सुंदर दिसण्यासाठी आपण आपल्या चेहऱ्याची, त्वचेची, केसांची विशेष काळजी घेतो. शक्य ते सर्व उपाय वारंवार करून पहातो. तर आकर्षक दिसण्यासाठी, तंदुरुस्त राहण्यासाठी व्यायाम करतो, वेगवेगळ्या प्रकारची डाएट्स फॉलो करतो. परंतु, हे सगळं करताना आपलं काही महत्त्वाच्या गोष्टीकडे खूप दुर्लक्ष होतं. ओरल हायजीन हा त्यापैकीच एक मुद्दा. आपल्या दातांच्या तोंडाच्या आरोग्याबाबत कधी तुम्ही गांभीर्याने विचार केला आहे का? उलट आपल्यापैकी अनेक जण डेंटिस्टकडे जायलाच घाबरतात. परिणामी आपल्या तोंडाच्या आणि दातांच्या आरोग्याकडे, स्वच्छतेकडे आपलं संपूर्ण दुर्लक्ष होतं. हे टाळायला हवं. प्रोस्थोडोन्टिस्ट, इम्प्लांटोलॉजिस्ट आणि स्माईल डिझाइन तज्ञ असलेल्या डॉ. दीक्षा ताहिलरामणी बत्रा म्हणतात कि, “लोक मुळात दात घासतानाच काही चुका हमखास करतात. त्यामुळे आपल्या तोंडाचं आणि दातांचं आरोग्य बिघडतं.” म्हणूनच आज आपण अशाच काही चुकीच्या सवयी, पद्धती आणि त्यावरच्या उपायांबाबत जाणून घेणार आहोत. जेणेकरून आपल्या दात आणि तोंडाचं आरोग्य बिघडणार नाही.

१) योग्य टूथब्रश न वापरणं

आपल्याकडचा सर्वात मोठा चुकीचा समज म्हणजे दात व्यवस्थित स्वच्छ करण्यासाठी मिडीयम किंवा हार्ड टूथब्रशचा वापर करावा लागतो. मात्र, ह्यात कोणतंही तथ्य नसून उलट हार्ड ब्रशच्या वापराने आपल्या हिरड्यांना आणि तोंडाला इजा होऊ शकते. काही वर्षांनी ही चुकीचं सवय आपल्याला खूप मोठं नुकसान पोहोचवू शकतं.

why Sleeping Pills Rising Among Young Adults
झोपेच्या गोळ्या निद्रानाशावरचा अंतिम उपाय आहेत का? झोपेच्या गोळ्या शक्यतो घेऊ नका असं डॉक्टर का सांगतात?
Video 5 Rupees Lemon Jugad How To Clean Gas Burners at Home
अर्ध्या लिंबाच्या रसात ‘ही’ गोष्ट मिसळून अर्धवट पेटणाऱ्या गॅस बर्नरवर करा उपाय; पैसे, वेळ वाचवणारा जुगाड, Video
cabbage for weight loss
तुमच्या घरी कायम असणारी ‘ही’ भाजी वाढलेले वजन झपाट्याने करेल कमी; लगेच करा रोजच्या जेवणात समावेश
naralachya rasatali bhendi recipe in marathi
नारळाच्या रसातली भेंडीची भाजी; भेंडीची भाजी गिळगिळीत म्हणून नाकं मुरडणारेही खातील आवडीने

२) अँटी सेन्सिटिव्हिटी/व्हाईटनिंग टूथपेस्टचा प्रमाणाबाहेर वापर

अनेक जण सेन्सिटिव्ह दातांच्या कारणामुळे खूप जास्त काळासाठी औषधी टूथपेस्ट वापरतात. ही हमखास होणारी चूक आहे. मात्र, यामुळे तुमच्या दातांची समस्या कायमस्वरूपी सुटत नाही. तर फक्त त्यावर पडदा टाकला जातो. तसंच, या सवयीमुळे तुम्हाला कॅव्हिटीज, हिरड्यांचे आजार, तोंडाला येणारी दुर्गंधी अशा अनेक समस्यांना तोंड द्यावं लागू शकतं. जर तुम्ही दिवसातून २ वेळा योग्य पद्धतीने ब्रश करत असाल तर तुमची टूथपेस्ट कोणत्या प्रकारची आहे ह्याने फारसा फरक पडत नाही.

सेन्सिटिव्ह टूथपेस्ट या विशिष्ट कालावधीसाठी वापरायच्या असतात. तर व्हाईटनिंग टूथपेस्ट या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच वापरणं योग्य ठरतं. तुमच्या दातांचं संभाव्य नुकसान टाळायचं असल्यास या गोष्टी लक्षात घ्या. कोणतीही टूथपेस्ट वापरण्याचा मूळ हेतू हा दात आणि हिरड्यांचं संरक्षण हाच असतो. त्यामुळे, दात किडू नयेत तसेच हिरड्यांचे आजार आणि तोंडाच्या दुर्गंधीवर उपाय म्हणून फ्लॉरॉईड जेल-बेसेड कॉम्बिनेशन असलेल्या टूथपेस्टचा वापर करणं जास्त योग्य ठरतं.

३) खूप पटकन किंवा दिवसातून खूप वेळा ब्रश करणं

सुरुवातीलाच म्हटल्याप्रमाणे, आपल्यापैकी बर्‍याच जणांना डेंटिस्टकडे जायला आवडत नाही. त्यामुळे यावरचा पर्याय म्हणून आपण स्वतः च नीट ब्रश करणं हा सोपा उपाय स्वीकारतो. पण या उपायाने तुम्हाला कॅव्हिटीजच्या समस्येशी सामना करता येणार नाही. ब्रशिंगचे देखील काही नियम आहेत. त्यापैकी महत्त्वाचं म्हणजे दिवसातून २ हून जास्त वेळा ब्रश करू नका. जास्त प्रमाणात ब्रश करणं, आवश्यकतेपेक्षा जास्त जोर लावू नका. कारण, त्याने तुमच्या हिरड्यांना नुकसान पोहोचू शकतं. डेस्न्टिस्ट देखील वारंवार हा सल्ला देतात. कारण, दिवसातून खूप वेळा किंवा खूप जोरात ब्रश केल्याने विशेष काही फरक पडत नाही. उलट नुकसान होतं.

४) ब्रश करण्याची चुकीची पद्धत

बऱ्याच जणांना ब्रश आडवा धरून दात घासण्याची सवय असते. मात्र, ही अत्यंत पूर्णपणे चुकीची पद्धत आहे. नेहमी दात घासताना आपला ब्रश आडवा नव्हे तर उभा धरावा. असं केल्याने दात योग्यप्रकारे स्वच्छ होतात. त्याचसोबत, आपला ब्रश हिरड्यांपासून ४५ अंशाच्या कोनात धरून दात आणि हिरड्यांवर तो वर-खाली अशा दिशेने फिरवा. उजवीकडून डावीकडे किंवा डावीकडून उजवीकडे अशा पद्धतीने ब्रश करू नका. तसेच तुम्ही आतापर्यंत दुर्लक्ष करत आलेल्या दातांच्या आतल्या भागाला देखील आठवणीने स्वच्छ करा.

५) दातांशी कुस्ती नको!

आपल्या दातांशी कुस्ती खेळू नका. कारण, खूप ताकद लावून ब्रश करणं तुमच्या दातांना मोठं नुकसान पोहोचवू शकतं. दरम्यान, ब्रश करण्यासंदर्भात आपल्याला असलेल्या या सगळ्या चुकीच्या सवयी मोडणं बरंच कठीण आहे. म्हणूनच अनेकदा ऑटोमाटिक ब्रशचा वापर करण्याचा सल्ला देखील दिला जातो. हा ऑटोमॅटिक ब्रश अ‍ॅड्जस्ट होण्यासाठी थोडा वेळ लागू शकतो परंतु याद्वारे आपल्या दात स्वच्छ करणं सोपं होतं आणि दातांचं आरोग्य चांगलं ठेवायला मदत होते. त्याचसोबत वारंवार डेंटिस्टकडे जाणायची गरज भासत नाही.

डॉ. बत्रा याविषयी सांगतात कि, “दात घासणं हा दंतोपचारांच्या काळजीचा एक भाग आहे. दिवसातून २ वेळा योग्यरित्या दात घासल्याने ते स्वच्छ होतात. त्याचसोबत रेशमी धाग्याने दात स्वच्छ करण्याची सवय देखील लावून घ्या. असं केल्याने दातांवरील थर आणि अडकून राहिलेले अन्नपदार्थांचे कण काढून टाकण्यास मदत होते. याचसोबत, संतुलित आहार घ्या आणि जेवणादरम्यानस अल्पोपहाराचं (स्नॅक्सचं) प्रमाण मर्यादित ठेवा. तसेच, प्रोफेशनल डेंटल क्लिनिंगसाठी नियमित चांगल्या डेंटल क्लिनिकला भेट द्या.”