आपण ऑनलाईन ऑर्डर केलेली एखादी खास वस्तू, एखादा आवडता खाद्यपदार्थ आपल्याला लवकरात लवकर घरपोच मिळणं म्हणजे आनंदच. पण ती वस्तू आपल्यापर्यंत पोहोचवणाऱ्या व्यक्तीचा अर्थात डिलीव्हरी बॉयचा, त्यांच्या कष्टांचा, त्यांना येणाऱ्या समस्यांचा आपण कधी गांभीर्याने विचार केलाय का? आपण आपल्या कामात व्यस्त आहोत म्हणून त्यांना ताटकळत ठेवणं किंवा त्यांना यायला उशीर झाला म्हणून चिडणं, डाफरणं ह्यापलीकडे अनेकांचे विचार आणि वर्तन जातच नाहीत. त्यांनाही आपल्याकडून फार काही अपेक्षा नसतातच. पण एक गोष्ट मात्र ते आवर्जून सांगतात. ती म्हणजे “प्लीज आठवणीने रेटिंग द्या”. पण आपण त्याकडे सोयीस्कर दुर्लक्ष करतो. पण खरंच एखाद्या डिलिव्हरी बॉयसाठी आपण देतो त्या रेटिंगची किंमत तुम्हाला माहितीय का?

हा प्रश्न आताच विचारण्यामागचं कारण काय? हा विषय आत्ताच चर्चेत का येतोय? तर आर जे सायेमा हिने डिलिव्हरी बॉयशी संबंधित या अत्यंत महत्त्वपूर्ण विषयाला वाचा फोडली आहे. सायेमा हिने एका रेडिओ मुलाखतीच्या निमित्ताने काही डिलिव्हरी बॉयसोबत बोलल्यानंतर स्वतः ला जाणवलेल्या काही गोष्टींवर एका व्हिडिओच्या माध्यमातून भाष्य केलं आहे. ह्या व्हिडीओमध्ये त्यांनी डिलिव्हरी बॉयच्या समस्या सांगत सत्यपरिस्थिती समोर ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. सोबतच लोकांना एक महत्त्वाचं आवाहनही केले आहे. सायेमा यांचा हा व्हिडीओ हृदयस्पर्शी आणि प्रत्येकाला विचार करायला लावणारा आहे.

Saving
बचत फक्त मोठ्यांनी नाही, लहानांनीही करावी! मुलांना अर्थसाक्षर बनवण्यासाठी ‘या’ गोष्टी ठरतील फायदेशीर
wife
पत्नीने तक्रार दाखल करणे क्रुरता नाही…
Career MPSC exam Guidance UPSC job
करिअर मंत्र
Brown Rice or White Rice
कोणता भात खावा पांढरा की ब्राऊन? तज्ज्ञांनी सांगितला कोणता तांदूळ आरोग्यासाठी फायदेशीर…

डिलिव्हरी बॉयसाठी आपली रेटिंग का आहे महत्त्वाची? सायेमा म्हणते…

  • आपल्या रेटिंग्जवरून ठरते कि संबंधित डिलिव्हरी बॉयला पुढच्या ऑर्डर्स मिळणार कि नाही.
  • तुम्हाला धक्का बसेल पण प्रत्येक ऑर्डरच्या डिलीव्हरी मागे डिलिव्हरी बॉयला फक्त २० रुपये मिळतात.
  • इतकेच नव्हे तर ह्यासाठी लागणाऱ्या पेट्रोलचे पैसे देखील त्यांच्याच खिशातून जातात.

ह्या गोष्टी आठवणीने करा!

  • तुमची ऑर्डर घेऊन आलेल्या डिलिव्हरी बॉयला कृपया ताटकळत ठेवू नका. तुमची ऑर्डर लगेच रिसिव्ह करा.
  • तुमच्या रेटिंग्जचं त्यांच्यासाठी असणारं महत्त्व लक्षात घ्या. त्यांना रेटिंग्ज द्या. जेणेकरून त्यांना पुढच्या जास्तीत जास्त ऑर्डर्स मिळतील.

संवेदनशीलता आणि संयम ठेवा!

  • ऑर्डर डिलिव्हरीसाठी कधी त्यांना उशीर झालाच तर त्यांच्यावर चिडू नका. संयम ठेवा, थोडी संवेदनशीलता दाखवा. ट्रॅफिक, पाऊस ह्याचा फटका त्यांनाही बसतो, हे लक्षात घ्या.
  • त्यांच्या कष्टाचा, कामाचा आदर करा. त्यांनी दिलेली सर्व्हिस तुम्हाला आवडली तर किमान मनापासून कौतुक नक्की करा.