अननस आणि त्याच्या सालीचे ‘हे’ आश्चर्यकारक फायदे तुम्हाला माहित आहेत का?

फक्त अननस नव्हे त्यावर असलेली कडक साल देखील आपल्या शरीरासाठी अनेक दृष्टीने महत्त्वपूर्ण आहे. जाणून घेऊया आश्चर्यकारक फायदे

Do you know these amazing benefits of pineapple and its peel gst 97
अननस हे आपली प्रतिकारशक्ती वाढवण्यास देखील मदत करतं. हे फळ एक सर्वोत्तम अँटी ऑक्सिडंट आणि अँटी इंफ्लामेंट्री म्हणून काम करतं. (Photo : Unsplash)

आपल्या दैनंदिन आहारात फळाचं असलेलं महत्त्व मोठं आहे, हे आपण सर्वच जण जाणतो. विशिष्ट ऋतूंमध्ये पिकणारी सर्व फळं त्या त्या वेळी खाणं हे आपल्या आरोग्याच्या दृष्टीने अतिशय उत्तम आणि महत्त्वाचं आहे. त्यात काही फळ ही तर आपल्या खास आवडीची असतात. अननस हे त्यातलंच एक फळ. हे फळं चवीला उत्तम आहेच पण त्याच्या सेवनाने आपल्याला शरीराला असंख्य फायदे मिळतात. सर्वात प्रमुख म्हणजे अननस आपली पचनक्रिया सुरळीत करतं. सेलिब्रिटी न्यूट्रिशनिस्ट किनिता कडकिया पटेल यांनी इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या आपल्या व्हिडिओमध्ये म्हटलं आहे की, “अननसात आढळणारे एंजाइम ही आपली पचनक्रिया सुरळीत करण्यास मदत करतात. ब्रोमेलेन असं या एंजाइमचं नाव असून पचनाशी संबंधित सर्व समस्या दूर करण्यास हे मदत करतं.

“हेल्थलाईननुसार, अननसातील आढळणारं ब्रोमेलेन एंझाइम हे त्यातील प्रोटीन मॉलिक्युल्सना अमिनो ऍसिड आणि स्मॉल पेप्टीसाईड्समध्ये विभागतं. जे लहान आतड्यांमध्ये सहज शोषलं जाऊ शकतं. इतकंच नव्हे तर अननस हे आपली प्रतिकारशक्ती वाढवण्यास देखील मदत करतं. ह्यातील व्हिटॅमिन सीमुळे अननस हे फळ एक सर्वोत्तम अँटी ऑक्सिडंट आणि अँटी इंफ्लामेंट्री म्हणून काम करतं. याचसोबत, अननसामध्ये व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन के, फॉस्फरस, झिंक आणि कॅल्शियम देखील असतं.

 

View this post on Instagram

 

A post shared by Kinita Kadakia Patel (@kskadakia)

अननसाची सालही आहे तितकीच गुणकारी

फक्त अननस नव्हे त्यावर असलेली कडक साल देखील आपल्या शरीरासाठी अनेक दृष्टीने महत्त्वपूर्ण आहे. अननसात ब्रोमेलेन एंझाइम आणि व्हिटॅमिन सीव्यतिरिक्त, या फळाच्या सालीमध्ये मोठ्या प्रमाणात मॅंगनीज असल्याने आपले दात आणि हाडे मजबूत करण्यासाठी अत्यंत उपयुक्त म्हणून ओळखली जाते. पण अननसाची साल तर आपण खातच नाही. मग ती आपल्याला उपयुक्त कशी ठरणार? असा प्रश्न तुम्हाला पडला असेलच. तर आता आपण जाणून घेऊया कि अननसाच्या सालीचे सेवन कशी पद्धतीने करता येऊ शकेल.

अननसाच्या सालीपासून बनवा ‘हे’ पदार्थ

  • अननसाच्या सालीचा चहा बनवा : अननसाची साल काढा आणि ती सॉसपॅनमध्ये ठेवा. त्यात लवंग, आलं आणि योग्य प्रमाणात दालचिनीच्या काड्याही घाला. पुढे यात पाणी घाला आणि मंद आचेवर हे सर्व १५ मिनिटं शिजवा. त्यानंतर गॅस बंद करा आणि आणखी १५ मिनिटं तसंच राहू द्या. तुमचा अननसाचा चहा तयार आहे. हा तुम्ही गरम किंवा थंड दोन्ही पद्धतीने सर्व्ह करू शकता. ह्यात चवीसाठी साखरेला पर्याय म्हणून तुम्ही तुमच्या आवडीचे स्वीटनर्स (मध, कोकोनट शुगर, स्टिव्हिया इ.) देखील घालू शकता.
  • अननसाच्या सालीचा ज्यूस : अननसाची साल काढून घ्या आणि त्यात थोडं पाणी घाला. त्यात आणखी काही मिसळण्याची आवश्यकता नाही. ती साल पाण्यात व्यवस्थित उकळू द्या आणि नंतर थंड करा. ते व्यवस्थित ब्लेंड करा आणि चाळणीने गाळून घ्या. हा ज्यूस एका ग्लासमध्ये काढून घ्या आणि थंड होऊ द्या.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Do you know these amazing benefits of pineapple and its peel gst

ताज्या बातम्या