साडेतीन मुहूर्तापैकी एक म्हणजे बलिप्रतिपदा: जाणून घ्या महत्त्व,कथा आणि शुभ मुहूर्त

पाडव्याचा सण मोठ्या प्रमाणात उत्साहात साजरा केला जातो. लक्ष्मीपूजनानंतर आणि भाऊबीजेच्या आधी पाडवा येतो. यंदा ५ नोव्हेंबरला दिवाळी पाडवा आहे.

Diwali padwa 2021
दिवाळी पाडवा २०२१ (फाईल फोटो )

वर्षभरातील सर्व सणांमध्ये दीपावली हा सण महाराष्ट्रात उत्साहाने साजरा केला जातो. खऱ्या अर्थाने दिवाळीचा सण नरक चतुर्दशीच्या अभ्यंगस्नानापासून सुरु होतो. पण पाडव्याला विशेष महत्त्व आहे. साडेतीन मुहूर्तांपैकी एक म्हणून हा सण ओळखला जातो. या दिवशी मोठी खरेदी करण्याची पद्धत आहे. या दिवशी घरातील एखादी मोठी वस्तू किंवा संपत्तीची खरेदी केली जाते. या दिवशी नातेवाईक किंवा मित्रमंडळी एकमेकांच्या घरी फराळाला आणि जेवायला जातात, यावेळी मिष्टान्न करण्याची पद्धत आहे. एकूणच पाडव्याचा सण मोठ्या प्रमाणात उत्साहात साजरा केला जातो. लक्ष्मीपूजनानंतर आणि भाऊबीजेच्या आधी पाडवा येतो. यंदा ५ नोव्हेंबरला दिवाळी पाडवा आहे.

कार्तिक शुक्ल प्रतिपदेला बलिप्रतिपदा असे म्हणतात. या दिवशी दानशूर अशा बळीराजाची पूजा करण्यास सांगितली आहे. ज्याप्रमाणे चैत्र शुक्ल प्रतिपदेस शालिवाहन शक नवे संवत्सर सुरु होते, त्याप्रमाणे कार्तिक शुक्ल प्रतिपदेस विक्रम संवत्सर सुरु होते. पंचांगकर्ते दाते यांनी दिलेल्या माहितीनुसार व्यापारी वर्षास यादिवशी सुरुवात होत असल्याने वहीपूजन, दुकानाची पूजा करून नवीन वर्षाचे स्वागत केले जाते. या दिवशी पत्नीने पतीस ओवाळावे म्हणजे दोघांचे ही आयुष्य वाढते. यादिवशी पतीने पत्नीला ओवाळणी म्हणून सोने, साडी किंवा एखादी मोठी भेटवस्तू देण्याची पद्धत आहे.

( हे ही वाचा: Vastu Tips: दिवाळीच्या दिवशी घरात आवर्जून करा ‘या’ पाच गोष्टी )

शुभ मुहूर्त

सकाळी ०६. ५० ते १०. ५० मिनिटांपर्यंत.

दुपारी १२.२५ ते १. ४५ मिनिटांपर्यंत.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Diwali padwa auspicious day 2021 know the importance the story and shubha murtha ttg

Next Story
अकाली जन्मणा-या बाळांच्या फुप्फुसांच्या रक्षणासाठी हळद उपयोगी