सावधान! मांसाहार खाल्ल्यावर आरोग्यावर होतील हे घातक परिणाम, तज्ज्ञांनी सांगितलेला सल्ला एकदा वाचाच | Loksatta

सावधान! मांसाहार खाल्ल्यावर आरोग्यावर होतील हे घातक परिणाम, तज्ज्ञांनी सांगितलेला सल्ला एकदा वाचाच

आहारात मांसाहाराचा समावेश केल्यावर आरोग्यावर कोणते घातक परिणाम होतात?याविषयी तज्ज्ञांनी माहिती दिली आहे.

सावधान! मांसाहार खाल्ल्यावर आरोग्यावर होतील हे घातक परिणाम, तज्ज्ञांनी सांगितलेला सल्ला एकदा वाचाच

Non-Veg Side Effects : आताच्या जमान्यातील व्यस्त जीवनशैलुमीळं बहुतांश लोक शरीराची योग्यप्रकारे काळजी घेत नाहीत. याच कारणामुळं बहुतांश लोक अनेक प्रकारच्या समस्यांनी ग्रस्त असतात. अशा परिस्थितीत हेल्दी आणि फिट राहण्यासाठी संतुलित आहारावर लक्ष देणं आवश्यक असतं. आपण ज्या पदार्थांचे सेवन करतो, त्याचा आरोग्यावर कसा परिणाम होतो, याबाबत न्यूयॉर्कमधील बर्गन विश्वविद्यालयातील तज्ज्ञांनी शोध लावला आहे. आहारात मांसाहाराचा समावेश केल्यावर आरोग्यावर कोणते घातक परिणाम होतात, याविषयी तज्ज्ञांनी माहिती दिली आहे.

रेड मीट, चिकन आणि अन्य प्रकारच्या मांसाहाराचे सेवन केल्यास लठ्ठपणा, मधुमेह आणि कर्करोगासारखे भयंकर आजार होण्याची शक्यता असते. त्यामुळे आहारात मांसाहाराचा समावेश न करण्याचा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे. सतत मांसाहार खाल्ल्याने माणसाच्या सरासरी आयुष्यात घट होऊ शकते. अतिप्रमाणात मांसाहार खाल्ल्याने गंभीर आजार होण्याची शक्यता असते. त्यामुळं मांसाहार खाणे टाळणे, हे आरोग्यासाठी फायदेशीर ठरु शकते. मांसाहार न खाता आहारात भात, हिरव्या भाज्या आणि फळांचा समावेश केल्यास आरोग्या निरोगी राहू शकते.

खूप मांस खाल्ल्याने होतं नुकसान

Health Line च्या एका रिपोर्टनुसार, प्लांट-बेस्ड प्रोटिनच्याऐवजी एनिमल-बेस्ड प्रोटिनचं सेवन आरोग्यासाठी खूप घातक ठरू शकतं. कारण मांसाहार खाल्ल्याने तुमची हाडे कमकुवत होऊ शकतात. जी माणसं सतत मांसाहार खात असतात, त्यांना हाडांच्या आणि ऑस्टियापोरोसिसच्या समस्यांना सामोरं जावं लागतं.

९ प्रकारच्या आजारांचा धोका

ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीच्या बीएमसी मेडिसन (BMC Medicine) नावाच्या जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या नव्या स्टडीत याबाबत माहिती देण्यात आली आहे. जर एखादा व्यक्ती आठवड्यात ३ दिवस किंवा त्यापेक्षा अधिक वेळ रेड मीट, प्रोसेस्ड मीट आणि पोल्ट्री मीटसारख्या चिकन आणि टर्कीचं सेवन करत असेल, तर त्या व्यक्तीला ९ वेगवेगळ्या प्रकारचं आजार होण्याचा धोका वाढू शकतो.

नक्की वाचा – २४ तासात यूरिक अॅसिड शरीराबाहेर फेकू शकतं ‘हे’ पाणी? तज्ज्ञांनी सांगितले खास फायदे

तज्ज्ञ काय सल्ला देतात?

सेलिब्रिटी न्यूट्रिशनिस्ट अंजली मुखर्जाने इन्स्टाग्राम पेजच्या माध्यमातून सांगितलं की, प्रोटिन हाडांच्या आरोग्यासाठी आवश्यक आहे. पण रेड मीटचं सेवन केल्यावर हाडांवर त्याचा विपरीत परिणाम होऊ शकतो. त्यामुळे आपल्याला आहारात दूध आणि भाज्यांमध्ये असलेल्या प्रोटिनचा समावेश केला पाहिजे. भरपूर प्रमाणात फळ, भाज्या आणि डाळ खाऊन शरीरात आवश्यक ते प्रोटिन प्राप्त करु शकता.

कॅल्शियमची प्रमाण कमी असल्यास धोका

अंजली मुखर्जी यांनी म्हटलं की, एक हाय प्रोटिन डाएट तुमच्या हाडांवर प्रभावी ठरू शकतं आणि त्यामुळे कॅल्शियमचं प्रमाण कमी होऊ शकतं. रेड मीटच्या सेवनामुळं कॅल्शियमचं प्रमाण कमी होऊ हाडे कमकुवत होतात. त्यामुळे तुम्हाला मासांहार खाण्याचं योग्य प्रमाण ठेवावं लागेल.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल ( Lifestyle ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 31-01-2023 at 10:17 IST
Next Story
योनीतुन सतत व्हाईट डिस्चार्ज होतो? ‘या’ २ आयुर्वेदिक उपायांनी तुमची रोजची अडचण सोडवा