कंडिशनरमुळे तुमचे केस गळतात का? जाणून घ्या तज्ञ काय म्हणतात

कंडिशनर केसांना कोरडे होण्यापासून रोखते. कोरड्या केसांना डीप कंडिशनर लावल्याने फायदा होतो.

lifestyle
कंडिशनर तुमच्या केसांमधील कोरडेपणा दूर करण्याबरोबरच ओलावा टिकवून ठेवतो. (photo: pexels)

स्त्री असो वा पुरुष, नैसर्गिकरित्या चमकदार आणि रेशमी केस असणे हे प्रत्येकाचे स्वप्न असते. पण हे प्रत्येकासोबत घडत नाही, त्यामुळे लोक बाजारात उपलब्ध असलेले हेअर कंडिशनर लावणे पसंत करतात. यामुळे केस त्वरित चमकदार आणि मऊ होतात. तथापि, बर्‍याच लोकांचा असा विश्वास आहे की दररोज केसांना कंडिशनर लावल्याने केस गळतात. पण खरंच असं आहे का? कंडिशनरमुळे केस गळत नाहीत, असे त्वचारोगतज्ज्ञ डॉ. आंचल पंथ सांगतात. वास्तविक कंडिशनर फक्त केसांच्या खालच्या टोकापासून मध्यम लांबीपर्यंत म्हणजेच दोन तृतीयांश केसांवर लावावे. आणि हे लावल्यानंतर चांगले धुवावे. मात्र हे लक्षात ठेवा की, कंडिशनर टाळूला लावू नये.

कंडिशनर लावण्याचे फायदे

केस कोरडे होण्यापासून प्रतिबंधित करते

कंडिशनर केसांना कोरडे होण्यापासून रोखते. कोरड्या केसांना डीप कंडिशनर लावल्याने फायदा होतो. यामुळे तुमचे केस मऊ आणि सुंदर दिसतात आणि तुटत नाहीत.

केसांमध्ये गुंतागुंत होत नाही

कंडिशनरमुळे केस मऊ होतात त्यामुळे तुमचे केस गुंतत नाहीत. कंडिशनर लावल्यानंतर ओल्या केसांना फणी फिरवल्यास केसांचे कमी नुकसान होते. त्यामुळे केसांमध्ये गुंता राहत नाही आणि केस सहज उलगडतात.

कंडिशनर केसांची चमक वाढवते

कंडिशनरमध्ये प्रथिने, तेल आणि पाणी हे तिन्ही घटक असतात. अशा परिस्थितीत तुम्ही त्याचा रोज वापर केल्याने केसांची चमक कायम राहते. तसेच केसांना वेगळा आणि सुंदर लुक येतो.

कोरड्या केसांना मॉइश्चरायझ करा

कंडिशनर तुमच्या केसांमधील कोरडेपणा दूर करण्याबरोबरच ओलावा टिकवून ठेवतो. केसांमध्ये ओलावा टिकून राहिल्याने केस तुटणे, फाटे फुटणे अशा समस्यांपासूनही तुम्हाला सुटका मिळू शकते.

कंडिशनर केस गळण्यापासून थांबवते

अनेकदा आंघोळ केल्यावर किंवा केस धुतल्यावर केस खूप गळतात अशी अनेकांची तक्रार असते. अशा स्थितीत कंडिशनर वापरल्याने तुमच्या अशा प्रकारच्या समस्येपासून सुटका मिळू शकते.

तज्ञांच्या मते जर तुमची टाळू खूप तेलकट असेल आणि केस देखील पातळ असतील तर तुम्ही कंडिशनर लावू शकत नाही. कारण त्यामुळे तुमचे केस पातळ दिसू शकतात.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Does conditioner causes hair fall know from expert that conditioner is good or bad for hair scsm