Benefits of Drinking Salt Water : आपले शरीर न थांबता सतत काम करत असते. शरीराचे कार्य सुरळीत चालावे यासाठी विविध पोषक तत्त्वे आणि खनिजांची गरज असते. दिवसभरात काम करताना घाम, अश्रू किंवा लघवीद्वारे शरीरातील पाणी आणि आवश्यक इलेक्ट्रोलाइट्स बाहेर पडतात.
साधे पाणी पिऊन आपण ही कमतरता भरून काढण्याचा प्रयत्न करतो, परंतु ते नेहमीच पुरेसे नसते. शरीरातून गमावलेल्या इलेक्ट्रोलाइट्सची भरपाई करण्यासाठी साध्या पाण्यासह दिवसातून एकदा एक ग्लास मिठाचे पाणी पिणे हा एक उत्तम उपाय ठरू शकतो.
मिठाचे पाणी तुमच्या शरीरावर जादूचा प्रभाव टाकू शकते. यामुळे आरोग्याला अनेक फायदे होतात. आरोग्य तज्ज्ञ रामिता कौर यांनी याबद्दल महत्त्वाची माहिती शेअर केली आहे.
दिवसातून एकदा मिठाचे पाणी प्यायल्याने काय होते?
दररोज सकाळी एका ग्लास पाण्यात एक चमचा सेंधवा मीठ (काळे मीठ/रॉक सॉल्ट) मिसळून प्यावे. हे पेय सकाळी रिकाम्या पोटी किंवा नाश्त्याच्या ३० मिनिटे आधी पिऊ शकता. हे मीठ सामान्य मीठ नसून खनिजांनी समृद्ध असलेले नैसर्गिक मीठ आहे. चला तर मग जाणून घेऊया हे मिठाचे पाणी शरीराला कसे फायदेशीर ठरते:
- पोषक तत्त्वांचा साठा: या पाण्यात सोडियमसह मॅग्नेशियम, कॅल्शियम आणि पोटॅशियमसारखी अनेक आवश्यक खनिजे असतात, जी शरीराचे कार्य सुरळीत चालण्यासाठी आवश्यक आहेत.
- पचनक्रिया सुधारते: मिठाचे पाणी पोटातील ॲसिड आणि पाचक संप्रेरकांच्या (एंझाईम्स) निर्मितीला उत्तेजन देते. यामुळे अन्न व्यवस्थित पचण्यास मदत होते, पचनक्रिया सुधारते आणि आतड्यांचे आरोग्य चांगले राहते. तसेच पोट फुगणे आणि ॲसिडिटीच्या समस्येपासून आराम मिळतो.
- इलेक्ट्रोलाइट्सचे संतुलन: घामाद्वारे शरीरातून बाहेर पडणाऱ्या इलेक्ट्रोलाइट्सची भरपाई हे पाणी करते. स्नायू आणि मज्जासंस्थेच्या कार्यासाठी इलेक्ट्रोलाइट्स आवश्यक असतात, ज्यामुळे पायात किंवा स्नायूंमध्ये येणारे क्रॅम्प्स (गोळा येणे) कमी होतात.
- तणाव कमी करतो आणि चांगली झोप येते: यामध्ये मॅग्नेशियम असते, जे मज्जासंस्था शांत करण्यास मदत करते. यामुळे तणाव कमी होतो आणि झोपेची गुणवत्ता सुधारते.
- शरीराचा pH स्तर संतुलित ठेवतो: सध्याच्या खाण्यापिण्याच्या सवयींमुळे आपले शरीर ॲसिडिक बनते. मिठाचे पाणी शरीराचा pH स्तर संतुलित ठेवण्यास मदत करते, ज्यामुळे शरीर अधिक अल्कलाईन बनते आणि ॲसिडिटीची समस्या कमी होते.
- नॅचरल डिटॉक्सिफिकेशन: हे पेय शरीराला नैसर्गिकरीत्या डिटॉक्स करते आणि मूत्रपिंडाचे (किडनी) कार्य सुधारण्यास मदत करते.
(टीप: ज्यांना किडनी, हृदय किंवा लिव्हरशी संबंधित आजार आहेत, त्यांनी हे पेय पिणे टाळावे.)
