Skin Care Tips : तुमच्यापैकी अनेक जण त्वचेसंबंधित समस्या दूर करण्यासाठी विविध घरगुती उपचार करून पाहतात. विशेषत: त्वचेची काळजी घेण्याच्या दृष्टीने अनेकदा घरगुती उपायांचा अवलंब करण्याचा सल्ला दिला जातो. पण, स्वयंपाकघरातील काही पदार्थ तुमच्या त्वचेसाठी योग्य असतीलच, असे नाही. त्यामुळे कोणतीही गोष्ट चेहरा किंवा हाता-पायांच्या त्वचेवर लावताना जरा काळजी घ्या. अन्यथा, त्वचेचा लालसरपणा, पुरळ, कोरडेपणा आणि इतर समस्या उदभवू शकतात.

चेहऱ्यावर चुकूनही लावू नका ‘हे’ पदार्थ

१) बेकिंग सोडा

बेकिंग सोडा अनेकांच्या स्वयंपाकघरात असतोच. बऱ्याचदा पीठ मऊ /फ्लफी करण्यासाठी त्याचा वापर केला जातो. तसेच स्वयंपाकघर स्वच्छ करण्यासाठीही तो प्रभावी मानला जातो. काही जण त्वचेवरील टॅंनिंग दूर करण्यासाठी बेकिंग सोड्याचा वापर करतात. पण, बेकिंग सोडा थेट त्वचेवर लावू नका; अन्यथा त्वचेवर रॅशेस आणि लालसरपणा यांसारख्या समस्या उदभवू शकतात. बेकिंग सोड्याने त्वचेची पीएच पातळी खराब होते आणि त्यामुळे त्वचेतील नैसर्गिक तेलकटपणा कमी होतो.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Diy summer skin care never apply these 4 kitchen ingredients on face can harm your skin sjr
First published on: 01-05-2024 at 01:03 IST