Healthy Lifestyle : दररोजच्या धावपळीच्या आयुष्यात आपण अनेकदा आरोग्याकडे लक्ष देत नाही. अयोग्य आहार व व्यायामाचा अभाव व बैठी जीवनशैली यामुळे आरोग्याच्या अनेक समस्या निर्माण होत आहे. अनेकांना वजनवाढ किंवा थायरॉइडसारख्या समस्येचा सामना करावा लागतो. जर थायरॉइड असेल किंवा वजन वाढले असेल तर काय करावं, असा प्रश्न अनेकांना पडतो. पण टेन्शन घेऊ नका. आज आपण एका अशा योगासनाविषयी जाणून घेणार आहोत ज्याच्या मदतीने तुम्ही थायरॉईड कमी करू शकता किंवा वाढलेलं वजन कमी करू शकता.
सध्या एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक योगा अभ्यासक एका योगाविषयी माहिती सांगताना दिसत आहे. या योगाच्या मदतीने थायरॉइड कमी करण्यास आणि वजन कमी करण्यात मदत होऊ शकते. सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.
हेही वाचा : Kitchen Containers : मसाले, पीठ, बिस्किटे ठेवण्यासाठी कोणते कंटेनर वापरायचे? मग हे ५ पर्याय पाहा; स्वयंपाकघराचा लूकच बदलेल
थायरॉइड कमी करण्यासाठी दररोज करा हा व्यायाम
या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाल योग अभ्यासक दिसेल. त्या एक योग करत आहे. व्हिडीओत दाखवल्याप्रमाणे – सुरुवातीला एका जागेवर उभे राहा. त्यानंतर दोन्ही हात वर करा आणि पाठीपासून खाली वाकून वर केलेले हात तळपायाला स्पर्श करा. असे दररोज ५० वेळा करा. हा अगदी सोपा व्यायाम आहे. तुम्ही कुठेही वेळ मिळेल तसा हा व्यायाम करू शकता.
पाहा व्हायरल व्हिडीओ (Viral Video)
yogsparsh_93 या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “थायरॉइड साठी योगारुटीन” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “हा व्यायाम खूप सोपा आहे. मी नेहमी करते.”
या योग अभ्यासक त्यांच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून अनेक व्हिडीओ शेअर करतात. आरोग्याविषयी नवनवीन माहिती सांगतात. तसेच व्यायामाचे महत्त्व आणि फायद्यांविषयी सुद्धा माहिती सांगतात. त्यांना सोशल मीडियावर हजारो लोक फॉलो करतात आणि त्यांच्या प्रत्येक व्हिडीओवर लाइक कमेंट्स वर्षाव करतात.