आजकाल चुकीची जीवनशैली आणि चुकीच्या आहारामुळे लोकांना छातीत दुखणे, हृदयाच्या समस्या, उच्च रक्तदाब इत्यादी अनेक आजारांना सामोरे जावे लागत आहे. सहसा, जेव्हा छातीच्या उजव्या बाजूला दुखते तेव्हा लोकांना असे वाटते की त्यांना हृदयाची समस्या आहे, परंतु प्रत्येक वेदना हृदयविकाराच्या झटक्याचीच असेल असे नाही. यामागे इतर अनेक कारणे आहेत, ज्यामुळे छातीच्या उजव्या बाजूला वेदना होतात. आज आपण जाणून घेणार आहोत की हृदयविकाराच्या झटक्याशिवाय इतर कोणती कारणे आहेत ज्यामुळे छातीत उजव्या बाजूला वेदना होतात.

‘या’ कारणांमुळे छातीत उजव्या बाजूला होतात वेदना

  • अ‍ॅसिड रिफ्लक्स

अ‍ॅसिड रिफ्लक्स म्हणजे छातीची जळजळ, जी छातीच्या खालच्या भागात उद्भवते. जेव्हा पोटातील अ‍ॅसिड अन्ननलिकेमधून परत येऊ लागते तेव्हा असे होते. त्यामुळेही छातीत दुखू लागते. अ‍ॅसिड रिफ्लक्समुळे पोटदुखी, छातीत जळजळ, तोंडाला आंबट चव येणे, आंबट ढेकर येणे इत्यादी अनेक प्रकारच्या समस्या उद्भवतात.

heart attack right chest pain Know the signs and symptoms Warning Signs of a Heart Attack
तुम्हालाही छातीच्या उजव्या बाजूला वेदना जाणवतात का? मग असू शकते ‘हे’ हार्ट अटॅकचे लक्षण? वेळीच व्हा सावध अन् लक्षात घ्या डॉक्टरांचा सल्ला
Mumbai Women Buys 19 Flats Worth 118 Crores In Malbar Hill
“बंगल्यासमोर बिल्डिंग बांधली, समुद्र कसा बघू?”, म्हणत दक्षिण मुंबईत १९ फ्लॅट्स विकत घेणारी ‘ती’ आहे तरी कोण?
pm narendra modi bill gates
Video: करोना काळात थाळ्या वाजवायला का सांगितलं? पंतप्रधान मोदी बिल गेट्सना म्हणाले, “..तेव्हा आमच्या देशात याची मस्करी झाली होती!”
Burning In Chest Due To Acidity or is It Heart Attack How to Spot Difference Can Pain In Left Hand Indicate Heart Disease Doctor
छातीत फक्त जळजळ होतेय की हार्टअटॅक आलाय? लक्षण कसे ओळखाल, फक्त डाव्या बाजूला दुखणं नव्हे तर..

Weight Loss Tips : गोड पदार्थ न सोडताही वजन कमी करता येणार; फॉलो करा ‘या’ टिप्स

  • अपचन

अपचनामुळे छातीच्या उजव्या बाजूला वेदना होतात. अशा स्थितीत छाती आणि घशात अन्न अडकल्यासारखे वाटते, त्यासोबतच घशात आंबट चव येते आणि पोटाच्या वरच्या भागात वेदना होतात. याशिवाय खाल्ल्यानंतर तुम्हाला खूप अस्वस्थ वाटते, ज्यामुळे तुम्हाला खूप त्रास होतो.

  • स्नायूंमध्ये तणाव

एखाद्या अपघातामुळे किंवा खेळादरम्यान झालेल्या स्नायूंच्या तणावामुळेही छातीत दुखते. यासोबतच जास्त व्यायाम करणाऱ्या लोकांमध्येही हे दिसून येते, ज्यामुळे छातीत ताण येतो आणि छातीत दुखते. वेदना होत असताना तुम्ही आइस पॅक देखील लावू शकता, समस्या वाढल्यास तुम्ही तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

(येथे देण्यात आलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. अधिक माहितीकरिता तज्ञांचा सल्ला घ्या.)