यीस्टचे कृत्रिम गुणसूत्र तयार करण्यात यश

वैज्ञानिकांनी अतिशय गुंतागुंतीची पेशी रचना असलेल्या सजीवाचे कृत्रिम गुणसूत्र तयार केले आहे. मनोवांच्छित प्राणी व वनस्पती तयार करण्यासाठी या तंत्राचा उपयोग कालांतराने होऊ शकेल.

वैज्ञानिकांनी अतिशय गुंतागुंतीची पेशी रचना असलेल्या सजीवाचे कृत्रिम गुणसूत्र तयार केले आहे. मनोवांच्छित प्राणी व वनस्पती तयार करण्यासाठी या तंत्राचा उपयोग कालांतराने होऊ शकेल. कृत्रिम गुणसूत्र हे यीस्टच्या पेशीत टाकून सुरळितरीत्या वाढवण्यात आंतरराष्ट्रीय पथकाला यश आले असल्याचे सायन्स या नियतकालिकाने म्हटले आहे. न्यूयॉर्क विद्यापीठाच्या इन्स्टिटय़ूट फॉर सिस्टीम्स जेनेटिक्सचे संचालक जेफ बोके यांनी सांगितले.
युकारयोटिक पेशींचे प्रतिनिधित्व करणाऱ्या यीस्टची पेशी रचना गुंतागुंतीची असते. त्याच्या पेशीत एक केंद्रक व इतर अर्धपारपटले असतात. सर्व वनस्पती, प्राणी, माणूस यांच्यात युकारयोटिक  पेशी असतात. जीवाणूंच्या कृत्रिम गुणसूत्रांची निर्मिती करण्यात यापूर्वी यश आले होते, आता हे पुढचे पाऊल आहे. जीवाणूंच्या पेशी प्रोकारयोटिक प्रकारच्या असतात. यीस्टचा वापर बिअर, जैवइंधने व औषधे तयार करण्यासाठी केला जातो. आता कृत्रिम गुणसूत्र तयार करता आल्याने त्यात जनुकीय बदल करणे शक्य आहे. बोके व त्यांच्या पथकाने म्हटले आहे की, यीस्टमधील सोळा गुणसूत्रांपैकी एकाची संकेतावली उलगडून त्यात बदल करण्यासाठी सॉफ्टवेअर तयार करण्यात आले.  त्यात कमी वापराचे भाग व पुनरावर्ती रचना काढण्यात आली. त्यामुळे कृत्रिम गुणसूत्राची निर्मिती करताना न्युक्लिओटाईसची म्हणजे जनुकांच्या रासायनिक बांधणीच्या मूलभूत घटकांची वेगळी रचना करण्यात आली. आतापर्यंत हे सर्वात जास्त बदल केलेले गुणसूत्र आहे असे बोके यांनी सांगितले. आम्ही या गुणसूत्राच्या डीएनए संकेतात ५० हजार बदल केले असून तरीही यीस्ट जिवंत आहे. यीस्टमध्ये ६ हजार जनुके अशी आहेत जी मानवी पेशींच्या कार्याशी संबंधित अशी आहेत.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Dna scientists hail synthetic chromosome advance