Kitchen Jugaad Video: आपल्या देशात साजऱ्या होणाऱ्या सणांपैकी दिवाळी हा सर्वांत मोठा सण आहे. दिवाळीचा सण अगदी उत्साहात आणि मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो. दिवाळी हा रोषणाईचा सण असल्याने आपण त्या कालावधीत घर व त्याभोवती नेहमीपेक्षा अधिक प्रमाणात तेलाचे दिवे लावतो. तसेच पूजेमध्ये समई, निरांजन, पणती, दिवे अशा नानाविध दिव्यांच्या प्रकारांचा समावेश असतो. आकर्षक रोषणाईसाठी लामणदिवा, दीपमाळा असे दिव्यांचे अनेक प्रकार पूजेमध्ये अंतर्भूत केले जातात. पण, या दिव्यांसोबत दिवाळीआधीच एक असा उपाय करायचा आहे; जो दिवाळीत तुमच्या मोठ्या फायद्याचा ठरेल. पणत्यांच्या एका जुगाडचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. दिवाळीआधी पणतीचा हा व्हिडीओ पाहिला, तर दिवाळीत तुम्हाला याचा मोठा फायदा होईल.

दिवाळीत लोक दिवे लावतात. तसेच दरवर्षी दिवाळीत नव्या पणत्या घेतल्या जातात; पण त्यासोबतच जुन्या पणत्याही लावल्या जातात. पण, या जुन्या पणत्या वापरण्याआधी त्या एकदा गॅसवर ठेवा, असा सल्ला एका महिलेने दिला आहे. या हटके जुगाडाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. गृहिणींकडे बरेच भन्नाट असे घरगुती जुगाड असतात. काही गृहिणी सोशल मीडियावर हे जुगाड शेअर करतात. अशाच एका गृहिणीने शेअर केलेला हा जुगाड सध्या खूप व्हायरल होतोय.

Woman driving BMW steals flower pot from outside Noida shop, video goes viral
“अशा श्रीमंतीचा काय उपयोग?” आलिशान बीएमडब्ल्यूमधून आलेल्या महिलेचं रात्री १२ वाजता लाजीरवाणं कृत्य; VIDEO व्हायरल
14 December Rashi bhavishya In Marathi
१४ डिसेंबर पंचांग: आज १२ पैकी ‘या’ राशींवर…
An emotional video of a delivery boy having food in the middle of the road while delivering an order went viral on social media
परिस्थिती सगळं काही शिकवते! डिलिव्हरी बॉयचा हा VIDEO पाहून प्रत्येकाच्या डोळ्यात येईल पाणी
unhygienic vegetables frozen matar shocking video goes viral on social media
आता तर हद्दच झाली! वाटाणे पाण्यात टाकताच काय झालं पाहा; VIDEO पाहून सोललेले वाटाणे घेताना शंभर वेळा विचार कराल
MNS Chief Raj Thackeray
महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण होईल? राज ठाकरेंनी थेट नावच सांगितलं; म्हणाले…
Traffic jam in pune city due rush for Diwali 2024 shopping Shocking video
पुणेकरांनो दिवाळीच्या खरेदीला मंडईत जाताय? ‘हा’ VIDEO पाहून घरातून बाहेर येण्याआधी शंभर वेळा विचार कराल
Heart touching video of police who help poor man on road video goes viral
“शेवटी हिशोब कर्माचा होतो” पोलिसानं गरीब रिक्षा चालकाबरोबर काय केलं पाहा; VIDEO बघून डोळ्यांत येईल पाणी
madhuri dixit mumbai home inside photos
माधुरी दीक्षितचं मुंबईतील घर आतून कसं दिसतं? पाहा ५३ व्या मजल्यावरील अपार्टमेंटचा Inside Video

दिवाळीत होईल मोठा फायदा

आता याचा फायदा काय, असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. त्या महिलेने दाखविल्यानुसार मातीच्या पणत्या घेऊन, त्या गॅसवर थोड्या गरम करून घ्यायच्या आहेत. नंतर एका भांड्यात पाणी घ्या आणि त्यात गॅसवर गरम केलेले दिवे टाका. तुम्हाला त्या पणत्यांवरील काळपटपणा निघून गेल्याचे दिसेल. फक्त स्क्रब घेऊन तुम्ही याच पाण्यात हा दिवा घासून घ्या. या जुगाडामुळे तुम्हाला आता दरवर्षी दिवाळीला नवे दिवे घेण्याची गरज नाही. तुम्ही अशा प्रकारे दिवे स्वच्छ करून, दिवाळीला रोषणाई करू शकता.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> Kandil making at home: स्वस्तात मस्त! घरच्या घरी बनवा आकर्षक कंदील, या दिवाळीत वापरा ‘ही’ सोपी पद्धत आणि वाचवा पैसे

@Puneritadka यूट्यूब अकाउंटवरून हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. तुम्ही हा उपाय करून पाहा आणि त्याचा परिणाम कसा वाटला ते आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये सांगा.

Story img Loader