Best Places In Maharashtra To Visit in Monsoon : सध्या सगळीकडे पावसाची चाहूल लागली आहे. निसर्गात बदल होताना दिसतोय. अशात सुंदर निसर्गाचे दर्शन घेण्यासाठी पावले आपोआप घराबाहेर पडतात. तुम्ही यंदा कुठे फिरायला जाण्याचा प्लॅन केला आहे. जर आतापर्यंत केला नसेल तर बातमी नक्की वाचा. कारण आज आम्ही तुम्हाला पावसाळ्यात भेट देता येईल अशी महाराष्ट्रातील सुंदर निसर्गरम्य दहा ठिकाणांविषयी सांगणार आहोत. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये या दहा ठिकाणांविषयी सांगितले आहेत.

या व्हायरल व्हिडीओमध्ये सांगितल्याप्रमाणे –

माथेरान

मुंबईजवळ असलेले माथेरान पावसाळ्यात फिरण्यासाठी उत्तम ठिकाण आहे. एक दिवसीय ट्रिपचा तुम्ही प्लॅन करत असाल तर माथेरान हा चांगला पर्याय आहे. येथील टॉय ट्रेनचा प्रवास नक्की करा.

ताम्हिणी घाट

पुण्यापासून अवघ्या ५० किमीवर असलेले ताम्हिणी घाट पावसाळ्याचा आनंद लुटण्यासाठी उत्तम जागा आहे. दुचाकीने प्रवास करून तुम्ही या ट्रिपची मजा द्विगुणित करू शकता.

विसापूर किल्ला

विसापूर गावाजवळील हा किल्ला लोणावळ्याजवळ आहे. साहसी ट्रेकचा अनुभव घ्यायचा असेल तर तुम्ही पावसाळ्यात विसापूर किल्ल्याला नक्की भेट द्या.

देवकुंड धबधबा

रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यात हा सुंदर देवकुंड धबधबा आहे. पावसाळ्यात पर्यटकांसाठी देवकुंड धबधबा आवडतं ठिकाण आहे. या सुंदर धबधब्याला तुम्ही भेट देऊ शकता.

हेही वाचा : रस्त्याने चालणाऱ्या तरुणीवर भटक्या श्वानांचा जीवघेणा हल्ला; किंचाळली, ओरडली पण…; थरारक घटनेचा video व्हायरल

भोरगिरी

पावसाळ्यात मंत्रमुग्ध करणारी जागा म्हणजे भोरगिरी किल्ला. त्यामुळे या पावसाळ्यात भोरगिरीला अवश्य भेट द्या.

वरंध घाट

जर तुम्हाला बाइक राइडची आवड असेल तर पावसाळ्यात तुम्ही वरंध घाटला भेट देऊ शकता आणि येथील निसर्गरम्य सौंदर्य अनुभवू शकता.

महाड

जर तुम्हाला पावसाळ्यात झरे आणि धबधब्यांचा आनंद घ्यायचा असेल तर महाड ही उत्तम जागा आहे. येथे अनेक लहान मोठे धबधबे आहेत आणि विशेष म्हणजे येथे गर्दी खूप कमी असते.

पानशेत

पावसाळ्यात पानशेत गेला नाही तर तुम्ही काही मिस कराल. पुण्यापासून फक्त एका तासावर असलेले पानशेत पावसाळ्याचा आनंद घ्यायला उत्तम जागा आहे. येथील पानशेत धरण पर्यटकांसाठी खास आकर्षणाचे केंद्रबिंदु आहे.

माळशेज घाट

मुंबईकरांसाठी ही जागा अत्यंत खास आहे. बाइक राइडचा आनंद घेत तुम्ही पावसाळ्यात या जागेला भेट देऊ शकता.

खंडी

पुण्यापासून एका तासावर असलेली ही जागा अतिशय सुंदर आणि नयनरम्य आहे. येथे अनेक लहान मोठे धबधबे तुम्हाला पाहायला मिळेल.

ss_trekkers यांनी इन्स्टाग्रामवर हा व्हिडीओ शेअर केला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “पावसाळ्यात भेट देण्यासाठी महाराष्ट्रातील दहा सुंदर असे ठिकाणे” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “कास पठार, सातारा” तर एका युजरने लिहिलेय, “नाशिकच्या त्र्यंबकेश्वरला सुद्धा भेट दिली पाहिजे.