Poha Benefits: महाराष्ट्रात पोहे हा सर्वांचाच आवडता नाश्ता आहे. चवीबरोबर हे आरोग्यासाठीही खूप फायदेशीर आहे. याचे सेवन केल्याने आपण तंदुरुस्त तर होतोच, सोबतच वजन कमी करण्यासही हे उपयुक्त आहे. यामध्ये कार्बोहायड्रेट पुरेशा प्रमाणात आढळते आणि त्यात शरीरासाठी आवश्यक जीवनसत्त्वेदेखील असतात. सकाळच्या वेळी लोकांना पोहे खायला आवडतात, कारण ते सहज पचतात. पण, तुम्हाला माहीत आहे का की ते तुमच्या आरोग्यासाठीदेखील फायदेशीर आहे? पोह्याचे अनेक आरोग्य फायदे आहेत, जे आपण या लेखात शेअर करणार आहोत. पोहे खाणे तुमच्या आरोग्यासाठी कसे फायदेशीर ठरू शकते ते पाहूया.

एका संशोधनातून हे स्पष्ट झाले आहे की, नाश्त्यामध्ये दररोज पोहे खाल्ल्याने शरीराला फायदा होतो. पोहे खाल्ल्याने तुम्ही दिवसभर ताजेतवाने राहता आणि तुमची पचनक्रिया चांगली राहते. त्याचबरोबर जर तुम्ही नाश्त्यात सोयाबीन, ड्रायफ्रूट्स आणि अंडी खाल्ल्यास तुम्हाला प्रोटीनसोबतच जीवनसत्त्वेही मिळतात.

पोहे खाण्याचे फायदे

पचनासाठी फायदेशीर

पोहे खाण्याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे ते तुमची पचनक्रिया सुधारते. त्यात उच्च फायबर सामग्री असल्याने बद्धकोष्ठता टाळता येते आणि जरी तुम्हाला ती आधीच झाली असली तरी ती कमी होण्यास मदत होते. शिवाय फायबर आतड्यांच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे, ते आतड्यांचे सूक्ष्मजीव सुधारते. जर तुम्हाला लिंबाच्या रसासह पोहे खाण्याचा आनंद वाटत असेल तर ते आणखी फायदेशीर ठरू शकते. लिंबाची आंबट चव तोंडात लाळ निर्मितीला उत्तेजन देते, ज्यामुळे पचनक्रियेत मदत होते.

रक्तातील साखर नियंत्रित करते

पोहे हे कमी ग्लायसेमिक असलेले अन्न आहे, म्हणजेच ते रक्तातील साखरेची पातळी वाढवत नाही, जे मधुमेहींसाठी फायदेशीर ठरू शकते. याचे एक कारण त्यातील फायबरचे प्रमाण असू शकते, जे रक्तप्रवाहात हळूहळू साखर सोडते, म्हणून तुमच्या आहारात पोह्याचा समावेश करणे मधुमेह प्रतिबंधासाठी फायदेशीर ठरू शकते .

ऊर्जा मिळते

पोह्यात कार्बोहायड्रेट्सचे प्रमाण जास्त असते, म्हणून नाश्त्यात ते खाल्ल्याने दिवसभरासाठी ऊर्जा मिळते. तथापि, ते खाताना प्रमाण नियंत्रित ठेवणे महत्त्वाचे आहे.

प्रथिने मिळतात

पोहे अधिक पौष्टिक बनवण्यासाठी तुम्ही शेंगदाणे आणि अंकुर घालू शकता. यामुळे तुम्हाला केवळ प्रथिनेच मिळणार नाहीत तर पोह्यांची चवही वाढेल.
वजन कमी करण्यास मदत होते. पोह्यांमध्ये चरबीचे प्रमाण ३० टक्क्यांपेक्षा कमी असते. कमी कॅलरीज असल्याने ते वजन कमी करण्यास मदत करते. तथापि, त्यात कार्बोहायड्रेट्सचे प्रमाण जास्त असल्याने त्याचे मर्यादित प्रमाणात सेवन करावे.

शरीरातील अशक्तपणा कमी होतो

पोह्यात भरपूर प्रमाणात लोह असतात, जे शरीरातील अशक्तपणाचा कमी करण्यास मदत करते.