Do you let children drink tea : लहान मुलांना लहानपणी चांगल्या सवयी लावणे, ही पालकांची जबाबदारी असते. त्यांना पोषक आहार देणे, नियमित व्यायाम करायला सांगणे, नियमित अभ्यास करायला सांगणे, खेळण्याची वेळ ठरविणे इत्यादी गोष्टी पालक मुलांना शिकवत असतात. अनेकदा लहान मुलांना वाईट सवयी लागू नये, याची काळजी सुद्धा घेतात. पण अनेकदा लाड पुरवण्यासाठी लहान मुलांना चुकीच्या सवयी नकळत लागतात. तुम्ही तुमच्या लहान मुलांना चहा प्यायला देता का? जर हो तर त्याचे दुष्परिणाम तुम्हाला माहितीये का? आज आपण त्याविषयीच जाणून घेणार आहोत.
सध्या एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक तज्ज्ञ लहान मुलांना चहा प्यायला का देऊ नये, याविषयी सांगताना दिसत आहे. हा व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे.
हेही वाचा : पोळीला तूप, साखर लावून खाल्ल्याने होतात अनेक फायदे; पण खाण्याची योग्य वेळ कोणती?
या व्हायरल व्हिडीओमध्ये डॉ. मानसी मेहेंदळे सांगतात, “तुम्ही लहान मुलांना चहा प्यायला देता का? मग हा व्हिडीओ खास तुमच्यासाठी आहे. चहामध्ये टॅनिन असतं त्यामुळे शरीरात लोह आणि कॅल्शियम शोषून घेण्याची क्षमता कमी होते. त्यामुळे लहान मुलांमध्ये अॅनेमिया किंवा त्यांची हाडे ठिसूळ होणे, दातांवर कॅव्हिटी निर्माण होणे. इत्यादी लक्षणे निर्माण होतात. चहा खूप अॅसिडिक असतो त्यामुळे दातांचा पिवळेपणा, प्लाक तयार होणं इत्यादी सगळ्या तक्रारी लहान मुलांमध्ये निर्माण होऊ शकतात. मग मुले चिडचिडी होतात आणि त्यांची ही सवय दूर होत नाही आणि मग ते चहाबाज होऊन जातात. जर तुमच्या मुलांमध्ये जर तुम्हाला ही लक्षणे बघायची नसतील मग आजपासून त्यांना दूधच प्यायला द्या”
हेही वाचा : हिवाळ्यात कमी वर्कआउट करून आरोग्यास कसा फायदा मिळू शकतो? जाणून घ्या, तज्ज्ञ काय सांगतात….
पाहा व्हायरल व्हिडीओ, येथे क्लिक करा
हेही वाचा : दररोज ५ मशरूम खाल्ल्याने शरिरावर काय परिणाम होतात; फायदे ऐकून लगेच आहारात समावेश कराल
healyourselfwith_manasikrishna या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “लहान मुलांना प्यायला चहा का देऊ नये?” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “माझे आजोबा ९८ वर्षे जगले अगदी शेवट पर्यंत चहाच प्यायचे, आजीला आजही दिवसात ५-६ वेळा चहा लागतो, आई वडील सत्तरी पार आहे ते ही ५-६ वेळा चहा घेतात, तेव्हा चहा प्या मस्त एंजॉय करा, मला दोन वर्षांचा असल्या पासून आजी आजोबा चहा देतात” तर एका युजरने लिहिलेय, “शक्य तो गाईचं दूध लहान मुलांना पिण्यासाठी व भाकरीबरोबर खाण्यासाठी अवश्य द्या. आम्ही माझ्या वयाच्या बालपणापासून दुध पितोय.आता माझं वय ६३ वर्ष चालू आहे. मला आतापर्यंत कोणताच आजार नाही.” आणखी एका युजरने लिहिलेय, “खूप छान माहिती दिली, धन्यवाद” एक युजर लिहितो, “मी माझ्या मुलांना नियमित दूध प्यायला देतो”