Vegetables Stored In The Fridge: जास्त दिवसांसाठी घरात भाज्या साठवणे खूप कठीण आहे. अनेक जण सात-आठ दिवसांची भाजी एकदाच बाजारातून खरेदी करतात आणि रेफ्रिजरेटरमध्ये साठवतात. परंतु अयोग्य पद्धतीने भाज्या साठवून ठेवल्यामुळे त्या भाज्या जास्त काळ टिकत नाहीत आणि काही दिवसांत खराब होऊ लागतात. अशा रीतीने जास्त प्रमाणात आणलेल्या भाज्यांचे पौष्टिक मूल्य कमी होऊन त्या खराब झाल्याने पैसेही वाया जातात.तथापि, रेफ्रिजरेटरमध्ये भाज्या योग्यरीत्या साठवल्यास त्यांने शेल्फ लाइफ लक्षणीयरीत्या वाढू शकते. आज आम्ही तुमच्यासाठी काही टिप्स घेऊन आलो आहोत, ज्या तुम्ही फॉलो करू शकता.
भाज्या व्यवस्थित धुवा
भाज्या रेफ्रिजरेटरमध्ये ठेवण्यापूर्वी त्या चांगल्या प्रकारे स्वच्छ करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. भाज्या व्यवस्थित धुतल्याने कोणतेही जीवाणू आणि घाण निघून जाते. नंतर ओल्या भाज्या व्यवस्थित पुसून तुम्ही त्या रेफ्रिजरेटरमध्ये ठेवू शकता.
भाज्या एकत्र साठवू नका
वेगवेगळ्या प्रकारव्या भाज्या रेफ्रिजरेटरमध्ये एकत्र ठेवू नयेत. पालेभाज्या, हिरव्या भाज्या आणि कोबी, फ्लॉवर यांसारख्या भाज्या वेगवेगळ्या गटात ठेवा. त्यामुळे त्यांचे शेल्फ लाइफ वाढते आणि त्या खराब होण्याचा धोका कमी होतो.
टॉवेल किंवा हवाबंद कंटेनर वापरा
भाज्या धुतल्यानंतर हिरव्या भाज्या साठवण्यासाठी त्या कापडात गुंडाळा किंवा हवाबंद डब्यात ठेवा. दरम्यान, भाज्या धुतल्यानंतर त्यातील ओलावा काढून टाकण्यासाठी त्या स्वच्छ कपड्यावर किंवा टॉवेलवर सुकवण्यासाठी ठेवा.
या भाज्या कधीही रेफ्रिजरेटरमध्ये ठेवू नये
अशी काही फळे आणि भाज्या आहेत, ज्या चुकूनही रेफ्रिजरेटरमध्ये ठेवू नयेत. जर तुम्ही त्या फ्रिजमध्ये ठेवल्या, तर त्यामुळे त्या ठरावीक फळे आणि भाज्यांमध्ये आरोग्यासाठी हानिकारक असे विष निर्माण होऊ शकते.
कच्चा बटाटा- रेफ्रिजरेटरमध्ये कच्चा बटाटा ठेवल्यास त्याची चव बदलू शकते. त्याशिवाय त्यात हानिकारक घटकांची उत्पत्ती होते.
लसूण- अनेक जण बाजारातून सोललेला लसूण घेऊन येतात आणि तो रेफ्रिजरेटरमध्ये ठेवतात. हेदेखील हानिकारक आहे.
कांदा- फ्रिजमध्ये कांदा ठेवल्याने त्यातील स्टार्चचे साखरेत रूपांतर होते आणि त्यात बुरशीची वाढ होते. अर्धा चिरलेला कांदा चुकूनही फ्रिजमध्ये ठेवू नये.
शिजवलेला भात- अनेक महिला भात उरला असल्यास, तो फ्रिजमध्ये ठेवतात. परंतु, हे तुमच्या आरोग्यासाठी घातक ठरू शकते.
केळी- फ्रिजमध्ये केळी ठेवू नका. कारण- तसे केल्यामुळे ती काळी पडतात आणि त्यांची चवही बिघडते.
काकडी – काकडी लोक नेहमी फ्रिजमध्ये ठेवतात; पण १० डिग्री सेल्सिअसपेक्षा कमी तापमानात काकडी पटकन खराब होऊ लागते. फ्रिजमध्ये ठेवल्यास ती पिवळी पडते आणि तिची चव बिघडते. काकडी नेहमी खोलीच्या सामान्य तापमानावर ठेवावी.
टोमॅटो- टोमॅटो फ्रिजमध्ये ठेवले की, त्याची चव आणि सुगंध कमी होतो. थंड तापमानामुळे त्याची रचना बदलते. टोमॅटो नेहमी थंड आणि अंधाऱ्या ठिकाणी ठेवावा, जिथे थेट सूर्यप्रकाश पोहोचणार नाही. खोलीच्या तापमानावर ठेवलेले टोमॅटो फ्रिजमध्ये ठेवलेल्या टोमॅटोपेक्षा जास्त दिवस ताजे राहतात.
मोसंबी, लिंबू इत्यादी आंबट फळे रेफ्रिजरेटरमध्ये ठेवू नयेत.

