Seeds and Dry Fruits Eating Time: हल्ली आरोग्याची काळजी घेण्यासाठी अनेक जण आहारात विविध बिया आणि ड्रायफ्रुट्सचा समावेश करताना दिसतात. बदाम, अक्रोड, काजू, मनुका यांसोबतच भोपळ्याच्या बिया, सूर्यफुलाच्या बिया, चिया सीड्स, फ्लॅक्ससीड्स यांसारख्या बियांनाही मोठी पसंती मिळत आहे. यामध्ये प्रथिने, चांगले फॅट्स, फायबर, जीवनसत्त्वे आणि विविध खनिजे मिळत असल्याने संतुलित आहाराचा भाग म्हणून त्यांचा वापर केला जातो.

पण, बिया आणि ड्रायफ्रुट्स पौष्टिक असले तरी ते किती, कधी आणि कोणत्या पद्धतीने खावेत, याबाबतची योग्य माहिती अनेकांना नसते. काही बिया भिजवून खाणे योग्य ठरू शकते, तर काही बिया भाजून किंवा दळून आहारात घेणे अधिक सोईचे असते. त्याचप्रमाणे ड्रायफ्रुट्सही मोठ्या प्रमाणात खाण्याऐवजी त्यांचे योग्य प्रमाणात सेवन करणे महत्त्वाचे आहे. चुकीच्या पद्धतीने किंवा अति प्रमाणात सेवन केल्यास अपेक्षित फायदा मिळण्याऐवजी पचनाशी संबंधित त्रास होऊ शकतो.

भोपळ्याच्या बिया खाण्याची योग्य पद्धत

भोपळ्याच्या बिया पोषक तत्त्वांचा खजिना आहेत; ज्यात प्रथिने, ओमेगा-३ फॅटी ॲसिड आणि फायबर यांसारखे सर्व घटक असतात. त्यात मॅग्नेशियम व झिंक यांसारखी आवश्यक पोषक तत्त्वेही असतात. तथापि, तुम्ही त्यांचे योग्य प्रकारे सेवन केल्यासच तुम्हाला या पोषक तत्त्वांचा फायदा होईल. भोपळ्याच्या बियांचे पौष्टिक मूल्य जास्तीत जास्त मिळवण्यासाठी त्या सेवनासाठी वापरताना नेहमी हलक्याशा भाजून घेतल्या पाहिजेत.

जवस बियाणे

अनेक जण जवस लाडूमध्ये वापरूनही खातात. पोषणतज्ज्ञांचा सल्ला आहे की, जवसाचे पूर्ण फायदे मिळवण्यासाठी ते नेहमी दळूनच खावे.

चिया बिया

जर तुम्ही फायबर आणि वजन कमी करण्यासाठी चिया बिया खात असाल, तर त्या खाण्यापूर्वी किमान ३-४ तास भिजवून घ्यायला विसरू नका. चिया बिया भिजवून खाणे हा त्यांचा सर्वोत्तम मार्ग आहे.

तीळ

तिळामध्ये कॅल्शियम भरपूर प्रमाणात असते आणि महिलांनी आपली हाडे मजबूत करण्यासाठी ते नक्कीच खाल्ले पाहिजे. तीळ खाताना ते मसाल्यांसोबत खाणे उत्तम ठरते; तरच शरीर त्यातील आरोग्यदायी चरबी आणि पोषक तत्त्वे शोषून घेऊ शकते.

हालीम बिया

हालीमच्या बियांमध्ये लोहाचे प्रमाण खूप जास्त असते. ज्यांच्यामध्ये हिमोग्लोबिनची कमतरता आहे, त्यांच्यासाठी या बिया अमृतासारख्या आहेत. तथापि, त्यांचे योग्य पद्धतीने सेवन पूर्ण फायदे केल्यासच मिळू शकतात. हालीमच्या बिया नेहमी रात्रभर पाण्यात भिजवून ठेवाव्यात आणि नंतर सकाळी त्यांचे सेवन करावे.

सूर्यफुलाच्या बिया

सूर्यफुलाच्या बियांमध्ये व्हिटॅमिन ई, मॅग्नेशियम, प्रथिने आणि पॉलीअनसॅचुरेटेड फॅट्स असतात.
एक कप (सुमारे ४५ ग्रॅम) सूर्यफुलाच्या बिया खाल्ल्याने व्हिटॅमिन ईची दैनंदिन गरजेपेक्षा जास्त मात्रा मिळते, जे त्वचा आणि केसांसाठी खूप फायदेशीर आहे. सूर्यफुलाच्या बियांचे फायदे मिळवण्यासाठी तुम्ही त्या सहजपणे कच्च्या खाऊ शकता.

किती व कधी खावे?

पण, बिया आणि ड्रायफ्रुट्स पौष्टिक असले तरी ते किती, कधी आणि कोणत्या पद्धतीने खावेत याची योग्य माहिती अनेकांना नसते. काही बिया भिजवून खाणे योग्य ठरू शकते, तर काही बिया भाजून किंवा दळून आहारात घेणे अधिक सोईचे असते. त्याचप्रमाणे ड्रायफ्रुट्सही मोठ्या प्रमाणात खाण्याऐवजी योग्य प्रमाणात घेणे महत्त्वाचे आहे. चुकीच्या पद्धतीने किंवा अति प्रमाणात सेवन केल्यास अपेक्षित फायदा मिळण्याऐवजी पचनाशी संबंधित त्रास होऊ शकतो.