Heat Rashes and Sunburns : सध्या दिल्लीसह अनेक शहारांतील तापमान ५० अंशांच्या जवळ पोहोचले आहे. अशा परिस्थितीत उष्माघात, पाठीवर पुरळ येणे, त्वचेवर खाज सुटणे आणि जळजळ यामुळे प्रत्येकजण त्रस्त आहे. अशा परिस्थितीत तुम्ही त्वचेवर औषधी गुणधर्म असलेल्या २ पानांचा वापर करू शकता. या पानांचे वैशिष्ट म्हणजे, त्यात अँटीबॅक्टेरियल आणि अँटीफंगल गुणधर्म आहेत. ज्यामुळे ते त्वचेची जळजळ, घामोळे कमी करण्यास मदत करू शकतात.

याशिवाय या पानांच्या पेस्टमध्ये शरीरात थंडावा निर्माण करण्याचेही गुणधर्म आहेत. याशिवाय ही दोन्ही पाने त्वचेसाठी अनेक प्रकारे फायदेशीर आहेत. आपण या सर्व गोष्टींबद्दल जाणून घेऊ पण त्याआधी ती २ औषधी पानं कोणती आणि त्या पानांचा वापर कसा करायचा ते जाणून घेऊया.

How to protect your skin from common infections during monsoon Tips
पावसाळ्यात त्वचेच्या आणि केसांच्या समस्या त्रास देऊ शकतात; ‘या’ उपायांनी मिळवा लगेच आराम
these five things should keep in your car in monsoon
पावसाळ्यात कार घेऊन बाहेर पडताय? मग गाडीमध्ये ‘या’ पाच गोष्टी असायलाच हव्यात! पाहा यादी
prevent allergies this monsoon
“आला पावसाळा, आरोग्य सांभाळा!” मान्सूनमध्ये ‘या’ सात पदार्थांचे सेवन करून संसर्ग टाळा
Essential motorcycle gear to carry during monsoon rides
पावसाळ्यात फिरायला जाताय? मग अशी करा तयारी; ‘या’ गोष्टींकडे दुर्लक्ष करणं पडू शकतं महागात
Instantly make fluffy coffee at home during monsoons
पावसाळ्यात घरीच झटपट बनवा फ्लफी कॉफी; नोट करा साहित्य आणि कृती…
how to take steam correctly
चेहऱ्यावर वाफ घेताना आवर्जून करा ‘ही’ गोष्ट; नाहीतर डोळ्यांना होऊ शकते इजा! लक्षात घ्या डॉक्टरांचा सल्ला….
benefits of pumpkin seeds
भोपळ्याच्या बिया अन् निळ्या रंगाच्या ‘या’ फळामुळे होणारे फायदे वाचा, सेवन करण्याची योग्य वेळ कोणती?
Five must-follow steps to rescue flooded car
पावसाळ्यात कार पूराच्या पाण्यात अडकल्यानंतर तर काय करावे? नेहमी लक्षात ठेवा या ५ गोष्टी

उन्हाळ्यात घामोळे, पुरळ यावर पुदिना आणि कडुलिंबाची पानं ठरतात गुणकारी

१) जळजळ होईल कमी

घामोळ्यांवर ही दोन्ही प्रकारची पानं अतिशय प्रभावीपणे काम करतात. यासाठी सर्वप्रथम पुदिना आणि कडुलिंबाची पाने पाण्याने धुवून घ्या. नंतर मिक्सरमध्ये बारीक करून त्यात लिंबाचा रस घालून घामोळ्यांवर लावा. ही पेस्ट काही दिवस सतत अंघोळीपूर्वी लावली आणि नंतर हलक्या हाताने स्क्रब करा आणि पाण्याने धुवून टाका, अशाने घामोळे कमी होण्यास मदत होईल.

२) खाज, पुरळपासून आराम

खाज, पुरळ यापासून आराम मिळवण्यासाठी तुम्ही पुदिना आणि कडुलिंबाच्या पानांमध्ये कोरफडीचा गर मिसळून वापरू शकता. यामुळे खाज सुटण्यापासून आराम मिळतो आणि त्वचा आतून थंड होते. कोरफड उष्माघातामुळे होणारा त्वचेचा त्रास कमी करण्यास मदत करू शकते. त्यामुळे उन्हाळ्यात त्वचेवर खाज सुटल्यास त्यावर कोरफडीचा वापर करावा.

या दोन उपायांव्यतिरिक्त तुम्ही पुदिना आणि कडुलिंबाची पाने बारीक त्यात कापूर आणि लवंगाचे तेल मिक्स करुन घामोळ्यांवर लावू शकता. हे दीर्घकाळ प्रभावीपणे कार्य करते आणि चेहऱ्यावरील सर्व प्रकारचे डाग कमी करण्यास मदत करते. याशिवाय तुम्ही पुदिना आणि कडुलिंबाची पेस्ट चंदनात मिसळून पाठीवर लावू शकता. त्यामुळे उन्हाळ्यात तुम्ही उष्णतेमुळे पाठीवर येणारे पुरळ कमी करण्यास मदत मिळू शकते.