scorecardresearch

Diabetes Tips: मधुमेहाच्या रुग्णांसाठी मोठी बातमी! साखर खाणं सोडाच, पण या पदार्थांचं सेवन करणंही तितकच घातक

मधुमेह झालेले रुग्ण आणि ज्यांना हा आजार नाही, अशा व्यक्तींनीही या पदार्थांचं सेवन प्रमाणात केलं पाहिजे.

Diabetes Tips: मधुमेहाच्या रुग्णांसाठी मोठी बातमी! साखर खाणं सोडाच, पण या पदार्थांचं सेवन करणंही तितकच घातक
मधुमेह झालेल्या रुग्णांनी हे पदार्थ खाणे टाळा. (image-freepik)

मधुमेह झालेल्या रुग्णांना साखरेपासून बनवलेले गोड पदार्थ खाणे आरोग्यासाठी धोकादायकच ठरतं. त्यामुळे गोड खाण्यापासून सावध राहण्याचा सल्ला अशा रग्णांना नेहमी दिला जातो. साखरेप्रमाणेच असे काही पदार्थ आहेत, जे तुमच्या शरीरितील ब्लड शुगर लेवल वाढवतं. मधुमेह झालेले रुग्ण आणि ज्यांना हा आजार नाही, अशा व्यक्तींनीही या पदार्थांचं सेवन प्रमाणात केलं पाहिजे.

मधुमेह आजारापासून सुटका करण्यासाठी सर्वात पहिले साखरेच्या पदार्थाचं सेवन करणं थांबवलं पाहिजे. त्यामुळे साखर किती प्रमाणात खायची, याबाबत लोकांना काळजी वाटते. मधुमेह आजार होण्याला साधारणत: साखर कारणीभूत असल्याचं मानतात. मात्र, जे पदार्थ आपण नियमितपणे सेवन करतो, ते पदार्थ साखरेप्रमाणेच घातक असतात, याचा आपण विचारही करत नाहीत. साखरेप्रमाणेच काही पदार्थ असे आहेत, जे रक्तातील शर्कराचं प्रमाण वाढवतं. त्यामुळे मधुमेह झालेल्या रुग्णांसाठी हे पदार्थ अतिधोकादायक आहेतच, पण सामान्य माणसांच्या आरोग्यासाठीही या पदार्थांचा परिणाम होऊ शकतो.

नक्की वाचा – ‘या’ फळांमुळे वाढू शकते रक्तातील साखर; मधुमेहाच्या रुग्णांनी वेळीच व्हा सावध

१) पॅक्ड स्नॅक्स

पॅक्ड स्नॅक्स रक्तात साखरेचं प्रमाण वाढवण्याला जबाबदार असतात. चिप्स, वेफर्स, कुकीज सारख्या स्नॅक्समध्ये मीठाचं प्रमाण जास्त असतं, तसंच हे पदार्थ मैद्यापासून बनवलेले असतात. त्यामुळे शरीरातील रक्त शर्कराचे प्रमाण वाढवण्याला हे पदार्थ जबाबदार असतात. या पदार्थांच्या सेवनामुळं मधुमेह झालेल्या रुग्णांच्या आरोग्यावर मोठा परिणाम होतो. तुम्हाला स्नॅक्स खायची इच्छा झाल्यास, त्या स्नॅक्सच्या पॅकेटवरील कार्बोहायड्रेटचं प्रमाण बघून घ्या आणि ज्यामध्ये कार्बचं प्रमाण कमी आहे, त्या पदार्थाचं सेवन करा.

२) अल्कोहोलिक ड्रिंक्स

अल्कोहोलिक ड्रिंक्समध्ये साखर आणि कार्ब्सचं प्रमाण अधिक असतं. याच कारणास्तव मधुमेहग्रस्त लोकांना अल्कोहोलिक ड्रिंक्सचं सेवन न करण्याचा सल्ला दिला जातो. मधुमेहापासून दूर राहण्यासाठी डॉक्टरांकडून अशाप्रकारचे ड्रिंक्स न पिण्याचा नेहमीच सल्ला दिला जातो. कारण या ड्रिंक्सच्या सेवनामुळं (हायपोग्लायसीमिया) ब्लड शुगरची समस्या उद्धवते. या आजारामुळं माणसाचा मृत्यू होऊ शकतो.

हेही वाचा – डायबिटीज रुग्णांसाठी ‘हा’ सुका मेवा ठरतो विषासमान? काजू बदाम खाल्ल्याने शरीरात होतात ‘हे’ बदल

३) फळांचा ज्यूस

फळांजा ज्यूसही मधुमेह झालेल्या रुग्णांसाठी खूप धोकादायक असतो. सुखा मेवाप्रमाणेच फळांच्या ज्यूसमध्येही मोठ्या प्रमाणावर साखर असते. ज्यामुळे शरीरातील ब्लड शुगर वेगानं वाढते. यामध्ये विटॅमिन्स आणि खनिजं असतात. कारण यामध्ये समावेश केलेल्या साखरेमुळं मधुमेह झालेल्या रुग्णांना ज्यूस पिताना काळजी घेतली पाहिजे.

४) ड्राय फ्रूट

फळांमध्ये मोठ्या प्रमाणावर साखरेचं प्रमाण असतं. तसंच फळांपासून बनवलेल्या ड्राय फ्रूट्समध्ये मोठ्या प्रमाणावर साखरेचं प्रमाण असतं. तसंच यामध्ये कार्ब्सही असतं. एक कप द्राक्षांमध्ये २७ ग्रॅम कार्ब्स असतात. तर एक कप किशमीश मध्ये कार्बोहायड्रेटचं प्रमाण तीन पट जास्त असतं. याच्या सेवनामुळं मधुमेह झालेल्या रुग्णांचं ब्लड शुगरचं प्रमाण खूप वेगानं वाढतं. त्यामुळे ज्या ड्राय फ्रूटमध्ये साखरेचं प्रमाण कमी असतं, अशा पदार्थांचे सेवन करणं फायदेशीर ठरेल.

नक्की वाचा – Diabetes मुळे कमी होऊ शकते रोगप्रतिकारक शक्ती; त्यावर ‘हे’ पदार्थ ठरतात गुणकारी

५) फ्राईड फूड्स

तळलेल्या खाद्य पदार्थांमध्ये मोठ्या प्रमाणावर कॅलरी असते. जी ब्लड शुगरचं प्रमाण वाढवू शकते. असे खाद्य पदार्थ शरीरातील ग्लुकोजचं प्रमाण वाढवतं. तसंच या पदार्थांमध्ये असेल्या फॅट्सच्या पचनक्रियेला वेळ लागतो. त्यामुळे ब्लड शुगरचं प्रमाण वाढत राहतं. तसंच कुकीज, केक, पिझ्झा आणि बर्गर यामध्येही असलेल्या ट्रान्स फॅटमुळं अन्य आजारांचा धोका उद्धवतो.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल ( Lifestyle ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 07-12-2022 at 11:34 IST

संबंधित बातम्या