Benefits of drinking tea: अनेक जण आपल्या दिवसाची सुरुवात सकाळच्या गरमागरम वाफाळलेल्या चहाने करतात. आपल्या भारतीयांचा दिवस सकाळच्या चहाशिवाय सुरू होत नाही. सकाळी उठल्यानंतर ताजेतवाने वाटण्यासाठी लोक चहा पितात, तसेच हिवाळ्यात तर गरमागरम चहा हवाच. मात्र, आरोग्य तज्ज्ञांच्या मते चहा पिण्याची एक योग्य वेळ असते, त्यावेळेत चहा प्यायला तरच त्याचे फायदे मिळू शकतात.
चहा कोणत्या वेळी प्यावा?
- भारतात चहा हे केवळ एक पेय नाही, तर दैनंदिन जीवनाचा एक अविभाज्य भाग आहे. दिवसाची चांगली सुरुवात करण्यापासून ते दिवसभराच्या थकव्यानंतर आराम करण्यापर्यंत, लोक आपल्या दैनंदिन दिनचर्येत चहाचा समावेश करतात आणि दिवसभरात अनेक वेळा तो पितात.
- योग्य वेळी चहा न प्यायल्यास तो शरीरासाठी हानिकारक ठरू शकतो. विशेषतः रिकाम्या पोटी चहा प्यायल्याने गॅस, आम्लपित्त आणि पोटाचे विकार वाढू शकतात.
- सकाळी उठल्याबरोबर चहा पिण्याची अनेकांना सवय असते, पण ही सवय हानिकारक ठरू शकते, यामुळे कॉर्टिसोलची पातळी वाढून दीर्घकाळात पोटाचे विकार होऊ शकतात.
- झोपण्याच्या काही तास आधी चहा प्यायल्याने झोपेवर परिणाम होऊ शकतो. चहामधील कॅफीन मेंदूला सक्रिय ठेवते, ज्यामुळे चांगल्या झोपेत अडथळा येऊ शकतो आणि जेवणापूर्वी किंवा जेवणानंतर लगेच चहा पिणेदेखील योग्य नाही. यामुळे लोहाचे शोषण कमी होऊन अशक्तपणा आणि इतर समस्या उद्भवू शकतात.
- चहा पिण्याची सर्वोत्तम वेळ म्हणजे नाश्त्यानंतर १ ते २ तासांनी. या वेळी चहा प्यायल्याने शरीरावरील त्याचे दुष्परिणाम कमी होतात आणि तुम्हाला बरे वाटते.
- योग्य वेळी आणि मर्यादित प्रमाणात चहा प्यायल्यास शरीराला हानी पोहोचत नाही. विशेषतः रात्रीच्या पाळीत काम करणारे लोक गरजेनुसार चहा पिऊ शकतात.
झोपण्यापूर्वी चहा पिऊ नका
जर आपण झोपण्यापूर्वी चहा प्यायलो तर त्याचा आपल्या झोपेवर परिणाम होऊ शकतो. आपल्याला रात्रभर झोप लागणार नाही आणि सकाळपर्यंत अस्वस्थ वाटू लागते. झोपेच्या कमतरतेमुळे डोकेदुखी, चिडचिड आणि स्मरणशक्ती कमी होणे यांसारख्या समस्याही उद्भवू शकतात, त्यामुळे रात्री झोपण्यापूर्वी चहा पिणे टाळणे गरजेचे आहे.
चहा पिण्यापूर्वी पाणी जरूर प्या
चहामध्ये कॅफिन असते जे आपल्या शरीराचे निर्जलीकरण करू शकते, म्हणजे शरीरातून पाणी बाहेर येऊ शकते. अशा परिस्थितीत चहा पिण्यापूर्वी पाणी प्यावे, जेणेकरून ते शरीराला हायड्रेट ठेवण्यास मदत करेल.
