Skin Care Tips: चेहऱ्यावर मुरुमांचा त्रास होतोय? अशाप्रकारे घ्या काळजी

मुरुमांच्या समस्येने प्रत्येकजण हैराण असतो. आज आपण त्वचेची काळजी घेण्याच्या टिप्स जाणून घेणार आहोत, ज्याचा अवलंब करून तुम्ही मुरुमांच्या समस्येपासून मुक्त होऊ शकता.

Skin Care Tips: चेहऱ्यावर मुरुमांचा त्रास होतोय? अशाप्रकारे घ्या काळजी
चेहऱ्यावरील पिंपल्सची काळजी घेणं गरजेचं आहे ( फोटो: indian express )

Skin Care Tips Acne: महिला असो किंवा पुरुष, प्रत्येकजण मुरुमांच्या समस्येने त्रस्त असतो. याचे कारण अस्वस्थ आहार आणि उष्णता आहे. मुरुमांमुळे आपले सौंदर्य कमी होते. इतकेच नाही तर त्यांच्यामुळे व्यक्तीचा आत्मविश्वासही कमी होतो. अशा परिस्थितीत जर तुमच्या चेहऱ्यावर पिंपल्स येत असतील तर तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही कारण आम्ही तुम्हाला काही स्किन केअर टिप्स सांगणार आहोत ज्याचा अवलंब करून तुम्ही मुरुमांच्या समस्येपासून सुटका मिळवू शकता. चला तर मग जाणून घेऊया.

त्वचेची अशाप्रकारे काळजी घ्या

१. स्वतःहून पिंपल्स तोडू नका

चेहऱ्यावर पिंपल्स असतील तर लवकरात लवकर त्यापासून सुटका व्हायला हवी म्हणून अनेकजण स्वतः ते फोडतात.असे करू नये. मुरुम फोडल्याने, जळजळ, खाज सुटते. तसेच, ते डाग देखील सोडू शकतात. त्यामुळे ते फोडणे टाळा.

२. भरपूर पाणी प्या

त्वचा निरोगी ठेवण्यासाठी पाणी पिणे खूप महत्त्वाचे आहे. तुमच्या चेहऱ्यावर पिंपल्स असल्यास पुरेसे पाणी पिण्यास सुरुवात करा. यामुळे शरीरात साचलेली विषारी द्रव्ये बाहेर निघतील. यासोबतच चेहऱ्यावर ग्लोही दिसेल.

३. वर्कआउट केल्यानंतर चेहरा पुसा

बहुतेक लोक वर्कआउट केल्यानंतर चेहरा साफ करत नाहीत, तर तुम्ही हे करू नका. वर्कआऊटनंतर चेहरा स्वच्छ करणे आवश्यक आहे. चेहऱ्यावरचा घाम पुसला गेला पाहिजे. यासाठी मऊ टॉवेल घेऊन चेहऱ्यावरचा घाम पुसा.

४. दिवसातून दोनदा चेहरा धुवा

मुरुमांपासून सुटका मिळवण्यासाठी चेहऱ्याची स्वच्छता देखील खूप महत्त्वाची आहे, यासाठी तुम्ही दिवसातून दोनदा चेहरा धुवा. तुम्ही सकाळी उठल्यानंतर आणि झोपेच्या वेळी चेहरा धुवू शकता. रात्री झोपताना चेहरा जरूर धुवा, यामुळे दिवसभरातील घाण निघून जाते.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल ( Lifestyle ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Do you have acne on your face take care this way gps

Next Story
तुळशीचा चहा प्यायल्याने ‘हे’ आजार होतील दूर; आजच सुरु करा सेवन
फोटो गॅलरी