यापुर्वीचे अनेक सण हे करोना संकटामुळे सर्वांना घरबसल्या साजरे करावे लागले. दिवाळीही त्याला अपवाद नसेल. यंदाच्या वर्षी करोना नियमांमध्ये शिथिलता जरी आली असेल तर यंदाच्या वर्षाची दिवाळी सुद्धा करोनाच्या सावटाखाली साजरी करावी लागतेय. उत्सवी उत्साहाला आवर घालून दिवाळी उत्साहाला आवर घालत आणि सारे नियम पाळून साजरी करावी लागणार आहे. सोबत मलेरिया आणि डेंग्यूचं थैमान घोंगावत असल्याने यंदाच्या दिवाळीतही लोकांच्या भेटी-गाठी टाळाव्या लागत आहेत. पण लोकांना न भेटता सुद्धा तुम्ही जिथे आहात तिथुनच Whatsapp, Facebook, Instagram, Telegram च्या माध्यमातून तुम्ही मित्रांना शुभेच्छा देऊ शकता. दिवाळी निमित्ताने तुमच्या नातेवाईकांना, मित्र परिवाराला शुभेच्छा देण्यासाठी काही खास दिवाळी शुभेच्छा संदेश घेऊन आलो आहोत तुमच्यासाठी…

chatura article on small kid, chatura parent article
समुपदेशन : मुलांच्या जगातून पालक हरवतात?
How to make solkadhi marathi recipe
recipe : चिकन, मटणाच्या जेवणासह हवी थंडगार सोलकढी? मालवणी पद्धतीने कशी बनवायची जाणून घ्या
How To Make Gudi Padwa Sakhrechya Gathi At Home gudi padwa 2024
गुढी पाडव्यासाठी साखरेच्या गाठी यंदा बनवा घरीच, साखरेच्या बत्तास्यांची सोपी झटपट कृती
Recruitment for posts of Police Constables refusal to grant interim stay to order of extra marks to transgender
पोलीस हवालदार पदांसाठी भरती, तृतीयपंथीयांना अतिरिक्त गुण देण्याच्या आदेशाला अंतरिम स्थगिती देण्यास नकार

Diwali Wishes In Marathi | दिवाळी शुभेच्छा संदेश मराठी

रांगोळीच्या सप्तरंगात सुखाचे दीप उजळू दे,
लक्ष्मीच्या सोनेरी पावलांनी
तुमच्या घरी घर सुख समृद्धी येऊ दे
नरक चतुर्दशी आणि दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!

गोवर्धन पूजा, लक्ष्मीपूजा, दीपपूजा दिवाळीला,
उधाण येवो आनंद, उत्साह अन हर्षउल्लासाला,
वंदन करूया मनोभावे आज त्या मांगल्याला,
दिवाळीच्या तुम्हांला मनःपूर्वक शुभेच्छा!

घेऊनी दिव्यांचा प्रकाश सोनेरी,
माळोनी गंध मधुर उटण्याचा..
करा संकल्प सुंदर जगण्याचा,
गाठूनी मुहूर्त दिवाळीच्या सणाचा..
दीपावली शुभेच्छा!

गेले काही दिवसांचे
अंधारमय अनुभव पुसून टाका
नवा प्रकाश, नव्या उर्जामय आठवणी घेऊन
ही #दिवाळी साजरा करा…
सर्वांना दिवाळीच्या अनेकानेक शुभेच्छा!!

दिपावलीच्या आजपासून ते भाऊबीज पर्यंतच्या साजरा होत असलेल्या आनंदमयी, उत्साही, मंगलमय पर्वानिमित्त आपणास व आपल्या परिवारास मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा..!
हे नववर्ष आपणास आनंदी, भरभराटीचे, प्रगतीचे, आरोग्यदायी
जावो ह्याच मनोकामना…! !
दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा!

दिपावलीच्या सर्वांना मंगलमय शुभेच्छा. लक्ष्मीच्या सोनपावलांनी आपल्या घरात सुख समृद्धी आणि आनंद येवो. अंधकार दूर करून सर्वांचे आयुष्य आपल्या तेजाने उजळून टाकणाऱ्या दीपोत्सवाच्या लक्ष लक्ष आरोग्यदायी शुभेच्छा.
करोनामध्ये स्वतःला, कुटुंबाला जपा आणि दिवाळीचा आनंद घ्या.

उटण्याचा मंद सुगंध घेऊन,
आली आज नरक चतुर्दशीची पहाट,
पणतीतल्या दिव्याच्या तेजाने,
उजळेल आयुष्याची वहिवाट
तुम्हांला आणि तुमच्या परिवाराला
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!

वाईटाचा अंत होऊन सत्याचा झाला विजय,
दिव्यांच्या रोषणाईने दूर झाले सर्वांचे दुःख,
घ्या हाच संकल्प परत न अंधकार,
न कोणी झुको वाईटाखाली पार,
कोणतंही संकट आल्यास त्याला करू मिळून पार
दिवाळीच्या शुभेच्छा अपरंपार…!

आहे सण रोषणाईचा,
येऊ द्या चेहऱ्यावर हास्य छान,
सुख आणि समृद्धीची येऊ दे बहार,
लुटून घ्या सारा आनंद,
जवळ्यांच्याची साथ आणि प्रेम,
दिवाळीच्या पावन दिवशी सगळ्यांना शुभेच्छांचा उपहार.

धनाची पूजा यशाचा प्रकाश किर्तीचे अभ्यंगस्नान,
मनाचे लक्ष्मीपूजन संबंधाचा फराळ,
समृद्धी पाडवा प्रेमाची भाऊबीज,
अशा या दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा…!!!

दिवाळीचा पहिला दिवा लागता दारी,
सुखाचे किरण येती घरी,
पुर्ण होवोत तुमच्या सर्व ईच्छा,
दिवाळीच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा…!!!

माझे दोन्ही डोस झाले आहेत.
२ वेळा RTPCR Test केली आहे .
त्याचा रिपोर्ट पण Negative आहे.
सांगण्याचा एकच उद्देश…
मला यंदा …
फराळाला बोलवले तरी चालेल !
दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा!!!

स्नेहाचा सुगंध दरवळला..
आनंदाचा सण आला..
एकच मागणे दिवाळी सणाला..
सौख्य, समृद्धी लाभो सर्वांना..
दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा..!

Diwali Quotes in Marathi | दिवाळी कोट्स मराठी

धनाची पूजा, यशाचा प्रकाश,
कीर्तीचे अभ्यंगस्नान, मनाचे लक्ष्मीपूजन,
संबंधाचा फराळ, समृद्धीचा पाडवा,
प्रेमाची भाऊबीज अशा या दीपावलीच्या
आपल्या सहकुटुंब, सह परिवारास सोनेरी शुभेच्छा..
शुभ दिवाळी!

घेऊनी दिव्यांचा प्रकाश सोनेरी,
माळोनी गंध मधुर उटण्याचा..
करा संकल्प सुंदर जगण्याचा,
गाठूनी मुहूर्त दिवाळीच्या सणाचा..
दीपावली शुभेच्छा!
दिवाळीनिमित्त मंगलमय शुभेच्छा !

जीवनाचे रूप आपल्या
तेजस्वी प्रकाशाने उजळवणारी दिवाळी,
खरोखरच अलौकिक असुन,
ही दिवाळी तुमच्यासाठी सुख, समाधान,
आणि वैभवाच्या दीपमाळांनी,
जीवन लखलखीत करणारी असावी…
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!

नक्षत्रांची करीत उधळण, दीपावली ही आली..
नवस्वप्नांची करीत पखरण, दीपावली ही आली..
सदिच्छांचे पुष्पे घेउनी, दीपावली ही आली..
शुभेच्छांचे गुच्छ घेउनी, दीपावली ही आली..
दीपावलीच्या तेजोमयी शुभेच्छा!

Diwali Whatsapp Status In Marathi | दिवाळी व्हॉट्सअ‍ॅप स्टेटस मराठी

आपल्या जीवनातल्या अंधाराचा नाश होवो,
कर्माची वात, भक्तीचं तेल
आत्म जाणिवेची ज्योत लावून
आपल्या ज्ञानाचा प्रकाश सदैव तेवत राहो…
हीच ईश्वरचरणी सदिच्छा!!!
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा !!!

बालपणाच्या गोड आठवणींनी भरलेला
उत्सव, फटाक्यांनी भरलेले आकाश
मिठाईंनी भरलेले तोंड, दिव्यांनी भरलेले घर,
आणि ह्दयात आनंद…
दिवाळीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा…!!!

आली दिवाळी उजळला देव्हारा..
अंधारात या पणत्यांचा पहारा..
प्रेमाचा संदेश मनात रुजावा..
आनंदी आनंद दिवसागणिक वाढावा..
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!

फटाके, कंदील अन्
पणत्यांची रोषणाई,
चिवडा चकली, लाडू करंजीची ही
लज्जत न्यारी…
नव्या नवलाईची दिवाळी येता,
आनंदली दुनिया सारी…!
दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा!

रांगोळीच्या सप्तरंगात,
सुखाचे दीप उजळु दे,
लक्ष्मीच्या पावलांनी,
घर सुख समृद्धीने भरू दे!

लक्ष्मी आली सोनपावलांनी,
उधळण झाली सौख्याची,
धर-धान्यांच्या राशी भरल्या,
घरी नांदू दे सुख-समृद्धी!

रोषणाईच्या पर्वाचं गीत गात जाऊ,
सर्व होवो प्रकाशमान असे
दीप लावत जाऊ,
गरजवंताच्या घरी येवो समृ्द्धी,
हीच देवा चरणी प्रार्थना, हॅपी दिवाली.

दिवाळीत खूप खाऊया मिठाया,
मित्रांना बोलवूया,
शेजाऱ्यांच्या दरवाज्यांवरही लावूया पणत्या,
सर्वांना मारू मिठी,
लक्ष्मीची करू आरती,
सर्वांना हॅपी दिवाळी.

यंदाच्या दिवाळीत टाळा नाहक खर्च,
फक्त करा सेव्हिंग्ज्स, भविष्य करा साकार,
प्रत्येक दिवाळीचा हाच असावा निर्धार.
दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा!!!

दिवाळीच्या नादात पाकिटाचाही करा विचार,
फालतू खर्च होणार नाही यावर करा विचार,
पण असं असलं तरी करू नका कंजूषी यार,
दिवाळी आहे धूमधडाक्यात साजरी करूया यार,
हॅपी दिवाळी.

दिवाळीची शान तेव्हाच आहे
जेव्हा गरीबांची मुलंही लावतील फुलबाज्या,
त्यांच्याकडेही असेल मिठाई,
जोपर्यंत दूर होणार नाही हा भेदभाव
तोपर्यंत कशी होईल दिवाळीची खरी रोषणाई…
सर्वांना करून आनंदी
मगच साजरी करा दिवाळी.