Skin Care Tips : तुमच्यापैकी अनेक जण त्वचेसंबंधित समस्या दूर करण्यासाठी विविध घरगुती उपचार करून पाहतात. विशेषत: त्वचेची काळजी घेण्याच्या दृष्टीने अनेकदा घरगुती उपायांचा अवलंब करण्याचा सल्ला दिला जातो. पण, स्वयंपाकघरातील काही पदार्थ तुमच्या त्वचेसाठी योग्य असतीलच, असे नाही. त्यामुळे कोणतीही गोष्ट चेहरा किंवा हाता-पायांच्या त्वचेवर लावताना जरा काळजी घ्या. अन्यथा, त्वचेचा लालसरपणा, पुरळ, कोरडेपणा आणि इतर समस्या उदभवू शकतात.

चेहऱ्यावर चुकूनही लावू नका ‘हे’ पदार्थ

१) बेकिंग सोडा

बेकिंग सोडा अनेकांच्या स्वयंपाकघरात असतोच. बऱ्याचदा पीठ मऊ /फ्लफी करण्यासाठी त्याचा वापर केला जातो. तसेच स्वयंपाकघर स्वच्छ करण्यासाठीही तो प्रभावी मानला जातो. काही जण त्वचेवरील टॅंनिंग दूर करण्यासाठी बेकिंग सोड्याचा वापर करतात. पण, बेकिंग सोडा थेट त्वचेवर लावू नका; अन्यथा त्वचेवर रॅशेस आणि लालसरपणा यांसारख्या समस्या उदभवू शकतात. बेकिंग सोड्याने त्वचेची पीएच पातळी खराब होते आणि त्यामुळे त्वचेतील नैसर्गिक तेलकटपणा कमी होतो.

beetroot-pineapple-lemon juice remedy for iron deficiency
रक्तातील लोह वाढवण्यासाठी ‘बीट, अननस अन् लिंबाचा रस ठरेल का फायदेशीर? काय सांगतात तज्ज्ञ?
Black Salt Water Benefits
तुमचेही केस खूप गळतात का? काळ्या मिठाचं पाणी प्या अन् फरक बघा; जाणून घ्या योग्य पद्धत
ginger health benefits
तुम्ही रोज रिकाम्या पोटी आल्याचा तुकडा चघळल्याने तुमच्या शरीरावर काय परिणाम होईल? डॉक्टरांकडून जाणून घ्या…
nutritious ragi chips for kids Quickly note ingredients
बाजारातील चिप्सऐवजी मुलांसाठी घरीच बनवा ‘नाचणीचे पौष्टिक चिप्स’; पटकन नोट करा साहित्य आणि कृती
Your body needs 5 grams sugar find out where Extra Sugar goes in Body
तुमच्या शरीराला ‘इतकी’ ग्रॅम साखर आवश्यक! यापेक्षा जास्त खाल्ल्यावर ही साखर शरीरात कुठे जाते, काय बदलते? पाहा
why should drink water in earthen pot in summe
उन्हाळ्यात माठातील पाणी का प्यावे? जाणून घ्या, मातीच्या मडक्यातील पाणी पिण्याचे फायदे
Benefits of Sleep
तासाभराच्या अपुऱ्या झोपेमुळे तुमच्या आरोग्यावर काय दुष्परिणाम? बरे होण्यासाठी किती कालावधी? जाणून घ्या…
Things you need to remember when getting highlights
हेअर कलर करताना ‘या’ ३ गोष्टी नक्की लक्षात ठेवा; केस होणार नाही खराब

२) व्हिनेगर

अॅपल सायडर व्हिनेगर अँटी बॅक्टेरियल आणि अँटी इन्फ्लेमेटरी गुणधर्मांसाठी ओळखले जाते. पण, व्हिनेगर जास्त प्रमाणात थेट त्वचेवर लावले, तर त्वचेची पातळी खराब होते. तसेच त्वचा अधिक ?एक्सफोलिएट होते. त्यामुळे त्वचेमध्ये जळजळ आणि कोरडेपणा येतो.

३) टूथपेस्ट

टूथपेस्टचा वापर घरगुती उपचारांमध्ये केला जातो. त्याच्या वापराने मुरमे कमी होतात, असेही सांगितले जाते. पण, जर टूथपेस्ट जास्त वेळ त्वचेवर लावून ठेवली किंवा रात्रभर तशीच ठेवली, तर त्यामुळे त्वचेचे नुकसान होऊ शकते. त्यामुळे टूथपेस्टच नाही तर इतर कोणतेही उत्पादन चेहऱ्यावर जास्त वेळ लावून ठेवू नका.

४) लिंबू

लिंबू सायट्रिक अॅसिडचा स्रोत आहे. ते अॅसिडिक असल्याने लिंबू थेट त्वचेवर लावल्यास त्वचेच्या पीएच पातळीला त्रास होऊ शकतो. त्यामुळे त्वचा लालसर आणि कोरडी होऊ शकते.