ठराविक भाज्या खाण्याचा कंटाळा आला की गृहिणी अशा वेळी एखादी कडधान्याची उसळ किंवा त्यापासून तयार केलेला चटपटीत पदार्थ मुलांच्या पानात वाढतात. विशेष म्हणजे अनेक लहान मुलांना कडधान्य आवडतात. मात्र, यामध्येदेखील मटकी, मूग, वटाणे ही कडधान्य अधिक खाल्ली जातात. त्याच्या तुलनेत चवळी फारशी खाल्ली जात नाही. परंतु, चवळी खाण्याचे अनेक फायदे असून ती शरीरासाठी अत्यंत गुणकारी असल्याचं सांगण्यात येते. चवळी खाण्याचे नेमके फायदे कोणते ते जाणून घेऊयात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

चवळी खाण्याचे फायदे

  • बद्धकोष्ठतेचा त्रास असल्यास दूर होतो.
  • शरीराला आवश्यक असणारी नैसर्गिक ऊर्जा मिळते.
  • कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रणात राहते.
  • शरीरात वाढलेली अतिरिक्त चरबी कमी होते.
  • रक्तातील हिमोग्लोबिनची पातळी वाढते.
  • घसा सुजल्यास चवळीची पानं पाण्यात टाकून ते उकळवावी. त्यानंतर या पाण्याने गुळण्या कराव्यात.
  • कॅल्शिअम वाढते.

(येथे देण्यात आलेली माहिती गृहीतके आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. अधिक माहितीकरिता तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Do you know these benefits of chowli in diet it is effective against many serious diseases pvp
First published on: 15-08-2022 at 20:13 IST