Which kiwi is better, golden or green : जगभर प्रसिद्ध असलेले Zespri कीवीफ्रूट फक्त चविष्टच नाही, तर पोषणानेही भरपूर असते. आणि त्याचे वेगवेगळे प्रकार वेगवेगळे फायदे देतात. विशेष म्हणजे, ग्रीन किवी (Green Kiwi) आणि सन गोल्ड किवी (SunGold Kiwi) हे दोन्ही प्रकार त्यांच्या खास गुणांसाठी ओळखले जातात. आजकाल लोकांना आरोग्यदायी आणि पोषक तत्वांनी युक्त फळे खायला आवडतात. किवी हे असेच एक फळ आहे, जे लोक त्याचे पौष्टिक गुणधर्म आणि चव लक्षात घेऊन जास्त प्रमाणात खाल्ले जाते जातात. हे छोटे फळ रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी, पचनक्रिया सुधारण्यासाठी, त्वचा निरोगी ठेवण्यासाठी उपयुक्त ठरतात. यामध्ये व्हिटॅमिन सी, फायबर, पोटॅशियम, अँटीऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात, जे शरीराला अनेक आजारांपासून वाचवण्यासाठी उपयुक्त ठरतात.
एम्सचे माजी सल्लागार आणि साओल हार्ट सेंटरचे संस्थापक व संचालक डॉक्टर विमल झंझर म्हणाले की, किवी हृदयासाठी अमृतासारखे आहे. अँटी-ऑक्सिडंट गुणधर्मांनी समृद्ध असल्यामुळे आरोग्य सुधारण्यास मदत होते. पण, बाजारात उपलब्ध असलेल्या हिरव्या आणि सनगोल्ड (सोनेरी) किवीबद्दल लोकांना अनेकदा प्रश्न पडतो की, या दोन्हींपैकी कोणती अधिक फायदेशीर आहे, त्यांच्यात काय फरक आहे. तर आज आपण त्याच बद्दल या बातमीतून जाणून घेणार आहोत…
दोन्ही किवीमध्ये फरक काय?
हिरवी किवी तिच्या गोड-आंबट चवीसाठी आणि उच्च फायबरसाठी ओळखली जाते. तर सोनेरी किवी तिच्या नैसर्गिक गोडव्यासाठी, कमी आम्लतेसाठी,उच्च व्हिटॅमिन सी प्रमाणासाठी विशेषतः लोकप्रिय आहे. म्हणूनच आरोग्य तज्ज्ञ संतुलित आहारासाठी या दोन्ही फळांचा आहारात समावेश करण्याची शिफारस करतात.
हिरव्या किवीची साल तपकिरी आणि किंचित लवदार असते. आतमध्ये हिरवा गर आणि अधिक काळ्या बिया असतात, ज्यामुळे तिला चव येते. हिरव्या किवीची चव गोड-आंबट आणि ताजेतवाने करणारी असते. हिरवी किवी किंचित कच्ची उपलब्ध असते आणि तिला खोलीच्या तापमानावर पिकवणे आवश्यक असते. ती रेफ्रिजरेटरमध्ये सुमारे एक आठवडा साठवून ठेवता येते.
सनगोल्ड किवी फळ कसे दिसते?
सनगोल्ड किवी फळाची साल गुळगुळीत असते. त्याचा गर सोनेरी-पिवळा असतो, त्यात कमी बिया असतात आणि आकाराने लहान सुद्धा असतात. सनगोल्ड किवीची चव गोड, उष्णकटिबंधीय असते. त्याची चव आंबा, स्ट्रॉबेरीसारखी असून सालीसकट खाल्ले जाऊ शकते. खाण्यापूर्वी त्यावरील कीटकनाशके किंवा घाण काढून टाकण्यासाठी पूर्णपणे स्वच्छ धुवून घ्या. सनगोल्ड किवी खरेदीच्या वेळी पिकलेले असतात. हे फळ गोड असून रेफ्रिजरेटरमध्ये सुमारे २ आठवडे साठवून ठेवता येते.
सुरक्षितता आणि खबरदारी
ज्या लोकांना लॅटेक्सची ॲलर्जी आहे, त्यांना किवीची देखील ॲलर्जी असू शकते. काही विशिष्ट परिस्थितींमध्ये किवीचे सेवन करणे हानिकारक ठरू शकते. किवीमध्ये पोटॅशियम आणि ऑक्झॅलेटचे प्रमाण जास्त असते, त्यामुळे ज्या रुग्णांना किडनी स्टोन किंवा किडनीचा गंभीर आजार आहे, त्यांनी डॉक्टरांचा सल्ला घेतल्यानंतरच त्याचे सेवन करावे.
