scorecardresearch

हाताने जेवण्याचे ‘हे’ फायदे तुम्हाला माहित आहेत का? वेदांमध्ये सांगितलं आहे महत्त्व

स्वतःच्या हाताने जेवण्याला खास महत्त्व आहे आणि यामुळे आपल्या शरीरातील पंचतत्त्वे संतुलित राहतात.

आज आपण जाणून हाताने जेवल्याने आपल्याला कोणकोणते फायदे होतात.

आपल्यावर पाश्चिमात्य संस्कृतीचा पगडा इतका घट्ट होत चालला आहे की आपण आपल्या गोष्टी विसरून त्या गोष्टींचा स्वीकार करू लागलो आहोत. अशा अनेक सवयी आहेत ज्या आपण बदलू लागलो आहोत. जगभरात भारतीय संस्कृतीला आणि त्यामध्ये आचरणात आणल्या जाणाऱ्या गोष्टींना खूप महत्त्व आहे. अशा अनेक गोष्टी आहेत ज्या आपण पूर्वीपासून करत आलो आहोत ज्यांचे अनेक फायदे आहेत, पण आपल्याला ते माहित नाहीत. अशीच एक गोष्ट म्हणजे स्वतःच्या हाताने जेवणे.

आजकाल बहुतेक लोक चमच्याने खाणे पसंत करतात. हाताने खाणे त्यांना आवडत नाही. परंतु तुम्हाला माहित आहे का, स्वतःच्या हाताने जेवण्याला खास महत्त्व आहे आणि यामुळे आपल्या शरीरातील पंचतत्त्वे संतुलित राहतात. वेदांनुसार, हाताचे प्रत्येक बोट हे पाच तत्वांचा विस्तार आहे. यामध्ये अंगठा अंतराळाचे प्रतिनिधित्व करतो, तर्जनी हवेचे प्रतिनिधित्व करते, मधले बोट अग्नीचे प्रतिनिधित्व करते, अनामिका पृथ्वीचे प्रतिनिधित्व करते आणि सर्वात लहान बोट पाण्याचे प्रतिनिधित्व करते. आज आपण जाणून हाताने जेवल्याने आपल्याला कोणकोणते फायदे होतात.

अ‍ॅसिडिटीचा त्रास होतोय का?; उन्हाळ्यात ‘या’ पदार्थांचा आहारात करा समावेश

पचनक्रिया सुधारते :

तज्ज्ञांच्या मते, हाताने खाल्ल्याने या पाच तत्त्वांना चालना मिळते आणि पचनक्रिया सुधारते, त्यामुळे अन्न खाण्यापूर्वी आणि नंतर हात धुवावेत असे म्हटले जाते.

हाताचा व्यायाम होतो :

हाताने खाल्ल्याने शरीरातील पाच तत्वांचे संतुलन बरोबर राहते. यामुळे हातांचाही व्यायाम होतो. हाताने जेवण करून तुम्ही अनेक आजारांपासूनही दूर राहता. यामुळे टाइप २ मधुमेहाचा धोका कमी होतो.

वजन कमी करण्यास मदत होते :

हाताने अन्न खाल्ल्याने हात, तोंड, पोट, आतडे आणि मेंदू यांच्यामध्ये संबंध निर्माण होतो, ज्यामुळे तुमच्या आरोग्याला फायदा होतो. संशोधकांच्या मते हाताने खाल्ल्याने पोट चांगले भरते. तसेच वजन कमी करण्यास मदत होते.

‘या’ फळांच्या बिया ठरतात आरोग्यासाठी फायदेशीर; गंभीर आजारांवर आहेत गुणकारी

शरीर निरोगी राहते

हाताने अन्न खाण्याचा एक फायदा असाही आहे की त्यामुळे तोंड भाजत नाही कारण अन्नाला हाताने स्पर्श केल्यास अन्न किती गरम आहे याची कल्पना येते. हाताने अन्न खाताना, बोटे आणि अंगठ्यांच्या जोडणीमुळे तयार होणारी मुद्रा शरीरात विशेष ऊर्जा निर्माण करते. यामुळे शरीर निरोगी राहते.

(येथे दिलेली माहिती गृहीतके आणि सामान्य माहितीवर आधारित आहे.)

मराठीतील सर्व लाइफस्टाइल ( Lifestyle ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Do you know the benefits of eating by hand the importance is stated in the vedas pvp