तुम्ही कच्ची भेंडी खाता का? जाणून घ्या त्याचे फायदे आणि तोटे

भेंडी बाजारात सहज उपलब्ध होते. तुम्ही देखील भेंडी खात असाल, तर त्याचे सेवन करण्यापूर्वी त्याच्या फायदे आणि तोटे जाणून घेणे आवश्यक आहे.

तुम्ही कच्ची भेंडी खाता का? जाणून घ्या त्याचे फायदे आणि तोटे
भेंडी खाण्याचे फायदे आणि तोटे ( फोटो : file photo )

प्रत्येकाच्या घरात भेंडी खाल्ली जाते. भेंडी अनेक औषधी गुणधर्मांनी परिपूर्ण आहे. भेंडीमध्ये प्रथिने, फायबर, कॅल्शियम, लोह, मॅग्नेशियम, फॉस्फरस, पोटॅशियम, सोडियम, तांबे, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन बी ६, बीटा कॅरोटीन, व्हिटॅमिन ए, इत्यादी अनेक आवश्यक पोषक घटक आढळतात. जे आरोग्यासाठी अतिशय उपयुक्त आहेत. तर जाणून घेऊया भेंडी खाण्याचे फायदे आणि तोटे.

भेंडीची चव कशी लागते?

भेंडीची चव थंड असते. त्यामुळे उन्हाळ्यात याचे भरपूर सेवन करता येते. मात्र, भेंडी बनवताना वापरलेले मसाले ते गरम करतात. त्यामुळे भेंडीचे फक्त मर्यादित प्रमाणात सेवन करा.

भेंडीचे पाणी सेवन केल्यास काय होते?

भेंडीच्या पाण्याचे सेवन आरोग्यासाठी खूप उपयुक्त आहे. याच्या सेवनाने पोटाला थंडावा मिळतो. मात्र, भेंडीचे पाणी आपल्या आहारात समाविष्ट करण्यापूर्वी एकदा तज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

कच्ची भेंडी खाऊ शकता का?

काही लोकांना कच्ची भेंडी खाण्याची सवय असते. कच्च्या भेंडीचे सेवन केले जाऊ शकते. पण भिंडी खाण्यापूर्वी नीट धुवावी. कच्च्या भेंडीचे नियमित किंवा जास्त प्रमाणात सेवन करण्यासाठी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

भेंडीचे फायदे काय आहेत?

भेंडीच्या सेवनाने फक्त रक्तदाब नियंत्रित ठेवता येत नाही, तर वजन कमी करण्यासाठी, डोळ्यांच्या आरोग्यासाठी, बद्धकोष्ठता दूर करण्यासाठी, कर्करोगापासून बचाव करण्यासाठी, पचनशक्ती वाढवण्यासाठी, मधुमेहाच्या समस्येवर नियंत्रण ठेवण्यासाठी देखील भेंडी खूप उपयुक्त आहे.

भेंडीचे तोटे काय आहेत?

भेंडीचे जास्त सेवन केल्यास त्वचेवर जखमा होऊ शकतात किंवा व्यक्तीला पोटाच्या समस्यांनाही सामोरे जावे लागू शकते. भेंडीचे जास्त प्रमाणात सेवन केल्याने रक्त घट्ट होऊ शकते. याशिवाय एखाद्या व्यक्तीला किडनी स्टोन देखील असू शकतो.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल ( Lifestyle ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
World Blood Donor Day 2022 : रक्तदान करण्यापूर्वी आणि केल्यानंतर काय खावे? जाणून घ्या
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी