फोडणी दिलेली, म्हणजेच तडका दिलेली डाळ प्रत्येकालाच आवडते. डाळ, कोशिंबीर, सांबर किंवा कढी सारख्या पदार्थांमध्ये वेगवेगळ्या मसाल्यांचा वापर करून फोडणी दिली जाते. या फोडणीशिवाय जेवण बेचव लागते. परंतु तुम्हाला माहित आहे का की केवळ जेवणाची चव वाढवण्यासाठी फोडणी दिली जात नाही, तर याचे अनेक फायदे देखील आहेत. फोडणीमध्ये ज्या मसाल्यांचा वापर केला जातो, त्यामध्ये वेगवेगळे गुण असतात, ज्यामुळे आपल्या आरोग्याला फायदा होतो. अनेकदा वेगवेगळ्या पदार्थांना वेगवेगळ्या मसाल्यांची फोडणी दिली जाते. यामागेही वेगवेगळी कारणे आहेत. आज आपण जाणून घेऊया जेवणामध्ये फोडणीचे काय महत्त्व आहे.

हिंगाची फोडणी :

तुरीच्या डाळीला देण्यात येणाऱ्या फोडणीमध्ये लसूण आणि आले वापरल्यास पोटाला त्रास होत नाही. तसेच तुम्हाला जेवल्यानंतर पोट फुगण्याची समस्या जाणवत असेल तर डाळीला हिंगाची फोडणी दिल्याने ही समस्या कमी होते. तुरीच्या डाळीला तुपाची फोडणी दिल्यास डाळीचा गुणधर्म थंड होतो.

How useful was the Green Revolution really
हरितक्रांती खरंच कितपत उपयुक्त ठरली?
Brown Rice or White Rice
कोणता भात खावा पांढरा की ब्राऊन? तज्ज्ञांनी सांगितला कोणता तांदूळ आरोग्यासाठी फायदेशीर…
bhang uses
विश्लेषण : भांगेचे ‘हे’ गुणकारी फायदे माहीत आहेत का?
Did you know that polyvalent astaxanthin is a natural colorant
Health Special : नैसर्गिक रंग देणारे बहुगुणी ॲस्टाझॅनथीन तुम्हाला माहीत आहे का?

हाताने जेवण्याचे ‘हे’ फायदे तुम्हाला माहित आहेत का? वेदांमध्ये सांगितलं आहे महत्त्व

अन्नातील पोषण वाढते :

डाळीमध्ये लसणाचा वापर केल्यास रोगप्रतिकारक शक्ती वाढते. लसणात अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म असतात, जे संसर्ग, सर्दी, खोकला आणि डोकेदुखी यांसारख्या समस्या दूर करतात.

हिंग, जिरे किंवा लसूण घालून फोडणी दिल्यास ते चवीसोबतच अन्नाचे पौष्टिक मूल्यही वाढवते. अनेक विद्रव्य जीवनसत्त्वे शोषून घेण्यासाठी चरबी आवश्यक असते. जेव्हा आपण पदार्थाला तूप किंवा तेलाने फोडणी देतो तेव्हा अन्नातील पोषण वाढते.

पचनक्रिया सुधारते :

फोडणीमध्ये विशेषतः मोहरी, जिरे, हिंग, मेथी, जिरे किंवा कढीपत्त्याचा वापर केला जातो. या सर्वांचे वेगवेगळे फायदे आहेत. जिर्‍याची फोडणी आम्लपित्त आणि अतिसारापासून बचाव करते. तसेच यामुळे पचनसंस्था सुरळीत राहते. जिरे खाल्ल्याने पचनक्रिया सुधारते. त्यामुळे पोट फुगणे, जुलाब, आम्लपित्त आणि अपचन यांसारख्या समस्या उद्भवत नाहीत.

अ‍ॅसिडिटीचा त्रास होतोय का?; उन्हाळ्यात ‘या’ पदार्थांचा आहारात करा समावेश

कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रणात राहते :

फोडणीमध्ये कढीपत्त्याचा वापर केल्याने कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रणात राहते. यामुळे पचनक्रिया बरोबर राहते आणि मधुमेहाचा धोकाही कमी होतो. कढीपत्त्यात फायबर, कर्बोदके, जीवनसत्त्वे ई, बी, ए, सी, लोह, फॉस्फरस आणि कॅल्शियम भरपूर प्रमाणात असते.

स्नायूंमधील वेदना कमी होतात :

डाळीमध्ये मोहरीची फोडणी दिल्याने स्नायूंमधील वेदना कमी होतात आणि कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रणात राहते. डाळीत हिंगची फोडणी दिल्याने डाळीची चवही वाढते.

(येथे दिलेली माहिती गृहीतके आणि सामान्य माहितीवर आधारित आहे.)