Hair Care Tips : लांबसडक, दाट, मजबूत केस असावेत अशी प्रत्येक महिलेची इच्छा असते. यात काही महिला आणि तरुणींचे केस नैसर्गिकरित्या खूपच सुंदर असतात, परंतु त्या केसांची योग्य काळजी घेत नाहीत. केसांची योग्य काळजी न घेतल्यास ते कोरडे होऊ लागतात आणि केस गळतीची समस्या सुरु होते. अशावेळी चांगले केसही निर्जीव आणि पातळ दिसू लागतात. बहुतेक स्त्रिया दिवसभर केसांची काळजी घेतात पण रात्री त्या केस जास्त घट्ट बांधून झोपतात. त्यामुळे केस तुटतात आणि स्कॅल्पमधून खेचले जातात. पण रोज रात्री झोपण्यापूर्वी तुम्ही फक्त खाली दिल्याप्रमाणे ३ गोष्टी केलात तर तुमचे केस लांबसडक, मजबूत आणि दाट होऊ शकतात.

केसांचे आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी रात्री झोपण्यापूर्वी करा ‘या’ गोष्टी

१) सिल्क कापडाच्या उशीचा वापर करा

उशी कव्हरच्या विविध प्रकारांचा तुमच्या केसांवर परिणाम होत असतो. जर तुम्ही खडबडीत किंवा घाणेरड्या उशीच्या कव्हरवर डोके ठेवून झोपत असाल तर तुमचे केस घर्षणामुळे ओढले जातात किंवा तुटतात. पण सिल्क किंवा मलमलच्या कापडापासून बनवलेल्या उशीच्या कव्हरवर डोके ठेवून झोपल्याने घर्षण होत नाही आणि केस खराब होण्याचा धोका कमी असतो.

is it good to work 12 hours during pregnancy
गर्भावस्थेत बारा तास काम करणे कितपत योग्य आहे? जाणून घ्या तज्ज्ञ काय सांगतात, गर्भावस्थेत किती काम करावे?
How to make solkadhi marathi recipe
recipe : चिकन, मटणाच्या जेवणासह हवी थंडगार सोलकढी? मालवणी पद्धतीने कशी बनवायची जाणून घ्या
Insomnia Before Period
महिलांनो, मासिक पाळीदरम्यान चांगली झोप येत नाही? स्त्रीरोगतज्ज्ञांनी सुचविलेल्या ‘या’ ४ गोष्टी करुन पाहा, लागेल शांत झोप
rangpanchami celebration
Health Special: रंगपंचमीला कोणते रंग वापराल? रंगांचा त्रास होऊ नये म्हणून काय काळजी घ्याल?

२) केस थोडे मोकळे ठेवून झोपा

केस खूप घट्ट बांधले तर केस मुळापासून खेचले जातात आणि तुटतात. पण जर तुम्ही केस मोकळे ठेवून झोपत असाल तर त्याचाही तुमच्या केसांवर परिणाम होतो. अशा परिस्थितीत खूप सैल वेणी घालून झोपणे चांगले. यामुळे तुमचे केस जसेच्या तसे राहतील, खेचले जाणार नाहीत आणि तुटणे देखील टाळता येईल.

३) केस ओले ठेवून झोपू नका

अनेक मुलींना सकाळी केस धुण्याचा कंटाळा येत असल्याने त्या रात्री झोपण्यापूर्वी केस धुतात आणि झोपतात. पण रात्री केस ओले ठेवून झोपल्याने केस जास्त तुटतात. याशिवाय ओले केस ठेवून झोपल्याने टाळूशी संबंधित समस्या उद्भवू शकतात.याशिवाय केसांना दुर्गंधी येण्याची शक्यता असते. जर तुम्हालाही ही सवय असेल तर ती लगेच बदला.

केसांच्या निरोगी आरोग्यासाठी ‘या’ टिप्स ठेवा लक्षात

१) तुम्ही रात्री झोपण्यापूर्वी आठवड्यातून एक किंवा दोनदा केसांना तेलाने मसाज करा. केस जास्त कोरडे असतील तर झोपण्यापूर्वी खोबरेल तेल लावा.

२) केस रात्री फणीने विंचरुन झोपल्याने केस सिल्की दिसतात. विंचरलेल्या केसांचा झोपेत जास्त गुंता होत नाही. यामुळे केस तुटण्याची चिंता नसते.

३) घट्ट रबर बँड वापरण्याऐवजी केसांना सिल्क किंवा सॅटिन स्क्रंचीने बांधा. स्क्रंची मऊ असते आणि त्यामुळे केस तुटत नाहीत..