Don’t Brush Before Bed Your Heart Might Pay the Price : दातांची स्वच्छता ही एक छोटसी दैनंदिन सवय वाटते, पण तिचा परिणाम दात किंवा जठरावर होतोच पण हृदयावर गंभीर परिणाम होऊ शकतो. अ‍ॅनेस्थेसिओलॉजी आणि इंटरव्हेन्शनल पेन मेडिसिन तज्ज्ञ डॉ. कुणाल सूद यांनी अलीकडे Instagram वर सांगितले की,”झोपण्यापूर्वी दात न घासल्यास हृदयावर गंभीर परिणाम होऊ शकतो.”

हृदयाच्या आरोग्यासाठी दात घासणे का महत्वाचे? (Why Oral Hygiene is Essential for Heart Health)

एका कंटेट निर्मात्याच्या दाव्यावर प्रतिक्रिया देताना की, “जर तुम्ही झोपण्यापूर्वी दात घासले नाहीत, तर हृदयविकाराचा धोका जास्त असतो,” डॉ. सूद यांनी सहमत होत सांगितले की,”तोंडाची स्वच्छता अत्यंत आवश्यक आहे आणि ती हृदयाच्या आरोग्यासाठी संरक्षणात्मक फायदे देते.”

त्यांनी इशारा दिला, “जर तुम्ही रात्री दात घासले नाही तर तर तुम्ही फक्त दातांची समस्या निर्माण करत नाही, हृदयालाही धोका निर्माण होऊ शकतो.” २०२३ मध्ये झालेल्या एका अभ्यासाचा उल्लेख करत ते म्हणाले की, “तोंडाची नीट काळजी न घेतल्यास हृदयविकार आणि हृदय बंद पडण्याचा धोका वाढतो”

तोंडातील जीवाणू आणि हृदयाची समस्या (How Mouth Bacteria Affect the Heart)

डॉ. सूद यांनी स्पष्ट केले, “सिद्धांत असा आहे की, तोंडातील जीवाणू रक्तप्रवाहात जातात आणि हृदयावर दीर्घकाळापर्यंत परिणाम करणारी सूज निर्माण करतात.” त्यांनी स्पष्ट केले की,”झोपण्यापूर्वी दात न घासल्यामुळे थेट हृदयविकार होत नाही, पण तोंडाची नीट काळजी न घेणे हृदयविकारास कारणीभूत ठरू शकणारा अनेक धोकेपैकी एक आहे.”

त्यांच्या म्हणण्यानुसार, “ज्यांना दात नियमित घासण्याची सवय आहे, त्यांचे हृदय अधिक निरोगी असते. दिवसातून किमान तीन वेळा दात घासणे आणि नियमित दंत तपासणी करणे हृदयविकाराचा धोका कमी करण्यास मदत करते. तसेच दाढांचे दुखणे,, दात पडणे यासारख्या दंत समस्या कमी होतात. हृदयाचे आरोग्य टिकवण्यासाठी दात घासणे सर्वात सोप्या उपायांपैकी एक आहे.”

जीवाणू कसे सूज निर्माण करतात? (How Bacteria Trigger Inflammation)

सार्वजनिक आरोग्य तज्ज्ञ डॉ. जगदीश हिरेमठ यांनी दी इंडियन एक्स्प्रेसला सांगितले की, “रात्री दात न घासल्यास तोंडात प्लाक आणि जीवाणू जमा होतात. हे जीवाणू विषारी पदार्थ सोडतात जे रक्तप्रवाहात प्रवेश करून संपूर्ण शरीरात सूज निर्माण करतात.”

दीर्घकाळासाठी ही सूज रक्तवाहिन्यांच्या आतील अस्तरावर(Lining) परिणाम करू शकते, ज्यामुळे धमन्यांमध्ये प्लाक तयार होतो आणि हृदयविकाराचा धोका वाढतो. प्रत्येकजण ज्याचं तोंड नीट स्वच्छ नसतो, त्याला हृदयविकार होईलच असे नाही, पण तोंडाची काळजी घेणे सूज कमी करण्याचा आणि हृदयाचे आरोग्य टिकवण्याचा महत्त्वाचा मार्ग आहे.

हृदय-आरोग्यासाठी दंत काळजी कशी एकत्र करता येईल? (Integrating Oral Care into Heart-Healthy Routine)

डॉ. हिरेमठ म्हणाले की, “व्यक्ती आपले हृदय आरोग्य असे तपासू शकतात: रक्तदाब, कोलेस्ट्रॉल, रक्तातील साखर, कौटुंबिक इतिहास, आहार, व्यायाम आणि धूम्रपान यांसारखे जीवनशैली घटक पाहून.

“नियमित दात घासणे,फ्लॉसिंग(फ्लॉसिंग म्हणजे दातांच्या मधल्या अरुंद जागा स्वच्छ करण्याची प्रक्रिया) करणे आणि दंत तपासण्या हृदयासाठी आरोग्यदायी सवयींशी जुळतात. सुरुवातीला दाढांमध्ये दिसणारी समस्या त्वरित सोडवणे हृदय आणि दंत आरोग्य टिकवण्यासाठी महत्त्वाचे आहे,” असे ते स्पष्ट करतात.

व्यस्त जीवनशैली असलेल्या लोकांसाठी टिप्स (Practical Steps for Busy Individuals)

डॉ. हिरेमठ यांच्या मते, नियमितता अत्यंत महत्त्वाची आहे. दिवसातून किमान दोन वेळा दोन मिनिटे दात घासणे, आणि दुपारी एकदा जलद दात घासणे उपयुक्त ठरते. झोपण्यापूर्वी फ्लॉसिंग किंवा इंटरडेंटल ब्रश वापरून प्लाक काढता येतो.

“कामावर किंवा बॅगेत ट्रॅव्हल टूथब्रश आणि टुथपेस्ट ठेवल्यास दात घासणे कधीही सोडले जात नाही. सहा महिन्यांनी नियमित दंत तपासणी केल्यास सुरुवातीला समस्या ओळखता येतात आणि दीर्घकाळ तोंडाचे आणि हृदयाचे आरोग्य राखले जाऊ शकते,” असे ते म्हणाले.