Do you Love on Yourself : अनेकदा आपण इतर लोकांना आनंदी ठेवण्याच्या नादात स्वत: आनंदी कसं राहायचं, हे विसरुन जातो पण स्वत: नेहमी आनंदी राहणे, खूप महत्त्वाचं आहे.
कधी तुम्ही स्वत:ला प्रश्न विचारा की स्वत:वर तुम्ही खरंच प्रेम करता का? जो व्यक्ती स्वत:वर प्रेम करतो तो व्यक्ती इतरांना प्रेम देऊ शकतो. त्यामुळे जर तुम्ही स्वत:वर प्रेम करत असाल तर खालील चार गोष्टी चुकूनही करू नका.
- कुटूंब, मित्र यांना आपण खूप जवळचे मानतो आणि यांच्याबरोबर प्रत्येक गोष्टी शेअर करतो पण अनेकदा हेच लोकं आपल्या दु:खाचे कारण असू शकतात. हे सत्य स्वीकारणे कदाचित तुमच्यासाठी खूप कठीण असू शकते पण अशा लोकांपासून स्वत:ला दूर ठेवावे.
- तुम्ही कुठे राहता? तुम्ही कुठे काम करता? याचा थेट परिणाम तुमच्या आयुष्यावर होतो. जर तुम्हाला तुमच्या आजुबाजूला सतत तणाव जाणवत असेल तर अशा गोष्टींपासून स्वत:ला दूर ठेवा.
हेही वाचा : तुम्हालाही नियमित लिपस्टिक लावायची सवय आहे? आताच थांबवा; जाणून घ्या एकदा हे दुष्परिणाम….

निज्जर हत्येप्रकरणी भारतावर आरोप करणाऱ्या कॅनडाला उपरती; पंतप्रधान ट्रुडो म्हणाले, “जगभरात भारताचा प्रभाव…”

नाद करायचा नाय! बाकी कंपन्या बघतच राहिल्या, देशात दाखल झाली नवी बुलेट, किंमत फक्त…

“…अन्यथा भाजपात प्रवेश केला असता”, शिंदे गटातील मंत्र्याचं मोठं विधान

शेंगदाण्याची चिक्की खायला आवडते का? फॅक्टरीमधील व्हायरल व्हिडीओ पाहून चिक्की खाण्यापूर्वी १०० वेळा विचार कराल
- काही लोकांना छोट्या मोठ्या गोष्टींसाठी दुसऱ्यांना दोष देण्याची सवय असते. जर तुम्ही तुमच्या आयुष्यातील अडचणी आणि छोट्या मोठ्या समस्यांसाठी इतरांना दोष देत असाल तर आताच थांबवा. ही खूप चुकीची सवय आहे. स्वत:च्या चुकांची आणि दु:खाची जबाबदारी व्यक्तीने स्वत: घ्यावी.
- सर्वांना आनंदी ठेवणे, अशक्य आहे. जे लोक स्वत:ला अडचणीत आणून इतरांना आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करतात ते नेहमी दु:खी राहतात. त्यामुळे व्यक्तीने असा मार्ग निवडावा की दुसऱ्याला आनंदी ठेवण्यासाठी त्याला स्वत: कोणताही त्रास सहन करावा लागणार नाही.
(टीप : वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)