फेसवॉश, मॉइश्चरायझर्स आणि बॉडी लोशन यांसारखी स्किनकेअर्स बनवताना पुदिन्याची पानं हा त्यातला एक अत्यंत महत्त्वाचा घटक असतो. पुदिन्याच्या पानांमध्ये असलेली पोषक तत्वं त्वचेचं आरोग्य राखण्यासाठी खूप फायदेशीर असतात. इतकंच नव्हे तर अँटीबॅक्टेरिअल गुणधर्म असलेली ही पुदिन्याची पानं उत्कृष्ट क्लींझर, टोनर आणि मॉइश्चरायझर म्हणून वापरली जातात. म्हणूनच इतके गुणधर्म असलेल्या या पुदिन्याच्या पानांचा समावेश आपल्या स्किनकेअर रुटीनमध्ये केल्यास तुम्हाला अनेक आश्चर्यकारक फायदे मिळू शकतात? याचबाबत आज जाणून घेऊया

मुरुमं आणि डाग

पुदिन्याच्या पानांमध्ये सॅलिसिलिक अ‍ॅसिड आणि व्हिटॅमिन ए मुबलक प्रमाणात असतं. जे त्वचेतील सेबम ऑइल सिक्रीशन नियंत्रित करतात. त्वचा तेलकट असल्यास मुरुमांची एक मोठी समस्या निर्माण होते. मात्र, पुदिन्याच्या पानांतील अँटी-बॅक्टेरियल आणि अँटी-फंगल हे गुणधर्म त्वचेची जळजळ रोखतात आणि मुरुमांची समस्या देखील कमी करतात. यासाठी तुम्हाला फक्त पुदिन्याच्या पानांची पेस्ट मुरुमांवर लावायची आहे. १५ मिनिटांसाठी ते सुकायला देऊन नंतर स्वच्छ पाण्याने धुवून टाकायचं आहे. यामुळे तुमच्या चेहऱ्यावरील मुरुमांचे डाग देखील नाहीसे होतील आणि त्वचेची छिद्रही स्वच्छ होतील.

forever particles marathi news, forever particles latest marathi news
विश्लेषण : जगभर पिण्याच्या पाण्यात आढळतात घातक `फॉरएव्हर पार्टिकल्सʼ… त्यांचे उच्चाटन अवघड का असते?
How to make solkadhi marathi recipe
recipe : चिकन, मटणाच्या जेवणासह हवी थंडगार सोलकढी? मालवणी पद्धतीने कशी बनवायची जाणून घ्या
Intermittent Fasting risks heart attack
सावधान! ‘या’ प्रकारचा उपवास केल्याने येऊ शकतो हृदयविकाराचा झटका? स्वतःची काळजी कशी घ्याल?
How To Make Gudi Padwa Sakhrechya Gathi At Home gudi padwa 2024
गुढी पाडव्यासाठी साखरेच्या गाठी यंदा बनवा घरीच, साखरेच्या बत्तास्यांची सोपी झटपट कृती

सुरकुत्या

पुदिन्याची पानं ही माईल्ड ऍस्ट्रिंजण्ट म्हणून देखील काम करू शकतात. ती त्वचेला नैसर्गिकरित्या टोन करण्यास मदत करतात. ही त्वचेवरील छिद्रांमधून मळ काढून टाकतात आणि त्वचेला एक नवसंजीवनी देतात. त्याचसोबत तुमच्या त्वचेला एक उत्तम हायड्रेटेड टोन देखील देतात. याच्या वापराने तुमच्या त्वचेवरील सुरकुत्या आणि बारीक रेषा निघून जातात. यासाठी पुदिन्याच्या पानांचं पॅक चेहऱ्यावर लावा आणि २० ते २५ मिनिटानंतर स्वच्छ पाण्याने धुवून टाका.

डोळ्यांखालची काळी वर्तुळं

पुदिन्याच्या पानातील अँटी-ऑक्सिडंट्स डोळ्यांखालची काळी वर्तुळं देखील कमी करण्यासाठी उत्तम काम करतात. यासाठी एक साधी-सोपा उपाय आहे पुदिन्याच्या पानांची पेस्ट करा. ही पेस्ट तुमच्या डार्क सर्कलवर लावून रात्रभर तशीच ठेवून द्या. सकाळी स्वच्छ पाण्याने व्यवस्थित ती धुवून टाका. असं केल्याने डोळ्यांखाली त्वचेचा टोन हलका होईल आणि डार्क सर्कल दिसणं कमी होईल.

डाग आणि पुरळ

पुदिन्याची पानं ही अँटी-सेप्टिक असतात. त्यामुळे, सतत प्रदूषणाच्या संपर्कात असूनही या पानांचा वापर त्वचेवर डाग आणि पुरळ येण्यापासून रोखतो. इतकंच नव्हे तर यामुळे दीर्घकाळापर्यंत थेट कडक सूर्यप्रकाशात असल्याने त्वचेला होणारं नुकसान देखील कमी होतं. निर्दोष आणि चमकदार त्वचेसाठी पुदिन्याच्या पानांचा अर्क तुमच्या त्वचेवर लावा. प्रभावी परिणामांसाठी महिन्यातून एकदा हा उपाय जरूर करा.

जखम किंवा जळजळ

पुदिन्याच्या पानांमध्ये असलेल्या अँटीइंफ्लामेंट्री गुणधर्मामुळे कोणतीही जखम, अगदी खाज सुटणारी त्वचा देखील बरी करते. यासाठी तुम्ही पुदिन्याच्या पानांचा रस काढून घ्या. हा रस जखमेवर किंवा जळजळ होणाऱ्या त्वचेवरील त्या बाधित भागावर लावा. पुदिन्याच्या पानांच्या रसामुळे तुमची जखम भरण्यास मदत होईल. तसेच त्वचेवर होणारी जळजळ कमी होईल.