scorecardresearch

डेंग्यूमुळे प्लेटलेट्स कमी होतात का? प्लेटलेट्स वाढवण्याची इतर कारणे आणि मार्ग जाणून घ्या

प्लेटलेट्समध्ये हे आवश्यक नाही की तुमचा रक्तगट कोणता आहे, त्यात कोणत्याही रक्तगटाच्या प्लेटलेट्स तुम्हाला देऊ शकतात.

lifestyle
पपई खाल्याने किंवा पपईचा रस प्यायल्याने ते फायदेशीर ठरू शकते.( photo: jansatta)

देशातील सर्वच राज्यांमध्ये डेंग्यूचे रुग्ण वाढत आहेत. डेंग्यू हा डासांमुळे पसरणारा आजार आहे, ज्यामुळे खूप ताप, तीव्र डोकेदुखी, स्नायू दुखणे यासह अनेक समस्या उद्भवतात. डेंग्यू आजारात प्लेटलेट्स कमी होतात, त्यामुळे कधी कधी हा आजार जीवघेणा ठरू शकतो. सुप्रसिद्ध फिजिशियन डॉक्टर अमरेंद्र झा यांच्या मते, डेंग्यूमुळे केवळ रक्तातील प्लेटलेट्सची संख्या कमी होत नाही, तर यामागे इतरही अनेक कारणे आहेत.

प्लेटलेट्स कमी होण्याची कारणे

डॉ अमरेंद्र झा सांगतात की व्हायरल ताप किंवा टायफॉइड आजारातही प्लेटलेट्सची पातळी कमी होते. याशिवाय मशिनद्वारे रक्त तपासणीही केली जाते, त्यामुळे अनेक वेळा मशीन १० प्लेटलेट्स ऐवजी १ प्लेटलेट्स मोजते, अशा स्थितीत प्लेटलेट्सची संख्याही कमी असू शकते. ज्या लोकांना यकृताचे आजार आहेत, त्यांच्या शरीरातील प्लेटलेट्सचे प्रमाणही कमी होते. तसेच प्लेटलेट्स लिव्हर आणि बोन मॅरोद्वारे तयार होतात, त्यामुळे यकृताच्या समस्या असलेल्या लोकांमध्येही प्लेटलेट्सची संख्या कमी होते.

अॅनिमिया रोगामुळे प्लेटलेट्सचे प्रमाण देखील कमी होते. याशिवाय आणखी एक आरोग्य समस्या आहे, ज्याचे नाव आहे ‘आयडिओपॅथिक थ्रोम्बोसाइटोसिस’, ज्यामध्ये शरीरात प्लेटलेट्स सामान्यपणे तयार होतात, परंतु त्याच वेळी ते अनियमितपणे नष्ट होत राहतात. त्यामुळे शरीरातील प्लेटलेट्सचे प्रमाण कमी होऊ लागते. आरोग्य तज्ज्ञ यांच्या नुसार त्यामुळे शरीरातील प्लेटलेट्सची संख्या कमी होत असेल तर घाबरण्याची गरज नाही. यावेळी शेळीचे दूध प्यायल्याने प्लेटलेट्स मोठ्या प्रमाणात वाढत नाहीत. मात्र, पपई खाल्याने किंवा पपईचा रस प्यायल्याने ते फायदेशीर ठरू शकते. मात्र, रक्तातील प्लेटलेट्स जास्त प्रमाणात कमी झाल्यामुळे ब्रेन हॅमरेजची शक्यताही वाढते.

यात सर्वात चांगली गोष्ट म्हणजे प्लेटलेट्समध्ये हे आवश्यक नाही की तुमचा रक्तगट कोणता आहे, त्यात कोणत्याही रक्तगटाच्या प्लेटलेट्स तुम्हाला देऊ शकतात.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 10-11-2021 at 13:42 IST

संबंधित बातम्या