Lips care : प्रत्येक स्त्रीला असं वाटतं की, आपण सुंदर दिसावं. सुंदर दिसण्यासाठी स्त्रिया अनेकदा सौंदर्यप्रसाधनांचा वापर करतात. अनेकदा काजळ, फेस पावडर, लिपस्टिक लावल्याशिवाय महिला घराच्या बाहेरसुद्धा पडत नाहीत. लिपस्टिक लावणे तर महिलांना खूप जास्त आवडते.
तुम्हालाही नियमित लिपस्टिक लावायची सवय असेल, तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. कारण- आज आपण नियमित लिपस्टिक लावल्यामुळे काय दुष्परिणाम होतात, याविषयी जाणून घेणार आहोत.
लिपस्टिकमध्ये असतात रसायने
- लिपस्टिक बनवण्यासाठी ज्या रसायनांचा उपयोग केला जातो, ती रसायने आपल्या आरोग्यासाठी आणि विशेष म्हणजे ओठांच्या त्वचेसाठी चांगली नसतात.
- जेव्हा तुम्ही ओठांवर लिपस्टिक लावता, तेव्हा ओठांवरच्या त्वचेवरील छोटी छिद्रे बंद होतात; ज्यामुळे तुमचे ओठ वारंवार सुकतात.
हेही वाचा : फेसबुक, इन्स्टाग्रामवर अनोळखी व्यक्तींबरोबर मैत्री करताना ‘या’ गोष्टींची घ्या काळजी….
नियमित लिपस्टिक का लावू नये?
- नियमित लिपस्टिक लावल्यामुळे तुमच्या ओठांचा खरा रंग नाहीसा होतो आणि ओठ काळे पडतात.
- लिपस्टिकमधील रसायनांमुळे ओठांच्या सुंदरतेची हानी
- लिपस्टिकमध्ये हानिकारक रसायने असतात. जर तुम्ही दररोज लिपस्टिक लावत असाल, तर स्किन ॲलर्जीचा धोका वाढतो.
- अनेक महिला पैसे वाचवण्यासाठी कमी दर्जाच्या लिपस्टिक खरेदी करतात; पण असे करू नये. अशी लिपस्टिक नियमित लावल्यामुळे तुमचे चांगले ओठ खराब होऊ शकतात.
हेही वाचा : How to Stop Snoring : तुमच्या जोडीदाराला घोरण्याची सवय आहे का? या ट्रिक्सच्या मदतीने करा त्यांची सुटका!
लिपस्टिक खरेदी करताना…
- लिपस्टिक खरेदी करताना लिपस्टिकवर दिलेली सूचना वाचावी. सूचना न वाचल्यामुळे अनेकदा महिलांना लिपस्टिक लावल्यानंतर त्याचे दुष्परिणाम दिसून येतात.
- लिपस्टिक विकत घेताना नेहमी ‘एक्स्पायरी डेट’ (मुदत संपण्याची तारीख) तपासून घ्यावी. लिपस्टिकच्या या मुदत संपण्याच्या तारखेकडे दुर्लक्ष केल्यामुळे नंतर त्याचे दुष्परिणाम दिसून येतात. अशा लिपस्टिकचा वापर केल्यामुळे ओठसुद्धा काळे पडतात.
- ऑनलाइन लिपस्टिक खरेदी करताना तुमची फसवणूकसुद्धा होऊ शकते. त्यामुळे लिपस्टिक ऑनलाइन खरेदी करू नये.
(टीप : वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)