Causes Of Morning Headaches :वाढत्या वयाबरोबर शरीरात अनेक बदल होतात. वाढत्या वयात जर आहार आणि जीवनशैलीची काळजी घेतली नाही तर शरीर अनेक आजारांना बळी पडते. सहसा वया;च्या ४० ते ५० टप्यात आल्यानंतर लोकांना सकाळी सकाळी तीव्र डोकेदुखीची समस्या जाणवते. सहसा डोकेदुखीची सुरुवातीच्या टप्यात मानेच्या मणक्यांचा झीज विकार (Cervical spondylosis), चुकीच्या पद्धतीने झोपण्याच्या किंवा बसण्यामुळे, वाढलेला ताण आणि झोप पूर्ण न होणे यांसारख्या समस्या सहसा डोकेदुखीसाठी जबाबदार असतात. याच कारणांमुळे लोकांना सकाळी डोकेदुखीचा त्रास होतो.
वॉकहार्ट हॉस्पिटल्स मुंबई सेंट्रल येथील अंतर्गत औषध विभागाच्या सल्लागार डॉ. हनी सावला सांगतात की, “बहुतेक लोक ४०-५० वर्षांच्या वयात डोकेदुखीच्या समस्येमुळे डॉक्टरांकडे येतात. शरीरातील हार्मोनल बदल आणि रक्तदाब किंवा झोप ही सहसा डोकेदुखीची कारणे असतात. या वयात घोरणे किंवा सौम्य स्लीप ॲप्निया(झोपेत असताना श्वास वारंवार थांबणे किंवा खूप मंद होणे) देखील सुरू होऊ शकतो, ज्यामुळे सकाळी डोकेदुखीची शक्यता वाढते.”
ग्लेनईगल्स हॉस्पिटल मुंबई येथील अंतर्गत औषध विभागाच्या वरिष्ठ सल्लागार डॉ. मंजुषा अग्रवाल यांच्या मते, “जास्त वेळ काम करणे आणि रात्री दात चावणे यामुळेही सकाळी डोकेदुखी होऊ शकते. तज्ज्ञांनी सांगितले की, “रात्री उशिरापर्यंत जागे राहणे, झोपण्यापूर्वी गॅजेट्स वापरणे किंवा जास्त प्रमाणात कॅफीनचे सेवन करणे यामुळेही सकाळी लवकर डोकेदुखी सुरू होऊ शकते. चला तर मग, सकाळी होणाऱ्या डोकेदुखीमागे कोणती कारणे जबाबदार असू शकतात, हे डॉक्टरांकडून जाणून घेऊया.
चुकीच्या पद्धतीने झोपण्याच्या किंवा बसण्यामुळे डोकेदुखी झाली आहे हे कसे ओळखावे?How to identify whether headache is due to posture or a sign of some disease?)
डॉ. सावला यांच्या मते, जर आठवड्याच्या शेवटी आराम केल्यावर, फिजिओथेरपीनंतर किंवा चांगली उशी वापरल्यानंतर डोकेदुखी कमी होत असेल, तर ती बहुतेकदा चुकीच्या पद्धतीने झोपण्याच्या किंवा बसण्यामुळे होते. परंतु जर तुम्हाला रोज डोकेदुखी होत असेल, दृष्टीमध्ये बदल होत असतील, उलट्या होत असतील, अशक्तपणा जाणवत असेल, मान आखडली असेल किंवा झोपेत वारंवार डोळे उघडत असतील, तर तुम्ही त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. ही लक्षणे सायनसच्या समस्या, रक्तदाबातील बदल, मायग्रेन किंवा स्लीप ॲप्निया दर्शवू शकतात.
पोटावर झोपल्याने सकाळी डोकेदुखी होते का? (Can sleeping on your stomach cause headaches in the morning?)
डॉ. सावला सांगतात की, पोटावर झोपल्यानेही डोकेदुखी होते. पोटावर चेहरा खाली करून झोपल्यामुळे श्वास घेणे कठीण होते, त्यामुळे मान तासनतास एका बाजूला वाकलेली राहते. यामुळे मानेचा कणा त्याच्या नैसर्गिक स्थितीपासून विचलित होतो. मान आणि पाठीच्या वरच्या भागाचे स्नायू रात्रभर ताणलेले राहतात, ज्यामुळे सकाळी सौम्य डोकेदुखी होऊ शकते. हे धोकादायक नाही, परंतु डोकदुखीचे एक सामान्य कारण आहे.
मान आणि पाठीच्या कण्याच्या आरोग्यासाठी सर्वोत्तम स्थिती कोणती आहे? (What is the best sleeping position for neck and spine health?
डॉ. सावला यांच्या मते, पाठीवर झोपणे ही सर्वोत्तम स्थिती आहे, ज्यात मानेच्या नैसर्गिक वक्राला आधार देण्यासाठी पातळ उशीचा वापर करावा. कुशीवर झोपणे देखील ठीक आहे, परंतु उशीने डोके आणि पाठीचा कणा एका सरळ रेषेत ठेवला पाहिजे. पोटावर झोपणे शरीरासाठी सर्वात हानिकारक आहे कारण त्यामुळे मान बराच वेळ वाकलेली राहते.
४०-५० वयोगटातील सर्व लोकांना ही समस्या असते का? (Do all people in the age group of 40–50 have this problem?)
डॉ. अग्रवाल म्हणतात की, या वयात सकाळी डोकेदुखी झाल्यास लोक अनेकदा घाबरतात, परंतु प्रत्येक प्रकरण वेगळे असते. काही डोकेदुखी साध्या जीवनशैलीच्या सवयींमुळे होतात, ज्या सहजपणे सुधारल्या जाऊ शकतात, तर काही प्रकरणांमध्ये वैद्यकीय सल्ल्याची आवश्यकता असते. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे वारंवार दिसणाऱ्या लक्षणांकडे दुर्लक्ष न करणे आणि आपल्या शरीराला योग्य विश्रांती देणे, त्याची काळजी घेणे आणि ध्यान करणे.
सकाळची डोकेदुखी कमी करण्यासाठी कोणते सोपे बदल करावेत? (What easy changes can you make to reduce morning headaches?)
- जर तुम्हाला सकाळी डोकेदुखी होत असेल, तर तुमच्या झोपण्याच्या सवयी बदला. पाठीवर झोपण्याची सवय लावा आणि मानेच्या नैसर्गिक वक्राला आधार द्या.
- घट्ट आधार देणारी उशी वापरा. खूप उंच उशी वापरू नका आणि खूप मऊ उशीही वापरू नका.
- मान आणि पाठीच्या वरच्या भागाचे नियमित स्ट्रेचिंग करा.
- दिवसभर पुरेसे पाणी प्या. झोपण्याची आणि उठण्याची वेळ निश्चित करा.
- झोपेची गुणवत्ता सुधारण्यासाठी रात्री उशिरा स्क्रीन पाहण्याचा वेळ कमी करा.
डॉ. सावला सल्ला देतात की, जर तुम्हाला उच्च रक्तदाबाचा त्रास नुकताच सुरू झाला असेल, तर वेळोवेळी रक्तदाब तपासा.
(टीप – वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे)
