Sun Tan Removal Tips: कडक उन्हाळा सुरू झाला असून त्वचेसंबंधित तक्रारीदेखील वाढत आहेत. सकाळी १० वाजल्यापासूनच उन्हाच्या तीव्र झळा सहन कराव्या लागत आहेत. यात ऑफिस, शाळा, कॉलेजनिमित्त घराबाहेर पडावेच लागते. अशाने काही मिनिटांत चेहरा काळा पडतो. तेलकटपणा वाढतो आणि त्वचेची आग आग होऊ लागते. काही महागडे स्कीन केअर प्रोडक्ट्स वापरले तरी काही फरक पडत नाही, टॅनिंगमुळे तुमचा चेहरा निस्तेज दिसू लागतो. पण, तुम्ही काही घरगुती उपाय करून चेहऱ्यावरील टॅनिंग काढून पुन्हा चमकदार त्वचा मिळवू शकता.
चेहऱ्यावरील टॅनिंग दूर करण्यासाठी घरगुती उपाय
चंदनाचे फायदे : त्यातील घटक त्वचेला थंडावा देतात.
कॉफीचे फायदे : यातील गुणधर्म त्वचेवरील मृत पेशी काढून टाकण्याचे काम करतात.
हळदीचे फायदे : यातील अँटी बॅक्टेरियल गुणधर्म चेहऱ्यावरील डाग-पिंपल्स काढून टाकण्यास मदत करतात.
दुधाचे फायदे : त्यातील लॅक्टिक ॲसिड, जीवनसत्त्वे आणि प्रोटीन त्वचेच्या मृत पेशी काढून टाकण्यास मदत करतात, ज्यामुळे त्वचा चमकदार होते.
साहित्य :
१ चमचा चंदन पावडर
१ चमचा कॉफी पावडर
चिमूटभर हळद
१ किंवा २ मोठे चमचे दूध
एका वाटीत चंदनाची पावडर आणि कॉफी मिसळा, त्यात हळद घाला आणि घट्ट पेस्ट बनवण्यासाठी त्यात हळूहळू दूध घाला. चेहऱ्याला लावण्यापूर्वी आपला चेहरा स्वच्छ धुवा. ही पेस्ट आपल्या संपूर्ण चेहऱ्यावर, मानेवर लावा आणि १५ ते २० मिनिटे तशीच राहू द्या. ती सुकल्यावर आपल्या बोटांनी हलकी ओली करून चेहऱ्यावर हलक्या हातांनी मालिश करा, नंतर चेहरा थंड पाण्याने धुवा.
