नवरात्र संपल्यानंतर आता आतुरता आहे दिवाळी सणाची…वर्षातला सर्वात मोठा आणि शेवटचा सण…त्यामूळे गरीब असो वा श्रीमंत…दिवाळीची चाहुल लागताच प्रत्येक जण आपल्या घराला हटके पद्धतीने कसं सजवता येईल, याच्या तयारीत लागलेला दिसून येतो. प्रत्येकजण आपआपल्या आवडीनुसार घराच्या सजावटीसाठी काही ना काही गोष्टी करण्यात व्यस्त असतो. घराची सजावट करताना खिशावर मोठा भार येतो. एकदम मोठं काम निघालं तर मग खर्चाचा आकडा वरची पातळी गाठतो. याचसाठी तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत, अतिशय कमी खर्चाच पण हटके पद्धतीने घराची सजावट करण्यासाठी भन्नाट आयडियाज…

आपल्या घराला ऐटबाज व रुबाबदार बनविण्याचा उत्तम मार्ग म्हणजे,आपल्या घरातील सजावटीमध्ये काही साधे बदल करणे होय. हे आपले खिसे रिकामे न करता आपल्या घरास एक नवीन स्वरूप प्राप्त करून देईल. या टिप्स तुम्हाला परवडणारे आहेत आणि खूप कमी वेळात तुम्ही ही सजावट करू शकता. म्हणून, जर आपले घर छान दिसण्यासाठी मेकओव्हर आवश्यक असेल तर या टिप्स एकदा नक्कीच करून पाहा.

Loksatta  Chaturang A trail of fear Experience the body
भय भूती : …आणि भीतीचा मागमूसही उरला नाही!
can washing your hair regularly for 21 days keep dandruff away what dermatologist experts said read
केस २१ दिवस नियमितपणे धुतल्याने कोंड्याची समस्या दूर होते का? डॉक्टर काय सांगतात, वाचा
Shravan 2024 Horoscope
२२ जुलैपासून ‘या’ ४ राशींना मिळणार गडगंज पैसा? ७२ वर्षांनी श्रावणात शुभ योग जुळून आल्याने महादेवाच्या कृपेने होऊ शकतात श्रीमंत
Every daughter-in-law should get such a mother-in-law
“सून असावी तर अशी!” ‘या’ आहेत आजकालच्या सासूच्या अपेक्षा, प्रत्येक सुनेने पाहिला पाहिजे हा Viral Video
Benefits Of Drinking Tulsi Water
तुळशीचे पाणी पिण्याचे अमृतासमान फायदे वाचा; सर्वाधिक फायद्यांसाठी कसे करावे सेवन? वाचा आहारतज्ज्ञांचा स्पष्ट सल्ला
Essential motorcycle gear to carry during monsoon rides
पावसाळ्यात फिरायला जाताय? मग अशी करा तयारी; ‘या’ गोष्टींकडे दुर्लक्ष करणं पडू शकतं महागात
Five must-follow steps to rescue flooded car
पावसाळ्यात कार पूराच्या पाण्यात अडकल्यानंतर तर काय करावे? नेहमी लक्षात ठेवा या ५ गोष्टी
green tea benefits
जेवणानंतर ग्रीन टी प्यायल्याने झपाट्याने वजन कमी होऊ शकते? जाणून घ्या तज्ज्ञांकडून…

जुन्या साड्यांपासून बनवा पडदे, कुशन कव्हर

तुमच्याकडे जुने कपडे किंवा साड्या जे सहसा कमी वापरले असतील किंवा फेकून देण्यासारख्या झाल्या असतील, तर वेळ वाया घालवू नका. यापासून तुम्ही तुमच्या घराच्या सजावटीत भर घालू शकता. जुन्या साड्या किंवा कपड्यांमधली तुम्हाला आवडलेल्या डिझाईन्सचे तुकडे वेगळे करून घ्या. याचा वापर तुम्हाला उशांसाठी सुंदर पॅटर्नमधील कव्हर आणि गादी बनवण्यासाठी वापरू शकता. विशेषतः कुरते आणि साड्या. त्यांचे चौकोनी अथवा त्रिकोणी आकार कापून उशांसाठी शिवलेले कव्हर्स अप्रतिम दिसतात. तुम्ही हे कव्हर्स हातानेही शिवू शकता अथवा मशीनवरही शिवू शकता. इतकंच नाही तर तुम्ही मऊ कपडे एकत्र करून त्याची उशीही बनवू शकता. यामध्ये फाटलेले पण चांगले सुती कपडे तुम्ही वापरू शकता. तसंच तुमच्या जीन्सचं कापडही तुम्ही उशीसाठी वापरून त्यावर लिहिलेले उशीच्या मध्यभागी ठेऊन तुम्हाला ती उशी अधिक आकर्षक बनवता येईल.

तुम्ही घरातील टेबल आणि खुर्च्यांसाठी वेगळं कव्हर तयार करू शकता. त्याशिवाय तुम्ही कपड्यांच्या लेस आणि फ्रील काढून टेबलच्या कव्हरला तसंच पडद्यांनाही लावू शकता. दिसायला हे अतिशय मोहक दिसतं. तसंच आपल्या घरातील लहान मुलांचे अनेक कपडे पडलेले असतात. त्यावर असणाऱ्या कार्टूनच्या चित्रांचा वापर तुम्ही टेबल कव्हर अथवा बेडच्या कव्हरसाठी करू शकता. जुन्या कपड्यांचा पुनर्वापर करणं खूप सोपं आहे. तुम्ही जीन्सचे पॅच लावूनदेखील तुमची कलात्मकता दाखवू शकता.

तुम्ही प्रिंटेड कपड्यांपासून लँप शेड तयार करू शकता. असे लँप शेड तुमच्या घरालाही अधिक शोभा आणतात.

क्रेप पेपर तोरण

हे क्रेप पेपर तोरण हे ताज्या फुलांपेक्षा जास्त काळ टिकेल आणि ते प्लास्टिकच्या तोरणांपेक्षा जास्त छान दिसते. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर ही कल्पना हटके ठरले. हे कोणत्याही प्रसंगासाठी वापरले जाऊ शकते. आपले स्वतःचे तोरण तयार करण्यासाठी आपल्या आवडीच्या विविध रंगांमध्ये क्रेप पेपर्स मिळवा. तोरण करण्यासाठी येथे दिलेल्या सूचनांचे अनुसरण करा. ते अधिक उत्सवपूर्ण करण्यासाठी आपण प्रत्येक टोकाला सोनेरी घंटा देखील जोडू शकता. दिवाळी संपली की आपले तोरण काढून टाकू नका, इतर सण-उत्सवांसाठी ते तसेच राहू द्या.

साहित्य: क्रेप पेपर, फेविकॉल, मणी.

१. विविध रंगाचे क्रेप पेपर गोळा करा.
२. कागदाच्या मध्यभागून एका सुई-धाग्याने बेसिक रनिंग स्टिच शिवून घ्या.
३. त्यानंतर कागदाच्या मध्यभागून शिवलेली लाईन पुढे ओढून घेऊन कागद अगदी गोलाकारात गोळा होईल.
४. जेव्हढ्या लांबीचं तोरण हवं आहे तेव्हढ्या लांबीपर्यंत हे क्रेप पेपरवर रनिंग स्टिच लाईन पुढे शिवत जा.
५. जितक्या रंगाचे तोरण बनवायचे आहे, तितक्या वेगवेगळ्या रंगाचे वेगवेगळ्या माळा तयार करून घ्या.
६. त्यानंतर सर्व रंगाचे क्रेप पेपरच्या माळा एकत्र करून घेऊन तुम्हाला हवं तशा डिझाईन्सचे तोरण बनवा.

७. शेवटी एका लाडकी काठीला या माळा धाग्याने अर्ध गोलाकार बांधत तोरण बनवा.

८. तुमचे क्रेप पेपरचे तोरण तयार.

वाशी टेप आणि टी लाईट्स

टी लाईट मेणबत्त्या दिवाळीच्या सजावटीसाठी मुख्य आहेत, परंतु ते राखाडी मेटलसह थोडेसे सपाट दिसू शकतात. यासाठी, वाशी टेप्स हा उपाय आहे! वाशी टेपची रूंदी वापरण्यात येणाऱ्या वस्तूशी योग्य प्रकारे जुळते आणि आपल्याला जे करायचे आहे त्यासाठी आपल्या आवडीच्या टेपची निवड करा आणि त्यास टी लाइटच्या आसपास गुंडाळून घ्या. टेप अधिक रंगीबेरंगी आणि उठावदार बनविण्यासाठी ते वेगवेगळे ठेवा.

दिव्यांच्या माळा

दिवाळीसाठी दिव्यांच्या माळा एक सामान्य गोष्ट आहे, परंतु त्या फोटो प्रिंटच्या बाजूने लटकवून आकर्षक बनवा. आपल्या सर्वोत्कृष्ट कौटुंबिक आठवणी निवडा, त्यातील काही प्रिंट करा, फोटो छापून घ्या, आणि सजावटीसाठी स्ट्रिंगवर लटकवा.

जारमध्ये मेणबत्तीचा वापर

हा एक असा प्रकार आहे जो एक मोहक परिणाम करणारा आणि बनविण्यास सोपा आहे. वेगवेगळ्या आकारात काही मेसन जार फक्त निवडा, त्यांना लेस, फिती किंवा धाग्याने लपेटून घ्या आणि मेणबत्ती त्याच्या आत ठेवा.
आपण लेस आणि धागा वापरण्यास उत्सुक नसल्यास, आपण सजावटीचा पॅटर्न तयार करण्यासाठी जार पेंट करू शकता. उत्कृष्ट परिणामांसाठी, काचेच्या पृष्ठभागावर चांगले कार्य करणारी एक्रेलिक पेंट वापरा.

जिन्यावर सजावट करा

घराची सजावट करताना काहीसा दुर्लक्षित राहणारा भाग म्हणजे जिना. इतर खोल्यांपेक्षा जिन्याला कमी महत्त्व दिलं जातं. खरंतर, उत्कृष्टपणे सजवलेला जिना घराची शोभा कित्येक पटीने वाढवतो. बंगला, रो हाऊस, पेण्ट हाऊस आणि ड्युप्लेक्स फ्लॅटच्या रचनेत घराच्या आतमध्ये आणि शक्यतो दर्शनी भागातच जिना असतो. हा जिना कल्पकतेने सजवल्यास तो सजावटीमध्ये मोलाची भर घालतो.घरी येणाऱ्या अतिथींच्या नजरेस सर्वात आधी जिन्याचा भाग पडतो. म्हणून यंदाच्या दिवाळीत पाहुण्यांना चमकणाऱ्या परी दिवे लावून तुमचा जिना चकाचक करू शकता आणि कागदी कंदील लावू शकता. वॉल हँगिंग वापरून पाहा ज्यामुळे तुमचं घर आणखी उजळेल.

जारमधल्या मेणबत्त्या

तुमच्या घरात लखलख करण्यासाठीचा हा एक सोपा आणि कमी खर्चातला पर्याय आहे. यासाठी तुमहाला वेगवेगळ्या आकारातील काही मेसन जार लागतील. त्यांना एक आकर्षक लेस, फिती किंवा धाग्याने सजवून घ्या. त्यात मेणबत्ती ठेवा. ही तुम्ही जार पेंट करून आणखी आकर्षित करू शकता. त्याचप्रमाणे एक्रेलिक पेंट वापरून हा जार आणखी हटके बनवू शकता.

मेंदीने सजवलेल्या मेणबत्त्या

सर्व प्रकारच्या आकार आणि आकारांच्या मोठ्या निवडीमुळे मेणबत्त्या एक उत्कृष्ट सजावटीची वस्तू आहे. यासाठी तुम्हाला साधारण पाच सेंटीमीटर इतका व्यास असलेली एका मोठ्या आकाराच्या मेणबत्ती घ्या. एक मेंदीचा कोन घ्या. तुम्हाला हवी तशी डिझाइन मोठ्या आकाराच्या मेबणबत्तीवर काढून घ्या. ही मेहंदीची डिझाईन सुकल्यावर त्यावर पीव्हीसी गोंद थोडे पाण्यात मिसळा आणि आपल्या मेंदीने सजवलेल्या मेणबत्तीला कोट घालण्यासाठी ब्रश वापरा. एकदा गोंदचा पहिला कोट सुकल्यानंतर, आपली मेंदी आहे त्या जागी चिकटलेली आहे का याची खात्री करा.

पेपर बॅग ल्युमिनरीज

पेपर बॅग ल्युमिनियर्स ही दिवाळीच्या सजावटीसाठी जलद, सोपा आणि स्वस्त पर्याय आहे. तपकिरी कागदाच्या पिशव्या इतक्या सुंदर रूपात सजावटीसाठी वापरू शकतो याचा तुम्ही कधी विचार सुद्धा केला नसेल. यासाठी तुम्हाला आधी पंचिंग मशीनने आपल्या कागदावर पंच करून घ्या. त्यानंतर आपली मेणबत्ती आत ठेवा. आपल्याकडे सजावटीचा पंच नसल्यास सेफ्टी पिन किंवा सुईने सुद्धा कागदाच्या पिशव्या कोरून तयार करता येईल. तुम्हाला हव्या तश्या डिझाईनमध्ये हे छिद्र पाडून घ्या. कुणी गोल आकाराचे छिद्र देतात, तर कुणी हार्ट शेपमधले छिद्र करतात. तसंच तुम्ही एखाद्या टेक्स्टमध्ये सुद्धा कादगावर छिद्र पाडू शकता. उदाहरणार्थ, HAPPY DIWALI. किंवा मग कुणी वेगवेगळ्या चित्रांच्या डिझाईनमध्ये ही छिद्र पाडतात. यात आगीचा धोका असल्यामुळे खऱ्या मेणबत्त्या वापरणं टाळा. त्याऐवजी इलेक्ट्रीक मेणबत्ती वापरणं कधीही चांगलं.

हाताने रंगवलेले दिवे

दिवे ही दिवाळीच्या सणाची खऱी ओळख आहे. त्यामुळे यंदाच्या दिवाळीत तुम्हील दिव्यांना सुद्धा हटके पद्धतीने सजावटीसाठी वापरू शकता. बाजारात दिवे खरेदी करताना साधे दिवे घ्या आणि तुमच्या कुटुंबातील सर्व लहान मुलांना एकत्र आणून त्यांना अॅक्रेलिक पेंट्सने रंगवा. त्यांना सिक्विन आणि मणींनी सजवून तुम्ही घरात हाताने रंगवलेले दिव्यांनी घर प्रकाशमय करू शकता.

सुंदर रांगोळ्या

रांगोळी नावाच्या सुंदर कलाकृतीशिवाय दिवाळी आनंदच काय असणार? अंगणात मुख्य प्रवेश द्वारा समोर वेगवेळ्या रंगांच्या रांगोळ्या काढल्या जातात अशाप्रकारे येणाऱ्या पाहुण्यांचे स्वागत करतात. असे म्हटले जाते की, रांगोळीला हिंदू धर्मात शुभकारक मानले जाते. तसेच घराच्या पुढे काढलेली रांगोळी घराचे आकर्षण दिवाळीदरम्यान अधिक वाढते.

खडूने सजवा घर !

खडू अशी एक गोष्ट आहे जी लहान मुले किंवा तुम्ही आम्ही सर्वांनी त्यांच्या लहानपणी शाळेत धडे गिरवण्यासाठी हातात पडकली आहे. पण तुम्ही कधी विचार केला आहे का की, आपण याच खडूचा आपल्या घराच्या सजावटीसाठी वापर करू शकतो? यासाठी चॉकबोर्ड बनवण्याचा प्रयत्न करा. यावर तुम्ही लोकांसाठी वेगवेगळे संदेश लिहा. यामुळे अनेकांना आनंद होईल आणि त्यांना त्यांच्या बालपणीच्या दिवसांची आठवण होईल. जर तुमच्याकडे चॉकबोर्ड नसेल तर ते खरेदी करा. खूप कमी खर्चात तुम्हाला चॉकबोर्ड उपलब्ध होतो.