Kitchen Cabinet Cleaning Hacks : दिवाळीला अवघे काही दिवस शिल्लक आहे, त्यामुळे अनेक घरात साफसफाई सुरू झाली आहे. कोणी पंखे साफ करतयं, तर कोणी कपाट, खिडक्या आणि लादी साफ करण्यात मग्न आहेत, पण यात स्वयंपाकघराची सफाई करणे हे सर्वात अवघड कामांपैकी एक आहे. विशेषतः किचनच्या कॅबिनेटवर साचलेला चिकटपणा, धूळ आणि माती काढणे खूप अवघड आहे, अनेकदा कपड्याने वारंवार पुसूनही कॅबिनेट स्वच्छ दिसत नाही.

अशा परिस्थितीत लोक बाजारातून महागडे क्लीनर खरेदी करतात, पण काही क्लीनर कॅबिनेटची चमक आणि फिनिशिंग खराब करू शकतात. जर तुम्हीही दिवाळीच्या साफसफाईसाठी एखादा सोपा आणि कमी खर्चाचा उपाय शोधत असाल, तर डिशवॉश लिक्विड तुमच्या खूप कामाला येऊ शकते. याची मदत घेऊन घरीच साफसफाईचे लिक्विड तयार करता येते, ज्यामुळे कॅबिनेटवर साचलेली तेलकट मळ आणि घाण काढणे सोपे होईल. यासाठी तुम्हाला फार मेहनत करण्याची गरज पडणार नाही.

कॅबिनेट साफ करण्यासाठी फक्त हव्यात ‘या’ गोष्टी

स्वयंपाकघरातील कॅबिनेट साफ करण्यासाठी तुम्हाला कोणत्याही विशेष क्लिनिंग प्रोडक्टची गरज नाही. यासाठी एका वाटीत पाणी, डिशवॉश लिक्विडचे काही थेंब, एक स्वच्छ स्प्रे बॉटल आणि मायक्रो फायबर कपड्याची आवश्यकता असेल. या गोष्टींच्या मदतीने तुम्ही कॅबिनेटच्या बाहेरून आणि आतून अशा दोन्ही बाजूंनी सफाई करू शकता.

कॅबिनेट साफ करण्याचे लिक्विड कसे बनवावे?

  • सर्वात आधी एका लहान वाटीत पाणी घ्या.
  • आता यात डिशवॉश लिक्विडचे काही थेंब टाका आणि चांगले मिसळून घ्या.
  • लिक्विड खूप जास्त टाकू नका, अन्यथा कॅबिनेटवर फेसाचा चिकटपणा राहू शकतो.
  • आता हे द्रावण एका स्वच्छ स्प्रे बॉटलमध्ये भरा. तुमचे सोपे क्लिनिंग सोल्यूशन तयार आहे.

‘या’ सोप्या पद्धतीने करा किचनची कॅबिनेट साफ

कॅबिनेटवर हलका स्प्रे करा: सर्वात आधी कॅबिनेटवर साचलेली धूळ कोरड्या कपड्याने झटकून घ्या. यानंतर तयार केलेल्या द्रावणाचा हलका स्प्रे करा. लक्षात ठेवा की, कॅबिनेट गरजेपेक्षा जास्त ओले करू नका.

मायक्रोफाइबर कपड्याने पुसून घ्या: आता एक स्वच्छ मायक्रोफाइबर कपडा घ्या आणि कॅबिनेट हलक्या हाताने पुसा. यामुळे कॅबिनेटवर साचलेली तेलकट मळ, धूळ आणि घाण काढण्यास मदत होईल. कोपऱ्यांमध्ये आणि हँडलच्या आसपासही चांगली सफाई करा.

स्वच्छ कपड्याने पुन्हा पुसा: साबणाचा चिकटपणा टाकण्यासाठी हलक्या ओल्या कपड्याने कॅबिनेट पुसून घ्या. यानंतर कोरड्या कपड्याने ती पूर्णपणे कोरडी करा. यामुळे कॅबिनेटवर पाण्याचे डाग पडण्याची शक्यता खूप कमी होईल.

व्हिनेगर आणि बेकिंग सोडा वापरण्यापूर्वी ‘ही’ गोष्ट लक्षात ठेवा

अनेक लोक स्वयंपाकघरातील हट्टी डाग चिकटण घालण्यासाठी व्हिनेगर आणि बेकिंग सोडा वापरतात. मात्र, सर्व प्रकारच्या कॅबिनेटवर यांचा वापर करणे योग्य ठरत नाही. काही कॅबिनेटच्या पॉलिश किंवा फिनिशिंगवर याचा वाईट परिणाम होऊ शकतो. त्यामुळे कॅबिनेटच्या मटेरिअलनुसारच सफाईची पद्धत निवडा.

(टीप: कोणत्याही क्लिनिंग लिक्विडचा वापर करण्याआधी कॅबिनेटच्या एखाद्या लपलेल्या लहान भागावर त्याची चाचणी (Patch Test) करून पहा. लाकूड, लॅमिनेट आणि पेंट केलेल्या कॅबिनेटची गरज वेगवेगळी असू शकते.)