Dry Fruit for Uric Acid: सध्या अनेक लोकांना त्रास देणाऱ्या आजारांमध्ये युरिक अ‍ॅसिड ही समस्या झपाट्याने वाढताना दिसत आहे. हातापायांच्या सांध्यांमध्ये असह्य वेदना, सूज, चालताना त्रास, अचानक बोटांमध्ये टोचल्यासारखी वेदना… अशी अनेक लक्षणं दिसू लागली की, लोक घाबरून जातात. विशेष म्हणजे अनेकांना सुरुवातीला ही साधी सांधेदुखी वाटते; पण तपासणीनंतर त्यामागे वाढलेलं युरिक अ‍ॅसिड कारणीभूत असल्याचं समोर येतं.

मात्र, आता एक अशी गोष्ट समोर आली आहे, ज्यामुळे युरिक अ‍ॅसिडच्या रुग्णांमध्ये उत्सुकता वाढली आहे. डॉक्टरांच्या मते, एक खास ड्रायफ्रूट शरीरातील सूज कमी करण्यास आणि सांध्यांच्या वेदनांपासून आराम मिळवून देण्यास मदत करू शकतो. विशेष म्हणजे, हा पदार्थ जवळपास प्रत्येक घरात सहज उपलब्ध असतो.

पण नेमकं कोणतं आहे हे ड्रायफ्रूट? त्याचा शरीरावर कसा परिणाम होतो? हे जाणून घेण्यास लोक अधिक उत्सुक आहेत.

युरिक अ‍ॅसिड वाढणं इतकं धोकादायक का?

युरिक अ‍ॅसिड हा शरीरात तयार होणारा एक प्रकारचा अपायकारक घटक आहे. शरीरातील प्युरिन नावाच्या पदार्थाचं विघटन झाल्यानंतर तो तयार होतो. सामान्य परिस्थितीत मूत्रपिंड शुद्धीकरण करून हा घटक लघवीद्वारे शरीराबाहेर टाकते.

मात्र, जेव्हा शरीरात युरिक अ‍ॅसिडचं प्रमाण जास्त वाढतं किंवा मूत्रपिंड योग्य त्या प्रमाणात बाहेर टाकू शकत नाही, तेव्हा रक्तात त्याचं प्रमाण वाढू लागतं. त्यामुळे हळूहळू सांध्यांमध्ये लहान खडे जमा होऊ लागतात.

हे खडेच पुढे जाऊन तीव्र सांधेदुखी, सूज आणि गाऊटसारख्या समस्यांना कारणीभूत ठरतात.

‘या’ लक्षणांकडे करू नका अजिबात दुर्लक्ष

तज्ज्ञांच्या मते, युरिक अ‍ॅसिड वाढल्यास शरीर काही स्पष्ट संकेत देऊ लागतं.

  • पायांच्या बोटांमध्ये तीव्र वेदना
  • गुडघे आणि सांध्यांमध्ये सूज
  • चालताना त्रास
  • हात-पायांमध्ये जळजळ
  • सकाळी उठताना सांधे आखडल्यासारखे वाटणे

अनेक वेळा ही लक्षणं सुरुवातीला किरकोळ वाटतात; पण दुर्लक्ष केल्यास समस्या गंभीर होऊ शकते.

कोणत्या पदार्थांमुळे वाढतं युरिक अ‍ॅसिड?

डॉक्टरांच्या मते, काही खाद्यपदार्थांमध्ये प्युरिनचं प्रमाण जास्त असतं. त्यामुळे शरीरात युरिक अ‍ॅसिड वेगाने वाढू शकतं.

विशेषतः
रेड मीट, समुद्री मासे, जास्त साखर असलेले प्रोसेस्ड पदार्थ, रिफाईंड कार्बोहायड्रेट आणि काही डाळींचं अतिसेवन यांमुळे हा धोका वाढतो.

त्यामुळे आहारावर नियंत्रण ठेवणं अत्यंत गरजेचं मानलं जातं.

संशोधनात काय समोर आलं?

अमेरिकन जर्नल ऑफ क्लिनिकल न्यूट्रिशनमध्ये प्रकाशित झालेल्या संशोधनानुसार, अक्रोडामध्ये ओमेगा-3 फॅटी अ‍ॅसिड (ALA) आणि पॉलीफेनोल्स मोठ्या प्रमाणात आढळतात. हे घटक शरीरातील सूज कमी करण्यास मदत करू शकतात. युरिक अ‍ॅसिड वाढल्यानंतर सांध्यांमध्ये तयार होणाऱ्या क्रिस्टल्समुळे वेदना आणि सूज निर्माण होते. अशा वेळी एक खास ड्रायफ्रूटसमधील अँटीऑक्सिडंट्स शरीरातील दाह कमी करण्यास मदत करतात, असं संशोधनात नमूद करण्यात आलं आहे.

तसेच जर्नल ऑफ न्यूट्रिशनमध्ये प्रकाशित अभ्यासानुसार, अक्रोड रक्ताभिसरण सुधारण्यास मदत करू शकतो. त्यामुळे किडनी रक्त अधिक चांगल्या प्रकारे फिल्टर करू शकते आणि शरीरातील अतिरिक्त युरिक अ‍ॅसिड बाहेर टाकण्यास मदत होऊ शकते.

डॉक्टरांनी सांगितलं ‘त्या’ ड्रायफ्रूटचं महत्त्व

आरोग्यतज्ज्ञांच्या मते, एक विशिष्ट सुका मेवा युरिक अ‍ॅसिड थेट कमी करत नसलं तरी शरीरातील सूज कमी करण्यास मदत करू शकतो. त्यामुळे गाऊटमुळे होणाऱ्या वेदनांमध्ये आराम मिळू शकतो.

संशोधनानुसार, या सुका मेव्यामध्ये ओमेगा-3 फॅटी अ‍ॅसिड, अँटीऑक्सिडंट्स व पॉलीफेनोल्स मोठ्या प्रमाणात असतात. हे घटक शरीरातील दाह कमी करण्यास मदत करतात.

तसेच रक्ताभिसरण सुधारण्यास आणि मूत्रपिंडाची कार्यक्षमता चांगली ठेवण्यासही मदत होऊ शकते, असं काही अभ्यासांमध्ये नमूद करण्यात आलं आहे.

किती प्रमाणात खाणं योग्य?

तज्ज्ञांच्या मते, युरिक अ‍ॅसिड असलेल्या रुग्णांनी कोणतीही गोष्ट अति प्रमाणात खाऊ नये; संतुलित प्रमाण महत्त्वाचं असतं.

खावयाचा पदार्थ रात्री भिजवून सकाळी खाणं अधिक फायदेशीर मानलं जातं. तसेच मीठ किंवा साखर युक्त पदार्थ टाळावेत.

मग कोणता आहे हा सुका मेवा?

इतका वेळ ज्याबद्दल उत्सुकता होती, ते सुका मेवा म्हणजे अक्रोड.

अक्रोडमध्ये प्युरिनचं प्रमाण कमी असतं. त्यामुळे तो मर्यादित प्रमाणात खाल्ल्यास युरिक अ‍ॅसिडच्या रुग्णांसाठी तुलनेनं सुरक्षित मानला जातो. त्यातील ओमेगा-3 फॅटी अ‍ॅसिड शरीरातील सूज कमी करण्यास मदत करू शकतात.

मात्र, डॉक्टर स्पष्ट सांगतात की, अक्रोड हा कोणताही जादुई इलाज नाही. योग्य आहार, पुरेसं पाणी, नियमित व्यायाम आणि डॉक्टरांचा सल्ला हेच युरिक अ‍ॅसिड नियंत्रणात ठेवण्यासाठी सर्वांत महत्त्वाचे उपाय आहेत.