Tulsi plant maintain Tips : तुळशीच्या रोपाला हिंदू धर्मात शुभ मानले जाते. घराच्या बाल्कनीत किंवा अंगणात तुळशीचे रोप ठेवल्याने नरात्मकता दूर राहते. त्यामुळे धार्मिक कार्यातही तुळशीचा वापर केला जातो. तसेच आयुर्वेदातही औषध म्हणून तुळशीला विशेष महत्व आहे. हिवाळ्यात अनेक जण तुळशीच्या पानांचा चहा पितात. पण तुम्ही पाहिलं असेल, हिवाळ्याच्या दिवसात तुळशीची पानं पिवळी पडून सुकून जातात, त्यामुळे हिवाळ्यात तुळशीच्या रोपाची जास्त काळजी घ्यावी लागते. अशावेळी रोपाची काळजी कशी घ्यावी असा प्रश्न पडतो. तुमच्याही बाल्कनीतील तुळशीच्या रोपाची पानं पिवळी पडून सुकत असतील तर तुम्ही खालील दिलेल्या चार टिप्स फॉलो करा, ज्यामुळे तुळशीची पानं पिवळी पडून सुकणार नाहीत, उलट तुळस पुन्हा हिरवीगार दिसेल. (Tulsi Plant Drying During Winter)९
तुळशीची पानं पिवळी पडल्यावर काय उपाय करावा? (How to prevent Tulsi plant from dying in winter)
१) शेणखत
हिवाळ्यात थंड हवेमुळे तुळशीची पाने पिवळी पडू लागली आणि सुकायला लागली तर अशावेळी कुंडीतील मातीत शेणखत घालू शकता. शेणखत कुंडीतील मातीत व्यवस्थित मिक्स करा, जेणेकरून ते मुळांपर्यंत पोहोचेल,
याबरोबर तुम्ही कोको पीटदेखील वापरू शकता. लक्षात ठेवा की, शेण कोरडे असावे. ओले शेणखत घातल्यास रोपाचे नुकसान होऊ शकते.
२) केळीच्या सालीचे खत
केळीच्या सालीचे खत तुळशीच्या रोपांसाठी खूप चांगले मानले जाते. हे खत तयार करण्यासाठी केळीच्या सालींचे छोटे तुकडे करून उन्हात वाळवा. नंतर ते बारीक करून त्याची पूड तुळशीच्या रोपामध्ये घाला. हे झाडांच्या वाढीसाठी खूप चांगले काम करते आणि पानांना पिवळे होण्यापासूनदेखील रोखते.
३) मोहरीची पेंड
हिवाळा येताच तुळशीची पाने पिवळी पडू लागल्यास रोपांच्या मुळाशी तुम्ही मोहरीची पेंड वापरू शकता. ही पेंड बारीक करून ती रोपाच्या मुळांपर्यंत पोहोचेल अशाप्रकारे कुंडीत मिसळा. ही पेंड दर २० दिवसांनी तुळशीच्या कुंडीत टाका, यामुळे तुमचे तुळशीचे रोप बहारदार होईल.
४) तुरटी
तुरटी खत म्हणूनही काम करते, त्यामुळे वनस्पती निरोगी राहण्यास मदत होते. यासाठी तुळशीच्या रोपामध्ये तुरटी पावडर टाका, यामुळे तुमच्या तुळशीच्या रोपाची पानं अगदी हिरवीगार दिसू लागतील.