व्हॉटसअॅपमधले ‘हे’ फीचर्स तुम्हाला माहितीयेत?

अॅप वापरणे होईल आणखी सुकर

प्रतिकात्मक छायाचित्र

आपल्यातील अनेक जण व्हॉटसअॅप नियमित वापरत असतात. मात्र कामापुरता या अॅपचा वापर करत असल्याने यामध्ये देण्यात आलेल्या काही विशेष सुविधांची आपल्याला माहिती नसते. मात्र हे माहित करुन घेतल्यास हे अॅप्लिकेशन वापरणे आपल्यासाठी आणखी फायद्याचे ठरु शकते. तर काय आहेत या नवीन सुविधा ज्या या कंपनीने आपल्याला उपलब्ध करुन दिल्या आहेत. पाहूया…

१. तुमचे मित्रमैत्रीण नेमके कुठे आहेत हे तुम्ही शोधू शकणार

तुमचा मित्र काही कारणाने तुमच्याशी खोटे बोलत असेल आणि तुम्हाला त्याचा थांगपत्ता काढायचा असेल तर हा शोध घेता येणार आहे. तुमच्या मित्राला तुम्ही त्याचे लोकेशन शेअर करायला सांगू शकताय त्यामुळे तो नेमका कुठे आहे हे तुम्हाला अगदी काही क्षणात कळेल. अशाप्रकारे लोकेशन शेअर केल्यावर त्या विशिष्ट पत्त्याचे नाव तुम्हाला दिसणार नाही.

२. वेगवेगळ्या चॅटसाठी वेगवेगळ्या टोन्स

आपण मोबाईलला ज्याप्रमाणे वेगवेगळ्या व्यक्तींसाठी वेगवेगळ्या रिंगटोन सेट करु शकतो त्याचप्रमाणे व्हॉटसअॅप चॅटसाठीही वेगवेगळ्या टोन्स लावता येणार आहेत. त्यामुळे केवळ मोबाईल वाजल्यावर कोणाचा मेसेज आला हे समजू शकणार आहे. व्हॉटसअॅपमधील सेटींग्जमध्ये जाऊन हे कस्टम नोटीफीकेशन चालू करता येऊ शकते.

३. मोबाईल डेटा करा सेव्ह

तुम्ही ३ जी किंवा ४ जी कोणतीही सुविधा वापरत असाल किंवा वायफाय आणि अनलिमिटेड इंटरनेट सुविधेचा लाभ घेत असाल तरीही तुम्ही इंटरनेट डेटा सेव्ह करु शकता.

४. या अॅपशी तुमच्या फोनमधील सगळे कॉन्टॅक्ट जोडू शकता

तुम्ही नवीन फोन घेतला आणि तुमच्या जुन्या फोनमधले सगळे कॉन्टॅक्ट नंबर तुम्हाला नव्या फोनवर घ्यायचे असतील तर तुम्ही हे व्हॉटसअॅप डाऊनलोड करुन तुमचा मोबईल नंबर कनेक्ट केल्यास तुमचे जुने कॉन्टॅक्ट तुम्हाला मिळू शकतात.

५. महत्त्वाचे मेसेज स्टार करुन ठेवता येतील

एखाद्या ग्रुपवर काही महत्त्वाचे मेसेज आला असल्यास तो स्टार करुन ठेवता येतो जेणेकरुन तुम्हाला पाहीजे तेव्हा तो मेसेज सहजपणे काढून वाचता येतो. यामध्ये संपूर्ण ग्रुपमधील मेसेजेस वर स्क्रोल करण्याची आवश्यकता नसते.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Do you know these new features of whatsapp