Diabetes Control: मधुमेह हा आजार आता सामान्य बनत चालला आहे. बदलत्या जीवनशैलीमुळे आणि चुकीच्या आहार पद्धतीमुळे आता कमी वयात देखील लोकांना मधुमेह आजार होऊ लागला आहे. प्रत्येक घरात एक तरी रुग्ण मधुमेह ग्रस्त असलेला पाहायला मिळतो. मधुमेह हा आजार पूर्णपणे बरा होत नाही मात्र नियंत्रणात आणता येतो. रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात आणण्यासाठी दैनंदिन सवयींपासून ते आहार आणि इतर कामांमध्ये अनेक बदल करावे लागतात. मधुमेहाच्या रुग्णांना अशी दिनचर्या करावी लागते जेणेकरून रक्तातील साखर खूप कमीही होऊ नये किंवा जास्त वाढू देखील नये. अशा स्थितीत सकाळी उठून अशी काही कामे करावी लागतात जी उपयुक्त ठरतात. जाणून घ्या या दिनक्रमात कोणत्या महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात.

रक्तातील साखरेची पातळी कशी नियंत्रित करावी | How To Control Blood Sugar Levels

रक्तातील साखर तपासा

टाईप २ मधुमेह असलेल्या लोकांनी दररोज सकाळी जेवण करण्यापूर्वी त्यांच्या रक्तातील साखरेची पातळी तपासली पाहिजे. यावरून कळते की रक्तातील साखरेचे प्रमाण किती आहे आणि दिवसभर कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी लागेल आणि कोणत्या प्रकारचा दिनक्रम पाळावा लागेल.

How to pick the best AC types cooling capacities BEE star ratings and more you know while purchasing AC
थंडगार हवा अन् वीज बचत दोन्ही हवंय? मग AC खरेदी करताना ‘या’ गोष्टींकडे द्या लक्ष; पैशांची होणार मोठी बचत
loksatta Health Special article, relationship between, skin disorders, diabetes
Health Special: त्वचाविकार आणि मधुमेह नेमका काय संबंध?
Matka Hygiene know the mistakes while drinking matka water or clay pot water
उन्हाळ्यात माठातील पाणी पिण्याआधी ‘या’ गोष्टींची घ्या काळजी; अन्यथा…
Benefits of Drinking Okra Water
एक महिना ‘हे’ पाणी प्यायल्याने झपाट्याने वजन होईल कमी; कोलेस्ट्रॉलही राहील नियंत्रणात, एकदा फायदे वाचाच!

( हे ही वाचा: Uric Acid: रात्रीच्या वेळी ‘या’ गोष्टी चुकूनही खाऊ नका; सांधेदुखीची समस्या वेगाने वाढू शकते)

नाश्ता वगळू नका

लक्षात ठेवा की मधुमेहामध्ये आहाराची मोठी भूमिका असते. त्यामुळे उशीर होत असला तरी नाश्ता वगळण्याची चूक करू नका. न्याहारी हे दिवसाचे सर्वात महत्वाचे जेवण आहे आणि ते वगळल्यास रक्तातील साखरेच्या पातळीवर परिणाम होऊ शकतो.

पायांकडे लक्ष द्या

मधुमेहाचा परिणाम थेट पायावर पडतो आणि मज्जातंतूंना इजा होण्याचा धोका असतो, त्यामुळे कधी कधी प्रकृती जास्त बिघडते तेव्हा पाय कापावे लागण्याची वेळ येऊ शकते. त्यामुळे दररोज सकाळी तुमचे पाय तपासा त्यावर काही पुरळ, सूज किंवा जखम नाही ना याची पडताळणी करून घ्या.

( हे ही वाचा: हिवाळ्यात कधी आणि किती पाणी प्यावे? तुम्हाला पाणी पिण्याची योग्य पद्धत माहित आहे का?)

नियमित व्यायाम करा

मधुमेहामध्ये वजन नियंत्रित ठेवण्यासाठी शारीरिक हालचाल करणे आवश्यक असते. रोज सकाळी काही व्यायाम करा किंवा मोकळ्या गवतावर चाला. याशिवाय, तुम्ही ऑफिसमध्ये असाल तर एकदातरी उठून, फिरा आणि लिफ्टऐवजी पायऱ्या चढा आणि उतरा.

शरीराला हायड्रेट ठेवा

शरीराला हायड्रेट ठेवणे देखील महत्त्वाचे आहे. सकाळी उठल्यावर पाणी प्या आणि घरातून बाहेर पडतानाही पाण्याची बाटली सोबत ठेवा. दिवसभर पुरेसे पाणी पिणे मधुमेहामध्ये फायदेशीर आहे. यासोबतच सकाळी थोडे लवकर उठून दुपारचे जेवण तयार करा आणि दुपारचे जेवण घेतल्यानंतरच घराबाहेर पडा.