिनोलिक संयुगे यासारखे अँटीऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात. संशोधनानुसार, ही संयुगे शरीरातील ऑक्सिडेटिव्ह ताण आणि दीर्घकालीन दाह कमी करण्यास मदत करतात.
यामध्ये केळ्यामध्ये सुमारे ५० टक्क्यांपेक्षा जास्त पोटॅशियम असते. ते स्नायूंच्या पुनप्राप्तीसाठी आणि ह्रदयाच्या सामान्य ठोक्यांसाठी आवश्यक आहे. या खजुराच्या सेवनाने डायबिटीज नियंत्रणात ठेवण्यास, ह्रदयाचे आरोग्य सुधारण्यास आणि दृष्टी सुधारण्यासही मदत होऊ शकते.
नैसर्गिकरित्या गोड केलेले मफिन्स
जेव्हा तुम्हाला गोड खाण्याची इच्छा होते, तेव्हा मफिन्स खाऊन बघा. मफिन्स आणखी हेल्दी बनवण्यासाठी तुम्ही त्यात बदल करू शकता. म्हणजे त्यात ४ ते १० चमचे अतिरिक्त साखर अशू शकते, जी थेट लिव्हर आणि इन्सुलिनच्या पातळीवर परिणाम करते. त्यामुळे रिफाइंड साखरेऐवजी तुम्ही भोपळा, रताळे किंवा केळ्याची प्युरी वापरू शकता. त्यामुळे नैसर्गिक गोडवा मिळतो. या प्युरीमध्ये असलेले फायबर रक्तातील साखरेची पातळी अचानक वाढू देत नाही. यामुळे फायबर आणि आवश्यक पोषक तत्वांचे प्रमाण वाढते, ते रक्तातील साखर नियंत्रित करतात. पचनक्रिया सुधारतात आणि शरीराला स्थिर ऊर्जा देतात.
संत्री आणि टरबूज
ही फळे वर्षभर उपलब्ध असली तरी आहारतज्ज्ञ उन्हाळ्यात टरबूज आणि हिवाळ्यात संत्री खाण्याचा सल्ला देतात. संत्री खूप गोड आणि रसरशीत असतात, तसंच त्यात त्वचेचे रक्षण करणारे व्हिटॅमिन सी आणि आतड्यांसाठी चांगले असलेले फायबरही असते. टरबूज शरीरातील पाण्याची पातळी टिकवून ठेवते आणि मन:स्थिती सुधारते. त्यात लायकोपीन नावाचे एक अँटीऑक्सिडंट असते. ते शरीरासाठीफायदेशीर असते. ही फळे ताजी खाल्ल्यास तुम्हाला फायदा होईल.
सुकवलेले आलू बुखार आणि नट्स बटर
गोड खाण्याची इच्छा झाल्यास सुकवलेले आलू बुखार आणि सोबत नट्स बटर खाऊन बघा. आलू बुखार नैसर्गिकरित्या गोड असतात आणि त्यांचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी असतो. त्यामध्ये फायबर भरपूर प्रमाणात असते. ते आतड्यांच्या आरोग्यासाठी चांगले असते आणि बोरॉन तसंच व्हिटॅमिन के सारखी पोषक तत्वे हाडे मजबूत करण्यास मदत करतात. तुम्ही त्यावर थोडे नट्स बटर लावू शकता. त्यामुळे एक आरोग्यदायी आणि स्वादिष्ट नाश्ता तयार होतो. संध्याकाळी नट्स बटरसोबत आलू बुखार आणि एक कप चहा हादेखईल एक पर्याय आहे.
गोड खाण्याची इच्छा कंट्रोल करण्यासाठी पर्याय
जेव्हा आपल्याला गोड खाण्याची इच्छा होते. तेव्हा आपण अनेकदा समोर जे काही असेल ते खातो. आहारतज्ज्ञ काही सोपे बदल सुचवतात. नैसर्गिकरित्या गोड असलेली फळे खाणे. फळांमध्ये फायबर आणि पोषक तत्वे भरपूर असतात आणि ती रक्तातील साखर संतुलित ठेवतात. फळे मर्यादित प्रमाणात खा. अति खाणे टाळा. जेव्हा कधी तुम्हाला गोड खाण्याची इच्छा होईल, तेव्हा आधी फळे निवडा. जर तुम्हाला जड गोड पदार्थ खाण्याची इच्छा असेल, तर तो कमी प्रमाणात खा. प्रोटीनयुक्त गोड पदार्थ खा. सफरचंदासोबत पीनट बटर, ग्रीक योगर्टसोबत बेरी किंवा मध, डार्क चॉकलेटसोबत बदाम. यामुळे पोट बराच वेळ भरलेले राहते. आरोग्यदायी गोड स्नॅक्स खा.
