केस गळतीची समस्या प्रत्येक वयोगटातील व्यक्तींमध्ये दिसून येते. अयोग्य जीवनशैली आणि केसांची योग्य निगा न राखल्यामुळे केस गळतीच्या समस्येला सामोरं जावे लागते. शिवाय केसगळतीची समस्या महिलांसह पुरुषांमध्येही मोठ्या प्रमाणात आढळून येते. केसांना योग्य पोषण न मिळणं, हार्मोनल बदल, वाढते प्रदूषण तणाव आणि खराब आहार अशा अनेक कारणांमुळे केस गळतात. त्यामुळे केसांची ही समस्या दूर करण्यासाठी फक्त शॅम्पू आणि कंडिशनर पुरेसे नाहीत. यासाठी तुम्हाला काही अधिकची काळजी घेणं आवश्यक आहे. जूही परमार यांनी केसगळती रोखण्यासाठी एक घरगुती उपाय सांगितला आहे, ज्याचा अवलंब करून केसगळतीच्या समस्येपासून आपला सहच बचाव करता येतो.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

इंस्टाग्रामवर अभिनेत्रीने “होममेड हेअर टॉनिक” दाखवलं आहे. जे केवळ केस गळती थांबवत नाही तर नवीन केस वाढण्यासही मदत करते. तुम्हालाही जर निरोगी आणि मजबूत केस हवे असतील, तर केस गळतीच्या समस्यांवर कांद्याच्या हेअर टॉनिकने उपचार करा. हे हेअर टॉनिक केस गळणे थांबवेल आणि केस मजबूतही बनवण्यासही मदत करेल. कांद्याचे हेअर टॉनिक घरी कसे तयार करायचे ते तज्ञांकडून जाणून घेऊयात.

हेही वाचा- मुलांच्या वयानुसार उंची वाढत नाहीये? तर आजच आहारात ‘या’ गोष्टींचा समावेश करा

असं बनवा हेअर टॉनिक-

हेअर टॉनिकसाठी लागणारे साहित्य खालीलप्रमाणे –

  • १ कांदा
  • १ न सोललेला बटाटा
  • लिंबाचा रस
  • १ चमचा नारळ तेल
  • १ चमचा एरंडेल तेल
  • रोझमेरी तेल

हेही वाचा- दर अर्ध्या तासाने ५ मिनिटे चालणं आरोग्यासाठी ठरेल फायदेशीर; जाणून घ्या डॉक्टर काय सांगतात

टॉनिक बनवण्याची पद्धत –

केसांलाछी टॉनिक बनवण्यासाठी कांदा आणि बटाटा मिक्सरमध्ये बारीक करुन घ्या आणि त्याची पेस्ट गाळून घ्या. त्यामध्ये लिंबाच्या रसाचे काही थेंब टाका. यानंतर पेस्टमध्ये खोबरेल तेल, एरंडेल तेल आणि मेंदीचे तेल घालून चांगले मिक्स करा. तयार केलेली ही पेस्ट काही वेळ तशीच ठेवा आणि आणि ती केसांना लावा. त्यानंतर केसांची चांगली मसाज करा आणि अर्ध्यातासानंतर केस धुवा. आठवड्यातून एक ते दोन वेळा हे टॉनिक केसांना लावल्यास केस गळतीच्या समस्येपासून तुमची सुटका होईल.

हेही वाचा- काकडी खाल्याने खरंच सर्दी होते ? हिवाळ्यात काकडी खाणे कितपत योग्य? जाणून घ्या

टॉनिक वापरण्याचे फायदे –

  • कांद्याचा रस केस तुटणे आणि पातळ होण्यापासून रोखते.
  • पेस्टमधील बटाटा केसांना पोषण देतो आणि केसांच्या वाढीसही मदत करतो.
  • लिंबाचा रस डोक्यातील कोंड्याला प्रतिबंध करतो.
  • खोबरेल तेल केसांना मॉइस्चराइज़ करते आणि केसांच्या वाढीस मदत करते.
  • एरंडेल तेल एक नैसर्गिक कंडिशनर आहे जे केसांना निरोगी आणि चमकदार बनवते.
  • रोझमेरी तेल केसांची जाडी सुधारण्यास मदत करते.
मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Do you also lose a lot of hair learn home remedies for this problem from experts lifestyle news jap
First published on: 25-01-2023 at 19:46 IST