हिवाळ्यात त्वचेवर लाल खुणा आणि खाज सुटते का? सुटका करण्यासाठी फॉलो करा ‘या’ टिप्स

हिवाळ्यात हलक्या मॉइश्चरायझरऐवजी तुमच्या त्वचेनुसार मॉइश्चरायझर वापरा.

lifestyle
अंघोळीनंतर तुम्ही तुमच्या हलक्या ओल्या त्वचेवर मॉइश्चरायझर वापरू शकता. (photo: jansatta)

थंडीच्या मोसमात कोरडे वातावरण आणि थंड वारे यांचा त्वचेवर सर्वाधिक परिणाम होतो. जास्त थंडीमुळे चेहऱ्यावर लाल खुणा आणि खाज येण्याची समस्या निर्माण होते. ही अशी वेळ असते जेव्हा त्वचा सर्वात जास्त संवेदनशील बनते आणि त्यामुळे त्वचेवर जळजळ होते. थंडीच्या काळात त्वचेवर भेगाही पडतात. अशा परिस्थितीत, हिवाळ्यात त्वचेची अधिक काळजी घेणे आवश्यक आहे. जर तुम्हाला हिवाळ्यात तुमच्या त्वचेचे सौंदर्य टिकवायचे असेल तर तुम्ही या स्किन केअर टिप्सची मदत घेऊ शकता.

मॉइश्चरायझर

हिवाळ्यात हलक्या मॉइश्चरायझरऐवजी तुमच्या त्वचेनुसार मॉइश्चरायझर वापरा. तज्ञांचे म्हणणे आहे की काही लोकांसाठी, फक्त ग्लिसरीन, व्हिटॅमिन ई आणि कोल्ड क्रीम सारख्या गोष्टींचा हिवाळ्यात त्वचेवर परिणाम होतो. अंघोळीनंतर तुम्ही तुमच्या हलक्या ओल्या त्वचेवर मॉइश्चरायझर वापरू शकता. कारण पूर्णपणे कोरड्या त्वचेवर क्रीम लावल्याने त्वचा ते योग्य प्रकारे शोषू शकत नाही आणि ओलावा त्वचेत बंद होत नाही.

जास्त गरम पाण्यात अंघोळ करू नका

खूप थंडी पडली की काही लोकं गरम पाण्याने आंघोळ करायला लागतात. पण खूप गरम पाण्याने अंघोळ केल्याने त्वचेतील एसेंशियल ऑयल्स निघून जातात आणि त्वचा कोरडी होते. यामुळे नंतर त्वचेवर जळजळ आणि खाज येण्याची समस्या उद्भवते. त्यामुळे आंघोळ करताना हे लक्षात ठेवावे की पाणी जास्त गरम नसावे.

शरीर हायड्रेटेड ठेवा

हिवाळ्यात तहान लागत नाही, त्यामुळे लोक जास्त पाणी पीत नाहीत. पण हिवाळ्यात त्वचेला हायड्रेशनची गरज नसते असे नाही. हिवाळ्याच्या मोसमात थंड हवेमुळे त्वचा अधिक कोरडी पडते, त्यामुळे अधिकाधिक पाणी पिणे खूप गरजेचे आहे.

थंडीत योग्य कपडे निवडा

हिवाळ्यात लोकरीचे कपडे परिधान केल्याने घर्षण होते, ज्यामुळे त्वचेवर पुरळ उठते आणि खाज सुटते. त्यामुळे त्वचेची जळजळ टाळण्यासाठी असे कपडे घालणे टाळा, ज्यामुळे तुम्हाला त्वचेवर खाज येते. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही लेयर्स घालू शकता.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Do you get red spots and itching on your skin in winter follow these tips to get rid of it scsm