Diwali 2021 : नेपाळपासून ते थायलंडपर्यंत… दिवाळसण साजरा करण्याच्या नाना तऱ्हा!

भारतातच नव्हे तर जगभरातील अनेक देशांमध्ये देखील दिवाळी साजरी केली जाते.

lifestyle
मलेशियामध्ये दिवाळी हरी दिवाळी म्हणून साजरी केली जाते.(photo: pexels)

दिवाळीच्या या आनंदमय सणानिमित्त संपूर्ण देशात जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले आहे. लोकं एकमेकांना दिवाळीच्या शुभेच्छा देत आहेत. केवळ भारतातच नव्हे तर जगभरातील अनेक देशांमध्ये देखील दिवाळी साजरी केली जाते. दरम्यान, अमेरिकन खासदार राजा कृष्णमूर्ती यांनी दिव्यांचा सण दिवाळीचे धार्मिक आणि ऐतिहासिक महत्त्व ओळखून अमेरिकन काँग्रेसमध्ये ठराव मांडला आहे. हे विधेयक मंजूर झाल्यास, लवकरच आता अमेरिकेत दिवाळीला राष्ट्रीय सुट्टी म्हणून घोषित केले जाईल.

या देशांमध्ये सुद्धा दिवाळी साजरी होते

थायलंड

थायलंडमध्येही दिवाळी मोठ्या उत्साहात साजरी केली जाते, मात्र या ठिकाणी दिवाळी या सणाचे नाव क्र्योंधा असे आहे. या दिवशी येथील लोकं केळीच्या पानांपासून दिवे बनवतात आणि रात्रीच्या वेळी हे दिवे आणि उदबत्ती पेटवली जाते. यानंतर काही पैशांसह दिवे आणि अगरबत्ती नदीत सोडले जातात.

श्रीलंका

श्रीलंकेत दिवाळी या सणालाही विशेष महत्त्व आहे कारण ते महाकाव्य रामायणाशी संबंधित आहे. या दिवशी येथील लोकं आपापल्या घरी मातीचे दिवे लावतात आणि एकमेकांच्या घरी जाऊन दिवाळीच्या शुभेच्छा देत भेटी घेतात.

मलेशिया

मलेशियामध्ये दिवाळी हरी दिवाळी म्हणून साजरी केली जाते. या दिवशी तेथील लोकं लवकर उठतात आणि नंतर पाणी आणि तेलाने स्नान करतात, त्यानंतर देवी-देवतांची पूजा करण्याची परंपरा आहे. त्याचबरोबर या दिवशी अनेक ठिकाणी दिवाळी मेळ्यांचेही आयोजन करत मोठ्या उत्साहात ही दिवाळी साजरी केली जाते.

नेपाळ

भारताच्या शेजारी असलेला नेपाळ देशामध्ये दिवाळी हा सण तिहार म्हणून साजरी केली जाते. पाच दिवस चालणाऱ्या या उत्सवात पहिल्या दिवशी गायींची, तर दुसऱ्या दिवशी कुत्र्यांची पूजा केली जाते. तिसऱ्या दिवशी मिठाई बनवली जाते, त्याचबरोबर देवतांची पूजा केली जाते आणि घरे सजवली जातात. यानंतर लोकं चौथ्या दिवशी यमराजाची पूजा करतात तर पाचव्या दिवशी भाऊबीज मोठ्या जल्लोषात साजरी करतात.

जपान

दिवाळीच्या दिवशी जपानमधील लोकं त्यांच्या बागेतील झाडांवर कंदील आणि कागदाचे पडदे लावतात. त्यानंतर काही कंदील हे आकाशात सोडले जातात. या दिवशी लोकं नाचतात आणि गातात. याशिवाय ते बोटिंगचाही आनंद घेतात आणि दिवाळी मोठ्या उत्साहात साजरी करतात.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Diwali celebration from nepal to thailand malaysia to srilanka diwali is celebrated in this way scsm

ताज्या बातम्या