Hair Care: सध्या वाढत्या प्रदूषणात केसांची योग्य काळजी घेणं गरजेचं आहे. पावसाळ्यात तर केसांची विशेष काळजी घेतली पाहिजे. हवेतील धूळ, बाहेरील ओलावा यामुळे केस खराब होतात. तसंच केसांमध्ये कोंडा, खाज अशा समस्या देखील निर्माण होतात. त्याचप्रमाणे आपल्या केसांमध्ये घाम आणि अनेक प्रकारची रासायनिक उत्पादने वापरल्यानंतर, कधीकधी टाळूवर खाज देखील सुटू शकते आणि सूज येऊ शकते. यापासून सुटका मिळवण्यासाठी तुम्ही कोणतेही उपचार घेण्यापेक्षा स्कॅल्प फेशियल करू शकता. आजकाल स्कॅल्प फेशियल खूप ट्रेंडमध्ये आहे, लोकांना ते करून घेणे देखील आवडते. चला तर मग जाणून घेऊया स्कॅल्प फेशियल म्हणजे नेमकं काय.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

स्कॅल्प फेशियल म्हणजे काय?

स्कॅल्प फेशियल हा एक प्रकारचा उपचार आहे जो आजकाल खूप प्रचलित आहे. नाव ऐकल्यावर हे स्पष्ट होते की ते टाळूवर केले जाते. यामध्ये स्कॅल्प खोलवर साफ करणे, स्क्रबिंग आणि स्कॅल्प मास्क या गोष्टी यात समाविष्ट आहेत. तुम्ही विचार करत असाल की ते टाळूचे असताना फेशियल कसे म्हणता येईल? याला फेशियल म्हणतात कारण टाळू साफ करणे, एक्सफोलिएटिंग आणि मॉइश्चरायझिंग या सारख्याच प्रक्रियेतून हे केले जाते. असे केल्याने केसांचे अतिरिक्त तेल कमी होते आणि फॉलिकल्समध्ये साचलेली घाण निघून जाते. स्कॅल्प फेशियलमुळे केसांसंबंधीत असलेल्या समस्या देखील बऱ्या होतात. तसंच टाळू चांगल्या प्रकारे स्वच्छ झाल्याने, केसांची चांगली वाढ देखील होते.

पाहा व्हिडीओ –

( हे ही वाचा: पावसाळ्यात केसांची काळजी घेण्यासाठी ‘या’ तेलांचा वापर करा; मिळतील आश्चर्यकारक फायदे)

हे फेशियल कसे केले जाते?

१) हे करण्यासाठी, आपण स्कॅल्प मास्क, तेल किंवा स्क्रबने सुरुवात करावी. जर तुमच्या टाळूला खाज येत असेल तर तुम्हाला कोंडा होण्याची समस्या असू शकते. अशावेळी स्क्रबचा वापर करावा. जर टाळू जास्त तेलकट असेल तर केसांमधले अतिरिक्त तेल कमी होईल असे उत्पादन वापरा.

२) पहिल्या टप्प्यात तुम्ही उत्पादन पूर्णपणे लागू केल्यानंतर, काही वेळ ठेवल्यानंतर मसाज करा. हे किमान तीन ते पाच मिनिटे करा. या मसाजमुळे त्वचेच्या पेशी मऊ होतात, त्यामुळे रक्त प्रवाह आणि केसांची वाढ देखील होते.

३) नीट मसाज केल्यावर केस चांगले धुवा. यासाठी डिटॉक्सिफायिंग आणि हायड्रेटिंग शैम्पू वापरा. सल्फेट मुक्त शैम्पू वापरून पहा. शॅम्पू थेट टाळूला लावा आणि आठवडयातून दोन ते तीन वेळा केस धुण्याचे लक्षात ठेवा जेणेकरुन तुमच्या टाळूचे नैसर्गिक मॉइश्चरायझिंग तेल निघून जाणार नाही.

४) शॅम्पू केल्यानंतर, टाळूच्या टोकांना वेगळे कंडिशनर लावा. ते त्वचेला हायड्रेट ठेवताना जास्त ओलावा कमी करण्यास मदत करते. कंडिशनर दोन ते तीन मिनिटे तसेच राहू द्या.

5) शेवटी, केसांचे आरोग्य वाढवणाऱ्या सिरम किंवा लोशनने तुमचे स्कॅल्प फेशियल पूर्ण करा.

हे फेशियल कोणी करावे?

जे लोक आपले केस रोज स्वच्छ करत नाहीत. किंवा ज्यांना टाळूला खाज, कोंडा किंवा टाळूसंबंधित समस्या असेल, अशा लोकांनी ते करून घ्यावे. स्कॅल्प फेशियल कोणत्याही प्रकारची समस्या दूर करते आणि फॉलिकल्सला मॉइश्चरायझ करते. हे केल्यावर तुमचे केस निरोगी आणि चांगले घन दिसू लागतात

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Do scalp facials for take care of hair learn how to work gps
First published on: 07-07-2022 at 15:20 IST